पायलट बनण्यासाठी काय करावे ?

how to become a pilot in india marathi

how to become a pilot in india marathi – पायलट म्हणजे विमान चालक होय, ज्याला वैमानिक देखील म्हंटले जाते. वैमानिक हा विमानाचा कॅप्टन असतो. प्रवाशांचा विमानातील प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होण्याची जबाबदारी वैमानिकाची असते.

या लेखातून आपण पायलट बनण्यासाठी काय करावे (how to become a pilot in india marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पायलट म्हणजे काय (Pilot information in marathi)

पायलट म्हणजे विमान चालक होय. विमानातील प्रवाशांचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित व्हावा, हेच एका वैमानिकाचे प्रथम उद्दिष्ट असते. विमान उडवताना कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीदेखील वैमानिक आपल्या कौशल्याने त्यावर ताबा मिळवतो.

वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा दर्जा उच्च असतो. त्यात नेमकेपणा आणि शिस्त असते. वैमानिक होण्यासाठी तंत्रज्ञानाचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते. या वेळी हवाई वाहतूक नियंत्रण, हवामानशास्त्र, रेडिओ, नॅव्हिगेशन आणि विविध यंत्रांची देखभाल याविषयीची माहिती दिली जाते.

वैमानिक प्रशिक्षण हे वेगवेगळ्या विमानांसाठी दिले जाते. भारतात वैमानिक प्रशिक्षण घेण्यासाठी डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन या संस्थेच्या मान्यता असलेल्या संस्थेमध्येच प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. या संस्थेत वैमानिकांचे प्राविण्य आणि नैपुण्य बारकाईने तपासून त्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

भारतात वैमानिक परवाना कसा मिळवतात (how to get pilot license in india marathi)

भारतात दोन पद्धतींचा वैमानिक परवाना मिळतो, पहिला खासगी आणि दुसरा व्यावसायिक वैमानिक परवाना.

खासगीव्यावसायिक
70 तासांच्या हवाई प्रशिक्षणानंतर परीक्षा देऊन खासगी वैमानिक परवाना मिळतो.250 तासांच्या हवाई प्रशिक्षणानंतर परीक्षा देऊन खासगी वैमानिक परवाना मिळतो.
प्रशिक्षणासाठी 10वी उत्तीर्ण आणि किमान वय 17 वर्षे आवश्यक असते.प्रशिक्षणासाठी विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण आणि किमान वय 17 वर्षे आवश्यक असते.
यामध्ये विमान उड्डाण करायला शिकवले जाते, पण हा परवाना वापरून एक इंजिन असलेल्या विमानात किंवा मालवाहतूक करणाऱ्या विमानात काम करावे लागते. यामध्ये स्वतंत्रपणे विमान उडवायला शिकवले जाते.

पायलट बनण्यासाठी काय करावे (how to become a pilot in india marathi)

पायलट बनण्यासाठी तुम्हाला प्रथम विज्ञान शाखेतून 12वी पूर्ण करावी. त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा वैमानिक व्हायचं आहे हे ठरवावे. कारण वैमानिकांच्या प्रकारानुसार त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असते.

भारतामध्ये विमान चालवण्यासाठी पाच प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. ते पुढीलप्रमाणे,

प्रकार
एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट
खासगी पायलट
क्रीडा पायलट
फ्लाइट इंस्ट्रक्टर
हवाई दलाचे पायलट

पायलट पात्रता आणि परीक्षा (pilot eligibility india marathi)

शैक्षणिक पात्रता12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण
वय मर्यादा16 ते 32 वर्ष
प्रवेश परीक्षा NDA परीक्षा
नागरिकत्वभारतीय
उंची आणि वजनकमीत कमी 152 सेमी आणि त्यानुसार वजन

बारावी पास केल्यानंतर एक कमर्शियल पायलट बनण्यासाठी तुम्हाला स्टुडन्ट पायलट लायसन्स आणि प्रायव्हेट पायलट लायसेन्ससाठी अर्ज करावा लागेल. हे लायसन्स प्राप्त करण्यासाठी तुम्हाला DGCA च्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत, त्यात प्रवेश घ्यावा लागेल.

प्रवेशाआधी मेडिकल चाचणी केली जाते. मेडिकल सर्टिफिकेट, सिक्युरिटी क्लिअरन्स आणि बँकेची गॅरंटी मिळाल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. हा कोर्स साधारण 3 वर्षांचा असतो.

या कोर्स संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा पास करावी लागते. यानंतर तुम्हाला वैमानिक परवाना मिळतो.

सारांश

या लेखातून आपण पायलट बनण्यासाठी काय करावे (how to become a pilot in india marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पायलट होण्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?

पायलट होण्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

पायलट होण्यासाठी किती खर्च येतो ?

पायलट होण्यासाठी 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो.

पुढील वाचन :

  1. विद्यार्थी करिअरची चुकीची निवड का करतात ?
  2. महिला व बाल विकास अधिकारी माहिती
  3. पीएसआय म्हणजे काय ?

Leave a Comment