विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (happy dussehra quotes in marathi)

happy dussehra quotes in marathi – आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी विजयदशमी सण असतो, यालाच दसरा देखील म्हटले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना करून नवरात्र सुरू होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.

या लेखातून आम्ही काही निवडक विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (happy dussehra quotes in marathi) तुम्हाला देणार आहोत. जे तुम्ही तुमच्या मित्रांना, सहकाऱ्यांना पाठवून दसऱ्याच्या शुभेच्छा (dussehra greetings in marathi) देऊ शकता.

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (happy dussehra quotes in marathi)

happy dussehra quotes in marathi
विषयविजयादशमी
इतर नावेदसरा
प्रकारभारतीय सण व उत्सव
साजरा करणारेभारतीय (विशेषतः हिंदू)
केव्हा साजरा करतात ?आश्विन शुद्ध दशमी

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

सोन्यासारख्या लोकांना

विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!

या दसऱ्याला तुमच्या सर्व संकटांचा अंत होवो, तुमच्याकडे सतत शांती नांदतो!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

देवी दुर्गा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला चांगले आरोग्य, यश आणि आनंद देवो विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान राम तुमच्या यशाचा मार्ग उजळवत राहोत आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला विजय प्राप्त होवो.

दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

दसरा म्हणजे सीमोल्लंघन, मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन करतो

शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

बांधू तोरण दारीकाढू रांगोळी अंगणी, उत्सव सोने लुटण्याचा

करुनी उधळण सोन्याचीजपून नाती मनाची, दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

दुष्टांचा नाश, सर्वांचा विकास.

रावणाप्रमाणे प्रत्येक वाईट जळू दे,

आशा आणि विकासाची फुले फुलू दे.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमची आठवण म्हणुन हा प्रयत्न…

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…

सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

लाखो किरणी उजळल्या दिशा, घेऊनी नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हा लेख जरूर वाचालहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

दसऱ्याच्या शुभेच्छा मराठीमध्ये (Dasara Wishes In Marathi 2022)

पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा..

नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत नव्या शुभेच्छा.

दसऱ्याचा हार्दिक शुभेच्छा….

उस्तव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा..

नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटू

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…

आला आला दसरा,

दुःख आता विसरा

चेहरा ठेवा हसरा, साजरा करु दसरा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

निसर्गाचं दान आपट्याचं पान

त्याला सोन्याचा मान

तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती व समाधान

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

या दसऱ्याला तुमच्या सर्व चिंता आणि समस्या दूर होवोत.

दसऱ्याच्या 2022 च्या हार्दिक शुभेच्छा!

आजचा दिवस आपल्याला याची आठवण करून देतो की शेवटी,

वाईटाचा नेहमी अंत होतो आणि चांगुलपणाचा विजय होतो. ते नेहमी लक्षात ठेवूया.

दसऱ्याच्या शुभेच्छा!

ज्याप्रमाणे प्रभू रामाने पृथ्वीवरून वाईटाचा नाश केला,

त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार यशस्वीपणे काढून टाकावेत.

हा दसरा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो!

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्यातील सर्व अहंकार, द्वेष आणि राग रावणाच्या पुतळ्यासह जाळून टाका!

आनंदाचा सण, प्रेमाचा वर्षाव..

गोडाचा प्रकार, दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा..!

आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी,

दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..

दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा मराठी संदेश (Dasara Wishes in marathi 2022)

भीती नसे आम्हा पराजयाची,

आमच्या मना विजयाचे वेड लावूनी,

दसऱ्याचे सोने लुटुनी,

रोवितो मुहूर्तमेढ आनंदाची

विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा….

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

सोन घ्या सोन्यासारख रहा…

रांगोळी घालूनीया अंगणी, फुलांची तोरणे बांधूनी दारी

करूनिया सोन्याची उधळणं, नाती जपुया आपल्यातली

विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा…

विजयादशमीचा सण हा मोठा, आयुष्यात तुमच्या कधी नसो आनंदाला तोटा..

Happy Vijayadashami 2022

रावणाचा सर्वनाश होवो, श्रीराम सर्वांच्या अंत:करणात राहो, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आला आला दसरा, दुःख आता विसरा

चेहरा ठेवा हसरा, साजरा करु दसरा..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा, आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा

तुमचा चहेरा आहेच हसरा, ऊद्या सकाळी खूप गडबड,

म्हणून तुम्हाला आताच म्हणतो दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

आंब्याची तोरणे लावूनी दारी, येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी,

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा…..

हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान, सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

हृदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,

तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार, दसऱ्या निमित्ते करावा शुभेच्छांचा स्वीकार…

Happy Dussehra festival.

सारांश

या लेखातून निवडलेले विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (happy dussehra quotes in marathi) तुम्हाला आवडले असतील तर, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. आणि हो आजच्या सारखा आनंद कायम साजरा करा. हॅप्पी दसरा.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील सण आणि उत्सव

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

दसरा का साजरा केला जातो ?

नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक हिंदू सण आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते.
तसेच श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी मान्यता आहे.
या निमित्ताने वाईटावर चांगल्याचा विजय होतो, म्हणून दसरा सण साजरा केला जातो.

2022 या वर्षी दसऱ्याचा मुहूर्त कधी आहे ?

यावर्षी 5 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. 5 ऑक्टोबर 2022 या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 26 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 13 मिनिटं असा आहे.
संध्याकाळी सोनं म्हणजेच आपट्याची पानं एकमेकांना देऊन हा दिवस साजरा केला जातो.

दसरा कसा साजरा करावा ?

या दिवशी रावण दहन आणि शस्त्र पूजा केली जाते. तसेच दुर्गादेवी, प्रभू श्रीराम, श्री गणेश यांची पूजा करण्याचीही परंपरा आहे.

आपल्या मनातील चिंता, वाईट विचार व दृष्ट भावना त्याग करून आपल्या जीवनाची नवी सुरूवात करून दसरा साजरा करावा.

Leave a Comment