पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा ?

By | April 12, 2023

How to apply for passport marathi – पासपोर्ट ज्याला पारपत्र देखील म्हणतात, याचा वापर विदेशात जाताना ओळखपत्र म्हणून केला जातो. आपल्या देशातून इतर देशात पर्यटन, शिक्षण, व्यापार किंवा इतर कारणासाठी जायचे असल्यास सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक असते.

या लेखातून आपण पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा (How to apply for passport marathi) याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रे (Documents Required For Passport In India marathi)

निवासी पत्ताआधार कार्ड, पाणी किंवा वीजबिल, टेलिफोन बिल, मतदान कार्ड, गॅस कनेक्शन कार्ड, घरभाडे करार, बँक पासबुक, आयकर प्रमाणपत्र
जन्म पुरावाआधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वाहन चालक परवाना, सरकारी नोकरी करत असल्यास सर्व्हिस कार्ड, अनाथ असल्यास अनाथ आश्रममधून अनाथ असल्याचा पुरावा

वरील कागदपत्रांद्वारे तुमची ओळख वैध ठरवली जाते. पासपोर्टसाठी अर्ज करताना तुमची नागरिकता विचारात घेतली जाते. जर तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असले, तरच तुम्हाला भारतीय पासपोर्टसाठीचा अर्ज करता येतो.

भारतीय पासपोर्टचे प्रकार (Indian passport types marathi)

1. पर्सनल पासपोर्ट (Ordinary Passport) – या पासपोर्टचा कव्हर गडद निळ्या रंगाचा असतो. सामान्य नागरिकाला सामान्य प्रवास करण्यासाठी हा पासपोर्ट दिला जातो. उदा. अभ्यास आणि व्यवसाय ट्रिप, पर्यटन इत्यादी.

2. डिप्लोमॅटिक पासपोर्ट (Diplomatic Passport) – या पासपोर्टचा कव्हर मायऑन रंगाचा असतो. भारतीय राजनैतिक, जारीक सदस्य, केंद्रीय कौन्सिल ऑफ मंत्री, काही उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी आणि राजनयिक कौशल्यांचे सदस्य यांना हे पासपोर्ट देण्यात येते.

तसेच विनंती केल्यावर अधिकृत व्यवसाय करणाऱ्यास उच्च-रँकिंग स्टेट-लेव्हल अधिकाऱ्याला हा पासपोर्ट दिला जातो.

3. ऑफिशियल पासपोर्ट (official passport) – या पासपोर्टचा कव्हर पांढऱ्या रंगाचा असतो. अधिकृत व्यवसायावर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना हा पासपोर्ट दिला जातो.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारा खर्च (passport fees in india marathi)

नवीन/नूतनीकरण (18 वर्षांवरील)1500 ते 2000 रुपये
नवीन/नूतनीकरण (18 वर्षाखालील)1000 ते 2000 रुपये
तत्काळ (15 वर्षांवरील)4000 रुपये
तत्काळ (15 वर्षाखालील)3000 रुपये
पोलीस व्हेरिफिकेशन500 रुपये

पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा (How to apply for passport marathi)

How to apply for passport marathi

पहिली पायरी – सर्वात पहिले पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइट https://www.passportindia.gov.in/ वर उघडा. या पोर्टलवर तुमचे नाव, मोबाईल नंबरच्या मदतीने स्वतःची नोंदणी करा.

पायरी दुसरी – यानंतर, अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख आणि जवळच्या पासपोर्ट कार्यालयाची माहिती भरून पासपोर्ट सेव्ह करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.

पायरी तिसरी – यानंतर Apply for Fresh Passport/Reissue of Passport या पर्यायावर क्लिक करून Click Here To Fill या पर्यात निवडा.

पायरी चौथी – यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरून सबमिटवर क्लिक करा. यानंतर सेव्ह केलेले/सबमिट केलेले अर्ज पहा हा पर्याय निवडून ऑनलाइन पेमेंट करावे लागेल.

पायरी पाचवी – हे सर्व प्रकिया केल्यावर तुम्हाला तुमच्या जवळच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला पे आणि बुक अपॉइंटमेंटवर या पायरीवर क्लिक करावे लागेल.

पायरी सहावी – यांनतर तुम्हाला फॉर्मची पावती प्रिंट करून पासपोर्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुमचे पोलिस व्हेरिफिकेशन होईल. काही दिवसांनी तुमचा पासपोर्ट तुमच्या घरी येईल.

पासपोर्ट ॲप्लिकेशन स्टेटस कसा चेक करायचा (how to track passport application status in india )

पायरी पहिली – सर्वात प्रथम www.passportindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन Track Your Application Status हा पर्याय निवडा.

पायरी दुसरी – यानंतर तुमच्या स्क्रीनवर तीन पर्याय दिसू लागतील, यातील अर्जाची स्थिती हा पर्याय निवडा.

पायरी तिसरी – यानंतर तुमच्या फाईलचा नंबर प्रविष्ट करा. सोबतच तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावी लागेल. जर तुम्ही अचुक माहिती सबमिट केली असेल, तर स्थिती तपासणी हे पेज तुम्हाला दिसेल.

या पानावर तुमच्या फाईलचा क्रमांक, तुमचे पूर्ण नाव, पासपोर्ट अर्ज करण्याची तारीख आणि पासपोर्ट ॲप्लिकेशनची स्थिती दिसेल.

सारांश

या लेखातून आपण पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा (How to apply for passport marathi) याविषयीं सविस्तरपणे जाणून घेतले. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पासपोर्टसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

पासपोर्टसाठी आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड आणि तुमच्यावर कोणतीही पोलिस तक्रार किंवा गुन्हा दाखल नसल्याचं शपथपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

पासपोर्ट किती दिवसात मिळतो ?

पासपोर्ट मिळण्यासाठी साधारण 45 दिवस, तर तात्काळ पासपोर्ट सात दिवसात मिळते.

पुढील वाचन :

  1. ऑनलाईन पद्धतीने जीएसटी नोंदणी कशी करावी ?
  2. कंपनीसाठी योग्य डोमेन नाव कसे निवडावे ?
  3. वेब होस्टिंग व्यवसाय कसा सुरु करावा ?
  4. कारखान्याचा परवाना कसा काढायचा ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *