Harbhara Benefits In Marathi – हरभरा एक कडधान्य असून याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. यापासून आपल्या शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो. आरोग्यदायी व अनेक रोगावर औषध म्हणून हरभरा कडधान्य वापरले जाते. जेवणामध्ये हरभऱ्याचा कोवळा पाला, पीठ व डाळ यांचा जास्त उपयोग करतात.
हरभरा जगातील तिसरे महत्त्वाचे कडधान्य असून आशिया खंडात याचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. जगातील 68% हरभरा भारतात उत्पादित केला जातो. हरभऱ्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात. हरभरा डाळ, बेसन, भाजी तयार करून तसेच पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो.
हरभरा वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त असून, यात प्रथिने व कार्बोहायड्रेटेस, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये वनस्पतीच्या पाल्याचा वापर गुरांच्या चाऱ्यासाठी करतात. तसेच घोड्याचे पौष्टिक व महत्त्वाचे खाद्य म्हणून हरभरा वापरतात.
या लेखातून आपण हरभरा खाण्याचे फायदे व माहिती (harbhara benefits in marathi) जाणून घेणार आहोत.
हरभरा कडधान्य माहिती मराठी (Chickpeas Information in Marathi)

नाव | हरभरा |
इतर नावे | Bengal Gram |
शास्त्रीय नाव | सायसर बेरिएटिनम |
प्रकार | कडधान्य |
वापर | खाद्य पदार्थ |
जीवनसत्त्वे व खनिजे, कार्बोहाइड्रेट्स, ऊर्जा, प्रथिने आणि फॅट याचा मोठ्या प्रमाणावर साठा हरभरा या कडधान्यातून मिळतो. तसेच यात 7.68 ग्रॅम पाण्याचे प्रमाण असते.
हरभरा पीक रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी एक महत्वाचे कडधान्य असून जगातील तिसरे महत्त्वाचे कडधान्य असून आशिया खंडात याचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते.
जगातील 68% हरभरा भारत देशात उत्पादित केला जातो. भारतात एकूण हरभरा उत्पादन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यात सर्वात जास्त घेतले जाते.
महाराष्ट्र राज्यात 21% उत्पादन घेतले जाते. अहमदनगर, परभणी, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे, जळगाव व सोलापूर या जिल्ह्यात जास्तीत जास्त हरभऱ्याचे पीक घेतले जाते.
Related – रब्बी हंगामातील पिकांची नावे
भिजवलेले हरभरा खाण्याचे फायदे मराठी (Harbhara Benefits In Marathi)
भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, चरबी, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते.
भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं रक्त शुद्ध होतं. तसेच, मेंदू तीक्ष्ण होतो. सकाळचा नाश्ता म्हणून हरभरा सकाळी खाणं हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो. डॉक्टरांनुसार, भिजवलेले हरभरे खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी.
शरीर मजबूत बनवायचे असेल तर भिजवलेले हरभरे (Benefits of soaked gram) खूप फायदेमंद असतात. शरीराची झीज भरून काढण्यासाठी याचा खूप फायदा होतो. यामुळेच तर घोडा दमदार होण्यासाठी त्याला चण्याचे पौष्टिक खाद्य म्हणून हरभरा देतात.
चण्यामध्ये ब्युटीरेट नावाचं फॅटी ऍसिड असते, कर्करोगास कारणीभूत असलेल्या पेशी नष्ट करण्यासाठी याची मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं कर्करोगाचा धोका कमी होतो.
हरभऱ्यात ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा घटक असतो, यामुळे भूक कमी लागते. याचा उपयोग तुम्ही वजन नियंत्रित करण्यासाठी करू शकता.
भिजवलेले हरभऱ्यात लोहाचे प्रमाण मुबलक असते. यामुळे शरीरातील रक्ताचं प्रमाण योग्य राखले जाते. Anemia मुक्ती मिळवण्यासाठी रोजच्या आहारात भिजवलेल्या हरभऱ्याचा समावेश करावा.
हरभरा खाल्ल्याने शरीरात उत्साह आणि ऊर्जा निर्माण होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी हरभरा खूपच उपयुक्त असून हिमोग्लोबिन वाढते.
पोट साफ होण्यास व पचनक्रिया सुधारण्यासाठी हरभरा उपयोगी ठरतो. हरभरर्यात मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात, त्यामुळे मांसपेशी व हाडे मजबूत राहतात.
हरभरर्यात लोह, प्रथिने आणि फोलेत ही पोषकद्रव्ये असतात. यामुळे अशक्तपणाची समस्या दूर होते.
हरभरर्यापासून चणे, डाळ केले जातात. चणे-फुटाणे खाल्ल्याने शरीरात उत्साह तयार होतो. फुटण्यामुळे खोकला, सर्दी असे आजार बरे होतात.
Related – केळी खाण्याचे फायदे माहिती मराठी
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये हरभरा खाण्याचे फायदे काय आहेत (Harbhara benefits in marathi) याची सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
हरभरा पिकाच्या विराट, विशाल आणि विजय या जाती कोणत्या विद्यापीठाने विकसित केले आहेत ?
हरभरा पिकाच्या विराट, विशाल आणि विजय या जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले आहेत.
हरभरा पीक किती दिवसात येते ?
हरभरा पीक तीन महिन्यात येते. साधारणपणे जिरायती हरभऱ्याची पेरणी 25 सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करतात.
बागायती हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान करतात.