आयपीएस अधिकारी कसे व्हावे ?

how to become ips officer marathi – अनेक विद्यार्थ्यांचे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. या खात्यात अनेक पदे असतात. आयपीएस हे पोलीस प्रशासनातील महत्वाचे पद आहे.

नागरी सेवा हा देशाच्या प्रशासकीय यंत्रणेचा कणा मानला जातो. आयपीएस ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. या सेवेअंतर्गत आयपीएसला समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करावे लागते.

जर तुमचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खास आहे. कारण या लेखातून आपण आयपीएस अधिकारी कसे व्हावे (how to become ips officer marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

आयपीएस अधिकारी माहिती मराठी (ips officer information in marathi)

how to become ips officer marathi

आयपीएस म्हणजे भारतीय पोलीस सेवा (indian police services) होय. ही सेवा केंद्रीय गृहमंत्रालय विभागाच्या अखत्यारीत येते. राज्य सरकार आणि केंद्रीय सरकारच्या पोलीस खात्यातील अनेक महत्त्वाची पदे आयपीएस अधिकारी सांभाळतात. ती पदे पुढीलप्रमाणे आहेत.

भारतीय गुप्तहेरखात्याचे संचालकराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण खात्याचे संचालक
सीमा सुरक्षा पोलीस संचालक अधिकारीरेल्वे सुरक्षा बल संचालक अधिकारी
पोलिस कमिशनर

आयपीएस अधिकाऱ्यांची निवड नागरी सेवा परीक्षेद्वारा केली जाते. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही भारत सरकारची संविधानिक संस्था सरकारी अधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती करते.

आयपीएस अधिकारी बनण्यासाठी इच्छुक उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात. यातून निवड झालेल्या उमेदवारांना हैदराबादमधील राष्ट्रीय पोलीस विद्यालयात प्रशिक्षण दिले जाते.

आयपीएस अधिकारी होण्यासाठी लागणारी पात्रता (ips officer eligibility marathi)

पदाचे नावआयपीएस
प्रकारभारत सरकारची नागरी सेवा
शैक्षणिक पात्रताUGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
वयGeneral – 32 वर्षे
OBC – 35 वर्षे
SC/ST – 37 वर्षे
परीक्षा किती वेळा देता येते ?General – 7 वेळा
OBC – 9 वेळा
SC/ST – अमर्यादित
शारीरिक निकष– पुरुष उंची – 165 सेमी (किमान)
– पुरुष छाती – 84 सेमी (साधारण) + 5 सेमी (फुगवल्यानंतर)
– महिला उंची – 145 सेमी (किमान)
– महिला छाती – 79 सेमी (साधारण) + 5 सेमी (फुगवल्यानंतर)

आयपीएस अधिकारी होण्यासाठी UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करावा लागतो. ही परीक्षा पदवी पूर्ण केल्यानंतर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना देता येते.

यूपीएससी परीक्षा 3 भागात असते. पहिले दोन 2 लेखी परीक्षा असतात आणि त्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. त्यानंतर ज्यां उमेदवारांची निवड होते त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.

आयपीएस अधिकारी पगार किती असतो (ips officer salary and facilities marathi)

पदाचे नाववेतन
डीएसपी (Deputy Superintendent of Police)51,100 रुपये
एएसपी (Assistant Superintendent of Police)67,700 रुपये
एसपी (Superintendent of Police)78,800 रुपये
एसएसपी (senior superintendent of police)1,18,500 रुपये
डीआयजीपी (Deputy Inspector General of Police)1,31,100 रुपये
आयजीपी (Inspector General of Police)1,44,200 रुपये
एडीजीपी (Additional Director General of Police)2,05,400 रुपये
डीजीपी (Director-General of Police)2,25,000 रुपये

आयपीएस अधिकाऱ्याला सातव्या वेतन आयोगानुसार 56,100 रुपये दरमहा वेतन मिळते. यासोबतच महागाई आणि इतर भत्तेदेखील दिले जातात.

जेव्हा एखादा आयपीएस अधिकारी डीजीपीच्या पदावर पोचतो तेव्हा त्याला जवळपास 2 लाख 25,000 रुपये दरमहा वेतन मिळते. डीजीपीच्या पदावर असणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला सर्वाधिक वेतन मिळते.

आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतन श्रेणीनुसार विशेष सुविधा दिल्या जातात. आयपीएस अधिकाऱ्याला गाडी आणि शासकीय निवासस्थान मिळते. तसेच हाऊस हेल्प, सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हर इत्यादी सुविधा मिळतात.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदानुसार त्यांचा वैद्यकीय खर्च, फोनबिल आणि वीजबिल यांचा खर्च सरकारकडून मिळतो. तसेच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्यांना देशाबाहेर शिक्षणासाठी जायचे असल्यास शैक्षणिक रजादेखील मिळते. सर्वच आयपीएस अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर या पेन्शन मिळते.

सारांश

या लेखातून आपण आयपीएस अधिकारी कसे व्हावे (how to become ips officer marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

आयपीएस अधिकारी म्हणजे काय ?

भारतीय पोलिस सेवेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारत सरकार नागरीसेवा अंतर्गत आयपीएस या पदावर अधिकारी नियुक्त केला जातो.

आयपीएस होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते ?

आयपीएस होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ही परीक्षा द्यावी लागते.

पुढील वाचन :

  1. महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासन माहिती
  2. पीएसआय म्हणजे काय ?
  3. पायलट बनण्यासाठी काय करावे ?
  4. विद्यार्थी करिअरची चुकीची निवड का करतात ?

Leave a Comment