मकर संक्रांत का साजरी केली जाते ?

By | January 14, 2023

Makar Sankranti in marathi – मकर संक्रांत जानेवारी महिन्यात येणारा इंग्रजी वर्षात येणारा पहिला सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी नात्यातील राग, द्वेष विसरून नव्या वर्षाची सुरुवात करायची, म्हणून एकमेकांना तिळगुळ वाटायची परंपरा आहे.

पण मित्रांनो, तुम्हाला मकर संक्रांतीच्या साजरी करण्यामागील कारण माहित आहे का ? नसेल तर हा लेख पूर्ण वाचा.

कारण या लेखातून मी मकर संक्रांत का साजरी केली जाते (History of Makar Sankranti in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मकर संक्रांत कधी असते (Makar Sankranti in marathi)

मकर संक्रांत हा भारतातील महत्वाचा सण आहे. हा सण दरवर्षी जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. हा सण शेती संबंधित असल्याने शेतकरी वर्गात मोठ्या संख्येने साजरा केला जातो.

भारतातील विविध राज्यात मकरसंक्रांतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

महाराष्ट्र मकर संक्रांत
आसाममाघ बिहू
पंजाबमाघी
हिमाचल प्रदेश माघी साजी
जम्मू माघी संग्रांद किंवा उत्तरायण
राजस्थानसकरत
मध्य भारतसुकरात
उत्तर भारत पोंगल
हरियाणासक्रत

मकरसंक्रांती निमित्ताने शेतांत आणि मळ्यांत आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

संक्रांतीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून सूर्य देवाची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पुर्ण होतात आणि आपले दुःख नाहीसे होते, अशी मान्यता आहे.

या सणाच्या निमित्ताने तीळ एकमेकांना वाटून शनि दोषातून मुक्तता होते, अशी मान्यता आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे मकर राशीत संक्रमण झाल्यामुळे खरमास संपून सर्व शुभ कार्ये सुरू होतात. त्यामुळे तर या सणापासून लग्न, मुंडण तसेच इतर समारंभ सुरू होतात.

मकर संक्रात निमित्ताने महाराष्ट्रात खिचडी, पोळ्या, उंधियो, घेवर आणि उसाच्या रसाची खीर यासारखे खास खाद्यपदार्थ बनवले जातात. या दिवशी सर्वजण पतंग उडवतात. सूर्य देवाची पूजा करून दान धर्म करतात. सायंकाळी घरातील गायीची पूजा करत मकर संक्रांत साजरी करतात.

मकर संक्रांत का साजरी केली जाते (History of Makar Sankranti in marathi)

मकरसंक्रांत साजरा करण्यामागे धार्मिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. मित्रांनो, तुम्हाला मकर ही रास माहीत असेलच, या राशीचे मालक शनिदेवांना मानले जाते. संक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस असल्याने हा दिवस साजरा करतात.

एका पौराणिक कथेनुसार, या दिवशी स्वर्गाची दरवाजे उघडतात व स्वर्गाचा दिवस सुरू होतो. या सणाच्या दिवशी विष्णू देवाने असूरांचा पराभव करून त्यांच्यावर विजय मिळवला होता अशी मान्यता आहे. विष्णू यांनी असूरांवर मिळवलेळ्या विजयाचे प्रतीक म्हणून मकर संक्रांती साजरी करतात.

जानेवारी महिन्यात थंडीचे वातावरण असते. तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण असतात. हिवाळ्यात आपल्या शरीराला स्निग्ध व उष्ण पदार्थांची गरज असते त्यामुळे तिळगुळ खाल्ल्याने शरीराला फायदा होतो.

सकाळी घराच्या छतावर चढून पतंग उडविण्याने शरीराला सूर्यप्रकाश मिळतो आणि आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची प्रथा आहे.

सारांश

तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला मकरसंक्रांत साजरी करण्यामागील इतिहास (History of Makar Sankranti in marathi) समजला असेल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

मकर संक्रांत कशी साजरी करतात ?

मकर संक्रात निमित्ताने स्त्रिया शेतांत व मळ्यांत आलेल्या धान्याचे वाण एकमेकींना देतात. विट्ठल आणि रुख्मिणी चे पूजन करतात. तसेच सुगडाची पूजा घालतात. या सणाच्या निमित्ताने खास खाद्यपदार्थ बनवले जातात. या दिवशी सर्वजण पतंग उडवतात. सूर्य देवाची पूजा करून दान धर्म करतात. सायंकाळी घरातील गायीची पूजा करत मकर संक्रांत साजरी करतात.

मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतूत येतो ?

मकर संक्रांत हा सण हिवाळा या ऋतूत येतो.

पुढील वाचन :

  1. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
  2. गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी
  3. महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *