How to activate sbi debit card in marathi – स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविते. यापैकीच एक सेवा म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे डेबिट कार्ड. स्टेट बँकेत नवीन खाते उघडल्यावर 8 ते 10 दिवसातच बँकेकडून डेबिट कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर भारतीय टपाल सेवेमार्फत पाठविण्यात येते.
बँक तुम्हाला कुरिअरमार्फत फक्त डेबिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर कसा करायचा ? याविषयी माहिती पुस्तक पाठविते. यामध्ये पूर्वीप्रमाणे डेबिट कार्डचा पिन कोड समाविष्ट नसल्याने, तो ग्राहकांना स्वतः तयार करावा लागतो.
या लेखातून आपण स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड पिन तयार कसा करायचा ? (How to activate sbi debit card in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हा लेख जरूर वाचा – How to generate mmid in sbi 2022
Table of Contents
- स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड पिन तयार कसा करायचा (How to activate sbi debit card in marathi)
- #1 स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम (how to generate sbi debit card pin through atm)
- #2 स्टेट बँक ऑफ इंडिया एसएमएस द्वारे (how to generate sbi debit card pin through sms)
- #3 स्टेट बँक ऑफ इंडिया इंटरनेट बँकिंग (how to generate atm pin for sbi debit card through internet banking)
- #4 स्टेट बँक ऑफ इंडिया आयव्हीआरएस (how to generate atm pin for sbi debit card through IVRS)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड पिन तयार कसा करायचा (How to activate sbi debit card in marathi)

स्टेट बँकेच्या डेबिट कार्डचा पिन क्रमांक तयार करण्यासाठी प्रामुख्याने 4 पद्धती आहेत. यातील कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून तुम्ही डेबिट कार्डचा पिन कोड तयार करू शकाल.
हा लेख जरूर वाचा – How to unblock sbi atm card 2022
#1 स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम (how to generate sbi debit card pin through atm)
- तुमच्या जवळील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमध्ये जाऊन डेबिट कार्ड मशीन मध्ये घाला.
- त्यानंतर PIN Generation चा पर्याय निवडा. त्यानंतर 11 अंकी बँकेचा खाते क्रमांक टाकून कन्फर्म करा.
- त्यानंतर बँकेशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून तो कन्फर्म करा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर बँकेकडून एक OTP येईल. हा OTP दोन दिवसांसाठी वैध असतो. या OTP टाकून तुम्हाला हवा असलेला चार अंकी डेबिट कार्ड पिन टाका.
- त्यानंतर अजून एक OTP येईल, हा OTP टाकल्यानंतर तुमचा स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्डचा पिन तयार झाला.
हा लेख जरूर वाचा – How to fix error no accounts mapped for this username sbi 2022
#2 स्टेट बँक ऑफ इंडिया एसएमएस द्वारे (how to generate sbi debit card pin through sms)
- या पद्धतीचा उपयोग करण्यासाठी बँक खात्याशी संलग्न असणारा मोबाईल क्रमांक जवळ असणे गरजेचे आहे.
- या नंबरवरून 567676 यावर एक एसएमएस पाठवावा लागतो तो असा, PIN <space> CCCC <space> AAAA
CCCC | डेबिट कार्डचे शेवटचे चार अंक |
AAAA | बँक खात्याचे शेवटचे चार अंक |
त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, हा OTP दोन दिवस वैध असतो. हा OTP जवळच्या SBI ATM मशीनमध्ये टाकून नवीन पिन कोड तयार करता येतो.
हा लेख जरूर वाचा – How to get CIF number SBI bank without passbook 2022
#3 स्टेट बँक ऑफ इंडिया इंटरनेट बँकिंग (how to generate atm pin for sbi debit card through internet banking)
- https://retail.onlinesbi.com/retail/login.htm या लिंक वर जाऊन sbi net banking लॉगिन करा.
- ओपन झालेल्या page मधून eservices हा पर्याय निवडून त्यात atm card services पर्याय निवडा. त्यानंतर ATM pin generation हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचा प्रोफाइल पासवर्ड टाकून OTP टाकून कन्फर्म करा.
- त्यानंतर डेबिट कार्ड साठी तुमच्या मनाने 2 क्रमांक टाका, राहिलेले दोन क्रमांक OTP द्वारे तुम्हाला प्राप्त होतील.
- तुम्ही टाकलेले दोन क्रमांक आणि OTP मधून मिळालेले दोन क्रमांक तुमच्या डेबिट कार्डचा पिन कोड होय.
#4 स्टेट बँक ऑफ इंडिया आयव्हीआरएस (how to generate atm pin for sbi debit card through IVRS)
- स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावरून खालील क्रमांकाचा कॉल करा.
1800 425 3800 |
1800 1122 11 |
080 26599990 |
2. कॉल केल्यावर बँकेच्या प्रतिनिधीला तुमच्या डेबिट कार्डचा क्रमांक आणि बँक खाते क्रमांक सांगा.
3. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल, हा OTP दोन दिवसांसाठी वैध असेल.
4. हा OTP जवळच्या SBI ATM मशीनमध्ये टाकून तुम्ही नवीन डेबिट कार्ड पिन तयार करू शकता.
हा लेख जरूर वाचा – How to activate SBI debit card 2022
सारांश
या लेखातून आपण स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड पिन तयार कसा करायचा (How to activate sbi debit card in marathi) माहिती जाणून घेतली.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
डेबिट कार्ड म्हणजे काय ?
डेबिट कार्ड, ज्याला चेक कार्ड, बँक कार्ड, प्लास्टिक कार्ड किंवा इतर काही वर्णन म्हणून देखील ओळखले जाते, हे पेमेंट कार्ड आहे जे खरेदी करण्यासाठी रोखीच्या जागी वापरले जाऊ शकते.
SBI डेबिट कार्ड चार्जेस किती आहे ?
SBI डेबिट कार्ड चार्जेस पुढीलप्रमाणे…
1. वार्षिक मेन्टेनन्स – 125 रुपये + 18% GST
2. नवीन कार्ड मिळवण्यासाठी – 300 रुपये + 18% GST
SBI डेबिट कार्ड कोण काढू शकतो ?
SBI डेबिट कार्ड मिळवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडल्यावर 8 ते 10 दिवसात डेबिट कार्ड दिलेल्या पत्त्यावर पोस्ट मार्फत प्राप्त होते.