हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे – शाळेतील प्रार्थना मराठी

Categorized as Blog

Hich amuchi prarthana lyrics marathi – भारतातील प्रत्येक शाळेत सकाळची दिनचर्या ठरलेली असते. यात भारताचे राष्ट्रीय गीत गायन केले जाते. परिपाठ, दिनविशेष, प्रार्थना घेतली जाते. पुष्कर श्रोत्री यांनी निर्मित केलेल्या उबंटू या मराठी चित्रपटात माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना हे गीत चित्रीकरण केले आहे.

या लेखात आपण शाळेतील प्रार्थना मराठी (Hich amuchi prarthana lyrics marathi) याविषयी जाणून घेणार आहोत.

शाळेतील प्रार्थना – हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे

विषयहीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे
प्रकार शालेय प्रार्थना
गीत समीर सावंत
संगीत कौशल इनामदार
स्वरअजित परब
मुग्धा वैशंपायन
चित्रपट उबंटू
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हीच अमुची प्रार्थना

धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे

एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हीच अमुची प्रार्थना

भोवताली दाटला अंधार दुःखाचा
जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल
आहे खात्री भोवताली दाटला

अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल
आहे खात्री तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हीच अमुची प्रार्थना…

लाभले आयुष्य जितके ते जगावे
चांगले पाउले चालो पुढे जे थांबले

ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हीच अमुची प्रार्थना...

FAQs

उबंटू मराठी चित्रपट निर्माता कोण आहे?

पुष्कर श्रोत्री हे उबंटू या मराठी चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपट 2007 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता.

माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना याचे गायक कोण आहेत?

माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना याचे गायक अजित परब, मुग्धा वैशंपायन हे आहेत.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण शाळेतील प्रार्थना मराठी (Hich amuchi prarthana lyrics marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.