Hartalika puja in marathi – हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका ‘ असे म्हणतात. हिंदू धर्मातील महिलांसाठी व कुमारीकांसाठी हे एक धार्मिक व्रत आहे. शिवा भूत्वा शिवां यजेत् | या भावनेने हरितालिकेची पूजा करावी लागते.
संपूर्ण भारतात हरितालिका हे धार्मिक व्रत केले जाते. दक्षिण भारतात पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते.
भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या राज्यातील महिला हे व्रत दरवर्षी करतात. या लेखातून आपण हरतालिका उपवासाची माहिती मराठी (Hartalika puja in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हरतालिका उपवासाची माहिती मराठी (Hartalika puja in marathi)

नाव | हरतालिका |
प्रकार | हिंदू धार्मिक व्रत |
साजरा करणारे | हिंदू महिला |
केव्हा साजरा करतात ? | भाद्रपद शुद्ध तृतीयेला |
हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव गणेश चतुर्थी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला असते, तर भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका व्रत करण्यात येते. या व्रताचा व गणेश चतुर्थीचा काहीही संबंध नाही.
या दिवशी अखंड सौभाग्य राहावं यासाठी हरतालिकेचं व्रत मोठ्या प्रमाणात महिला वर्ग करतात. यावर्षी हरतालिका 30 ऑगस्ट 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. कुमारिकांनी विशेषत: ही पूजा करतात. आपलं मनोव्रत पूर्ण झालं म्हणून सौभाग्यवतींनीही ही पूजा करतात. तसेच ज्यांचे पती हयात नाहीत. त्यांनी उपोषण म्हणून हे व्रत करतात.
हा लेख जरूर वाचा – गणपतीची पूजा कशी मांडावी ?
हरतालिका पूजा तिथी मराठी माहिती (hartalika date 2023 marathi)
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेस हे व्रत असते. यावर्षी हे व्रत 18 सप्टेंबर 2023 ला आलेले आहे. भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी 17 सप्टेंबर, सकाळी 11.08 वाभाद्रपद शुक्ल तृतीया तिथी सुरू होते व 18 सप्टेंबर, दुपारी 12.39 वा. समाप्त होते.
हरतालिका व्रत कथा मराठी मध्ये (Hartalika Puja Katha In Marathi)
भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हिमालय राजाची कन्या पार्वती कठोर तपश्चर्या करते. जवळपास 64 वर्ष पार्वतीने हे व्रत केलेलं असतं. हा प्रसंग फार प्राचीन म्हणजेच गणेशाच्या जन्माच्या आधीचा आहे.
राजकन्या ही अत्यंत वैभवामध्ये वाढली. महाराजांच्या सूचनेप्रमाणे हिमालयाने ही कन्या विष्णूला अर्पण करायचं ठरवलं होतं. परंतु, पार्वतीला मात्र, वैभवापेक्षा वैराज्याची ओढ लागली होती. आणि त्यामुळे शिवाला प्रिय असं तिने व्रत केलं.
व्रताची निष्पत्ती अशी झाली की, तिला शीवप्राप्त झालं. असा हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी केलेले हे व्रत आहे.
हिमालयाची कन्या पार्वती हिने जेव्हा राजप्रसादाचा त्याग करून वनाचा स्विकार केला तेव्हा तिला मदत म्हणून तिची मैत्रीण ती पार्वतीबरोबर राहिली आणि पार्वतीला सर्वतोपरी हे व्रत आणि तपश्चर्या करण्यासाठी तिने मदत केली. म्हणून ती पण वंदनीय, पूजनीय मानली जाते.
हरतालिका पूजा साहित्य मराठी (hartalika puja sahitya in marathi)
हरतालिकेच्या पूजेसाठी रेती, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, वस्त्र, 16 प्रकारच्या पत्री, पूजेसाठी फुलं, सौभाग्याचं साहित्य जसे की बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी साहित्य लागते.
याव्यतिरिक्त चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इत्यादी साहित्याची पूजेसाठी आवश्यकता असते.
हरतालिका पूजा विधि मराठी (hartalika teej puja vidhi marathi)
वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धत आहे. संकल्प,सोळा उपचार पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते.
व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते. महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात. दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये हरतालिका उपवासाची माहिती मराठी (Hartalika puja in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
हरतालिका उपवास काय खावे ?
भगर, अननसाचा भात, भगर शिरा, खजूर खसखस खीर, पियूष यापैकी एक हरतालिका उपवासाला खावे.
हरतालिका उपवास का करतात ?
कुमारिका आपल्याला शिवा सारखा पती मिळावा म्हणून हा उपवास करतात. तर आपलं मनोव्रत पूर्ण झालं म्हणून सौभाग्यवतींनीही ही पूजा करतात. तसेच ज्यांचे पती हयात नाहीत. त्यांनी उपोषण म्हणून हे व्रत करतात.
Chukun kahi khanyat aal tr Kay karave
चुकून खाल्ले असेल तर काही नाही, पण आवर्जून खाऊ नये. कारण हा उपवास खूप कडक आहे. पण चुकून असल्या कारणाने तुम्ही तो चालू ठेवावा.