केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी

Home remedies for hair fall in marathi – आकर्षक केशरचना ही मानवी सौंदर्यात आणखीनच भर घालते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या केसांची काळजी घेतो आणि विविध उपायांनी केसांचे सौदर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करतो. पण धावपळीचे आयुष्य, मानसिक ताणतणाव, चुकीचा आहार, पर्यावरण प्रदूषण आणि औषधांचा अतिवापर केल्याने केस गळती होते.

केस गळतीवर उपाय म्हणून बाजारात आयुर्वेदिक तेल आणि केस वाढवण्यासाठी औषध उपलब्ध आहेत. पण हे उपाय सर्व जणांना चांगला परिणाम देईल, याची शक्यता नसते. याउलट केस गळतीवर उपाय म्हणून वापरलेल्या साधनांचा साईड इफेक्ट होतो. यासाठी आपण आज केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय (Home remedies for hair fall in marathi) जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाआरोग्यासाठी पाण्याचे उपयोग मराठी माहिती (water benefits information in marathi)

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी (Home remedies for hair fall in marathi)

Home remedies for hair fall in marathi

केस गळतीवर घरगुती उपाय कांदा (onion juice for hair regrowth in marathi) – कांद्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे केसांची चांगली वाढ होते. एक मध्यम आकाराचा कांदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस तयार करा. त्यानंतर तयार झालेला कांद्याचा रस कापसाच्या मदतीने केसांना लावा. त्यानंतर 10 मिनिटांसाठी हा रस केसांमध्ये राहू द्या. यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा असे केल्याने केस गळती थांबून केसांची वाढ होण्यास मदत होते.

केस वाढवण्यासाठी तेल (olive oil for hair growth in marathi) – ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात, यामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते. केसांसाठी पोषक असणारे व्हिटॅमिन सी लसूणमध्ये भरपूर प्रमाणात असतात.

हा लेख जरूर वाचाकापूरचे फायदे मराठी माहिती

एक लसूण घेऊन त्याचा रस तयार करा. लसणाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र मिसळून घ्या. तयार झालेले मिश्रण थोडे गरम करून हलक्या हाताने केसांवर लावा. कॉटनचा टॉवेल कोमट पाण्याने थोडासा ओला करून डोक्याला गुंडाळून ठेवा. साधारण 15 मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर टॉवेल सोडून केस स्वच्छ करा. महिन्यातून एकदा असे केल्यास केसांची गळती थांबून केसांची वाढ होते.

कोरफड आणि केस वाढ (aloe vera gel for hair growth in marathi) – जसे कोरफड खाण्याचे फायदे आहेत, तसेच कोरफडीचे केसांसाठी फायदे आहेत. बाजारात कोरफड तेल मिळते, पण याचा वापर न करता नैसर्गिक एलोवेरा जेल वापरावे.

रोमछिद्रांवरील मृत पेशी हटवण्याचे काम कोरफड जेलमधील एंझाइम करतात. तसेच कोरफडीचा औषधी गुणधर्मांमुळे केस मऊ आणि चमकदार होतात. त्यासाठी कोरफडीचा चमचाभर गर केसांना लावून अर्धा तास ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून पुसून घ्या. आठवड्यात एकदा असे केल्यास केस गळती कमी होवून, केस वाढतात.

मेथी दाणे केसांसाठी आरोग्यदायी (home remedies for hair fall in marathi) – एक वाटी पाणी घेऊन त्यात दोन मोठे चमचे मेथीचे दाणे भिजू घाला. हे पाणी सकाळी केसांना लावून 20 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर थोड्या कोमट पाण्याने केस धुवून, पुसून स्वच्छ करा.

केसांसाठी पोषक आहार (best food for hair growth ) – केसांसाठी पोषक आहार घेणे गरजेचे असते. केस दाट होण्यासाठी सॅल्मन मासे, पालकाची भाजी, अंडी, ब्लूबेरी व रताळी खावे. तसेच सार्डिन आणि ट्राउट मासे, अ‍ॅव्होकॅडो व लाल भोपळ्याच्या बिया, बदाम, शेंगदाणे, आक्रोड यांचाही आहारात समावेश करावा.

मानसिक तणाव कमी करण्याचे उपाय शोधावे (emotional cause of hair loss) – डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपला मानसिक तणाव कमी करावा. कारण असे पाहण्यात आले आहे, मानसिक तणावातून केस गळतात. त्यासाठी मानसिक आरोग्य राखले पाहिजे, तरच आपले आरोग्य चांगले राहील.

आवळा खाण्याचे फायदे केसांसाठी (amla for hair growth) – आवळा हा केसांसाठी खूप उपयोगी आहे. कोणत्याही भाजीपाले आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात जास्त व्हिटॅमिन असते, त्यामुळे केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं. आवळ्यात अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत असतं, त्यामुळे केसांना खूप फायदा होतो.

हा लेख जरूर वाचाकेळी खाण्याचे फायदे माहिती मराठी (banana benefits in marathi)

सारांश

या लेखातून आपण केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी (Home remedies for hair fall in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

केस गळण्याची कारणे काय असू शकतात ?

केस गळण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
1. मानसिक ताणतणाव
2. चुकीचा आहार
3. पर्यावरण प्रदूषण
4. औषधांचा अतिवापर केल्याने केस गळती होते.

केस दाट होण्यासाठी काय खावे ?

केस दाट होण्यासाठी सॅल्मन मासे, पालकाची भाजी, अंडी, ब्लूबेरी व रताळी खावे. तसेच सार्डिन आणि ट्राउट मासे, अ‍ॅव्होकॅडो व लाल भोपळ्याच्या बिया, बदाम, शेंगदाणे, आक्रोड आवळा यांचाही आहारात समावेश करावा.

केस कशापासून बनलेले असतात ?

केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात.

Leave a Comment