हिरकणी बुरूज माहिती मराठी

Hirkani buruj information in marathi – रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ला असून, याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. इसवी सन 1674 मध्ये मराठ्यांची राजधाानी (maratha empire capital) म्हणून रायगडला ओळखले जाते.याच किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणी नावाचा एक बुरूज महाराजांनी बांधलेला आहे. या बुरुजाची कहाणी फार रोमांचक असून आपण ती पुढे जाणून घेणार आहोत.

हिरकणी बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

या लेखातून आपण हिरकणी बुरूज माहिती मराठी (Hirkani buruj information in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण हिरकणी बुरूजाचा इतिहास (hirkani buruj history in marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

हिरकणी बुरूज माहिती मराठी (Hirkani buruj information in marathi)

Hirkani buruj information in marathi
नावहिरकणी बुरूज
स्थापनाइ.स. 17 वे शतक
उंची2700 फूट
स्थानरायगड किल्ल्याच्या पायथ्याशी
जवळील पाहण्यासारखी ठिकाणेरायगड किल्ला

रायगड किल्ल्यावर असणारे एक बुरूज – हिरकणी बुरूज, आजही रायगडावर पाहायला मिळते. या बुरुजाची उंची 2700 फूट इतकी आहे. पूर्वीच्या काळी किल्ल्यांच्या चारही बाजूंच्या भिंती बहुधा गोलाकार असत, त्यांना बुरूज असे म्हणतात.

असे बुरूज प्रत्येक किल्ल्यावर असून, यावर तोफ आणि दारुगोळा ठेवण्यात यायचा यामुळे शत्रूवर लक्ष ठेवणे सोपे जायचे. बुरुजामुळे शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षण व्हायचे, कारण बुरूज हे किल्ल्यांचे फार महत्त्वाचे आणि कणखर अंग होते.

हिरकणीने केलेल्या पराक्रमामुळे शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर हिरकणी बुरुजाची स्थापना केली. या बुरुजाच्या स्थापनेमागील इतिहास आपण पाहुयात.

हा लेख जरूर वाचामराठा साम्राज्याचा सहावा राजा राजाराम दुसरा भोसले (Rajaram II of Satara in marathi)

हिरकणी बुरूज इतिहास माहिती मराठी (hirkani buruj history in marathi)

इसवी सन 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला. हा किल्ल्याची बांधणी अतिशय सुरक्षित आणि मजबूत होती. असे म्हंटले जायचे, रायगडाचे दरवाजे बंद झाले तर किल्ल्यावरून खाली येईल ते पाणी आणि वर जाईल ती हवा… पण याला अपवाद ठरली ती हिरकणी गवळण.

रायगडपासून काही अंतरावर वाकुसरे (वाळूसरे) नावाचे एक गाव होते. त्या गावात एक धनगर समाजाचे कुटुंब राहत होते. या कुटुंबात हिरा, तिचा नवरा आणि तान्हे एक बाळ आणि तिची सासू राहत असे.

एके दिवशी हिरा रोजच्याप्रमाणे गडावर दूध विकण्यास गेली. यावेळेस तिने तिचे तान्हे मूल घरीच ठेवले होते. गडाच्या नियमाप्रमाणे सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होत असत. तिने विक्रीस आणलेल्या दुधाची संपूर्ण विक्री करण्यास वेळ लागला, त्यामुळे हिराला दरवाजापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. तोपर्यंत गडाचे दरवाजे बंद झालेले होते.

गडकऱ्यांना विनंती करूनही त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला, कारण महाराजांची ही आज्ञा सर्वांना लागू होती.

हा लेख जरूर वाचाखंडेराव होळकर यांची माहिती मराठी (khanderao holkar information in marathi)

हिराला तिच्या तान्ह्या बाळाची चिंता लागली होती. आपल्यावाचून तान्हे बाळ रात्रभर कसे राहील, ह्या विचाराने तिची चिंता वाढत होती. त्यामुळे हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय केला.

रात्रीच्या अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण रायगडच्या खोल दऱ्या, दाट झाडे-झुडपे आणि त्यात रात्रीचा अंधार. रायगडचा कडा दिवस असताना पार करणे मुश्किल होते, तर रात्रीचा प्रश्नच नाही. पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या हिराने कडा उतरण्याचा निर्णय घेतला.

गडाच्या कड्यांवरून उतरताना झालेल्या जखमा आणि वेदना न पाहता हिराने कडा सरसरा पार केला. त्यांनतर ती झपाट्याने घरी पोहोचली आणि आपल्या बाळाला कुशीत घेतले.

हिराला बाळाच्या दर्शनाने जो आनंद झाला, तो जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. ही घडलेली गोष्ट जेव्हा महाराजांना कळली, तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले, कारण शत्रूच्या सैन्यालाही दरवाजातून येण्या-जाण्या शिवाय मार्ग उपलब्ध नसणाऱ्या रायगडावरून एक स्त्रीने हा कडा उतरून पार केला होता. हा प्रश्न महाराजांसहित सर्वांनाच अन्नुतरीत करीत होता.

दुसऱ्या दिवशी महाराजांनी हिराला गडावर बोलावण्यास पाठविले. गडावर आल्यावर तिने घडलेली घटना महाराजांना सांगितली. आपल्या तान्ह्या बाळाला भेटण्यासाठी हा एकच मार्ग उपलब्ध होता असे तिने सांगितले.

हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. यानंतर महाराजांनी साडी-चोळी देऊन हिराचा सन्मान केला. तसेच ज्या कड्यावरून ती खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरुज बांधण्यात आला आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असे नाव दिले. त्याचबरोबर ती राहत असलेल्या गावाला तिचे नाव देण्यात आले, ते गाव म्हणजेच हिरकणीवाडी होय.

हा लेख जरूर वाचाअजातशत्रू माहिती मराठी (Ajatashatru information in marathi)

सारांश

या लेखातून आपण हिरकणी बुरूज माहिती मराठी (Hirkani buruj information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. यात आपण हिरकणी बुरूज इतिहास माहिती मराठी (hirkani buruj history in marathi) सविस्तरपणे जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

हिरकणी बुरूज कोठे आहे ?

हिरकणी बुरूज महाराष्ट्र राज्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.

हिरकणी बुरुजाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

हिरकणी बुरुजाची स्थापना इसवी सन 17 व्या शतकात करण्यात आली.

रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

रायगड किल्ला रायगड जिल्ह्यात आहे.