हरिश्चंद्रगड माहिती मराठी – harishchandragad trek information in marathi

Harishchandragad trek information in marathi – हरिश्चंद्रगड महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील किल्ला आहे. गिरिदुर्ग प्रकारातील असलेला हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.

एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड.

महाराष्ट्र राज्यातील किल्ले हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. त्यातीलच एक हरिश्चंद्रगड – एक निसर्गाचे वरदान. या ठिकाणी विविध प्रकारची वनस्पती , प्राणी-पक्षी आणि ट्रेकर्स मंडळी या साठी प्रसिद्ध आहे. याची उंची सरासरी समुद्रसपाटीपासून 1424 मीटर इतकी आहे.

हरिश्चंद्रगडाला ऐतिहसिक आणि पौराणिक महत्त्व आहे. आजच्या या लेखात आपण हरिश्चंद्रगड माहिती मराठी – harishchandragad trek information in marathi जाणून घेणार आहोत.

हरिश्चंद्रगड माहिती मराठी – harishchandragad in marathi

harishchandragad trek information in marathi
हरिश्चंद्रगड माहिती मराठी
नावहरिश्चंद्रगड
प्रकारगिरीदुर्ग
ठिकाणअहमदनगर, महाराष्ट्र राज्य
उंची 4000 फूट
डोंगररांगहरिश्चंद्राची रांग
जवळील पर्यटन स्थळेतारामती (किल्ला)
रोहिदास (किल्ला)
कलाडगड
स्थानिक भाषामराठी
हरिश्चंद्रगड माहिती मराठी

1. हरिश्चंद्रगड हा अहमदनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे.

2. हरिश्चंद्रगड किल्ल्याची उंची 1,424 मीटर आहे.

3. हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे.

4. हरिश्चंद्रगड हा किल्ला कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील सहाव्या शतकातील आहे.

5. यातील अकराव्या शतकातील विविध लेणी कोरण्यात आल्या आहेत.

6. चौदाव्या शतकात संत चांगदेव महाराजांनी या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते.

7. नंतर हा किल्ला मुघल बादशहाकडे गेला आणि मराठ्यांनी इसवी सन 1747 मध्ये जिंकून घेतले.

8. या ठिकाणी मायक्रोलायथिक रहिवाशांचे अवशेष सापडले आहेत.

9. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या अनेक पुराणात हरिश्चंद्रगडाचे अनेक संदर्भ आढळतात.

10. रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र हे हरिश्चंद्रगडमधील तीन शिखरे आहेत.

हरिश्चंद्रगड माहिती मराठी – harishchandragad in marathi

Harishchandragad map in marathi
हरिश्चंद्रगड नकाशा

11. किल्ल्याच्या आत नागेश्वर मंदिर, बौद्ध लेण्या, विष्णू आणि गणेश यांची मंदिरे आहेत.

12. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ला आहे याची उंची 1424 मी. असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.

13. या किल्ल्याला दोन ते चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे.

14. त्याचरोबरीने किल्ल्याचा उल्लेख हा प्राचीन अग्नीपुराणात आणि मत्स्यपुराणात बघायला मिळतो.

15. राजा हरिश्चंद्र यांच्या नावावरून या किल्ल्याचे नाव पडले आहे.

16. 16 मीटर उंचीचे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे या ठिकाणीं तुम्हाला पाहायला मिळेल.

17. मंदिराच्या अंगणात एक भिंत आहे या भिंतीसमोर एक दगडी पूल आहे त्या पुलाच्या खालून एक ओढा वाहतो हा ओढा म्हणजेच मंगळगंगेचा उगम आहे.

18. मंगळगंगेच्या प्रवाहाच्या समोर केदारेश्वराची गुहा आहे, या गुहेत कंबरेइतके पाणी असणारे 1 मीटर उंच आणि 2 मीटर लांब शिवलिंग आहे.

19. हरिश्चंद्रगडावर तारामाती हे 4850 फूट सर्वात उंच शिखर आहे. या ठिकाणी तुम्ही बुद्धाच्या सात लेण्या पाहू शकता.

harishchandragad trek information in marathi
harishchandragad trek information in marathi

20. लेण्याव्यतीरिक्त या ठिकाणी साडे आठ फूटाची गणपतीची मूर्तीदेखील आहे.

21. येथील कोकणकडा हे पर्यटकांना आकर्षित करते. हा कडा साधारणपणे 1,700 फूट आहे.

22. इसवी सन 1835 मध्ये कर्नल साइक्सला या ठिकाणी गोलाकार इंद्रधनुष्य दिसल्याची नोंद आहे.

23. पावसाळा आला की इथले सौदर्य पाहण्यासारखे असते.

24. येथील वनस्पतींची विविधता अविस्मरणीय आहे. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल अश्या अनेक वनस्पती येथे पहायला मिळतात.

25. वनस्पति बरोबरच या ठिकाणी कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे पाहायला मिळतात.

26. तारामती या शिखरावरून तुम्ही नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा आजूबाजूचा प्रदेश पाहता येतो.

हरिश्चंद्रगड माहिती मराठी – harishchandragad trek information in marathi

harishchandragad trek information in marathi
harishchandragad trek information in marathi

27. कोकणकड्याच्या माथ्यावर मोठी भेग पडली आहे, त्यामुळे हा कोकणकडा धोकादायक बनला आहे.

28. या कड्यावर साधारण पाच हजार मिलिमीटर इतका पाऊस पडतो.

29. दरीतून वाहत येणार्‍या वार्‍याचा वेगही प्रचंड असतो.

30. असा हा हरिश्चंद्रगड पर्यटकांना कायम आकर्षित करत असतो.

हरिश्चंद्रगड कसे जावे ? – Harishchandragad trek route

हरिश्चंद्रगड अहमदनगर या जिल्ह्यात आहे. हे ठिकाण राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असल्यामुळे येण्यासाठी जास्त अडचण येत नाही.

या ठिकाणी येण्यासाठी नगर पासून अनेक बसेसउपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही खासगी गाडी करून देखील येऊ शकता.

How to reach harishchandragad ?

  • Nashik to Harishchandragad distance 70 किलोमीटर आहे. नशिकवरून गडावर येण्यासाठी 1.5 तास लागतो.
  • Harishchandragad from Pune distance 97 किलोमीटर आहे, त्यासाठी साधारणतः 2 ते 2.5 तास लागतात.

सारांश

harishchandragad trek information in marathi
harishchandragad trek information in marathi

आजच्या या पोस्टमध्ये आपण हरिश्चंद्रगड माहिती मराठी – harishchandragad trek information in marathi जाणून घेतली. हरिशचंद्रगड पाहण्यासारखी ठिकाणे या मध्ये पर्यटन ठिकाणे व वैशिष्ट्ये पाहिले आहेत. हरिश्चंद्रगड माहिती मराठी – Harishchandragad history तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

हे देखील वाचा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तारामती शिखरची उंची किती आहे ?

तारामती शिखर उंची – 4,850 फूट

हरिश्चंद्रगड पाहण्यासारखी ठिकाणे कोणकोणती आहेत ?

अहमदनगर पाहाण्यासारखी ठिकाणेपैकी हरिश्चंद्रगड एक प्रसिध्द ठिकाणं आहेत.
#हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर
#कोकणकडा
#तारामती शिखर
#वन्यजीव
#विविध प्रकारच्या वनस्पती
#बुद्ध लेण्या
#तोलार खिंड
अशी निसर्गाचे सौंदर्य या ठिकाणी पाहायला मिळतात.

Leave a Comment