How to become successful trader in stock market – शेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे ? हा प्रश्न सर्वच ट्रेडर्सला पडत असतो. कारण शेअर बाजारात यशस्वी होणे, ही खूपच अवघड गोष्ट आहे. प्रत्येक जण शेअर बाजारात यशस्वी होईल याची, याची खात्री नसते.
पण आपण पाहतो, आपल्या आजूबाजूला अनेक जण शेअर बाजारात आपले साम्राज्य उभे करतात. याचे कारण म्हणजे, ते बाजारात काम करताना अगदी सावधगिरी आणि अभ्यासपूर्वक काम करतात.
आपण आजच्या या लेखामध्ये शेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे – how to become successful trader in stock market याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आम्ही काही मुद्दे मांडत आहे, त्याचा योग्य वापर करून आपण एक यशस्वी व्यापारी होऊ शकाल.
शेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे – how to become successful trader in stock market

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ? या अगोदर आपण गुंतवणुकदार आणि ट्रेडर्स यामधील फरक समजून घेऊ. काही जण शेअर च्या खरेदी-विक्रीला ट्रेडिंग किंवा गुंतवणुक समजतात. काही जण शेअर बाजाराला जुगार देखील समजतात.
गुंतवणुकदार – गुंतवणूकदार ही अशी व्यक्ती आहे, जी भविष्यातील आर्थिक परताव्याच्या अपेक्षेने किंवा फायदा मिळवण्यासाठी भांडवलाचे गुंतवले जाते. यामध्ये अधिक कालावधी जास्त असतो.
ट्रेडर्स – कंपनीचे शेअर्स किंवा माल बाजारात विकत घेणारा व विकणारा माणूस, जो बाजारभाव पाहून आपला नफा कमावतो. यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी कमी असतो.
गुंतवणूक आणि ट्रेडिंग जर योग्य पद्धतीने असेल, तरच चांगला परतावा मिळू शकेल.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ?
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक कुणाच्या सांगण्यावरून कधीच करू नये. प्रत्येक वेळी फायदा होईल असे नाही, त्यासाठी कोणताही ट्रेड घेताना त्याचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
शेअर मार्केट अभ्यास – स्वतःची एक योजना बनवा
व्यवसाय कोणताही करा त्यात जर योजना नसेल तर तो व्यवसाय सुरळीत चालेल का ? शेअर बाजार ही एक व्यवसाय प्रमाणे नियोजित असायला हवा. त्यामुळे ट्रेडिंग करताना स्वतंत्र ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवायची.
ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवताना टेक्निकल इंडिकेटर चा वापर करावा. ट्रेडिंग सॉफ्टवेअर मध्ये अनेक टेक्निकल इंडिकेटर उपलब्ध केलेले असतात. यातील इंडिकेटर चा प्रयोग समजून एक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवा.
ट्रेडिंग ला व्यवसायाचे स्वरूप द्या
नुसती ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवून उपयोग, त्यासाठी ट्रेडिंग ला व्यवसायाचे स्वरूप द्यायचे. एका व्यवसायाप्रमाणे या क्षेत्रात फायदा आणि नुकसान झेलण्याची तयारी ठेवायची.
बाजारातील चढ-उतार समजून शेअरची खरेदी आणि विक्री करावे. एका रात्रीत करोडपती होईल या आशेने बरेच लोक शेअर मार्केट मध्ये येतात. पण आपण खरी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी, या ठिकाणी एक रात्र देखील करोडपती होऊ शकतो पण त्यासाठी बाजाराचे आवश्यक तितके ज्ञान हवे.
भावना विरहित ट्रेडिंग करा
बरेच नवशिके आणि अनुभवी ट्रेडर एक मोठी चूक करतात. ही चूक म्हणजे शेअर बाजारात भावना महत्त्वाची नाही तरीदेखील ते भावनात्मक ट्रेडिंग करतात. अशा पद्धतीने केला जाणारा व्यापार धोकादायक ठरू शकतो.
यासाठी बाजाराचे सखोल ज्ञान घेणे गरजेचे आहे. बाजाराचे मूलभूत हालचालीवर लक्ष द्यायला हवे.
बाजाराचा ट्रेंडला मित्र बनवा
always follow the trend because trend is your best friend.
अशी इंग्रजी मध्ये वाक्य आहे. ज्याचा अर्थ बाजारातील ट्रेंड हाच आपला खरा मित्र असून तो आपल्याला निश्चितच फायदा मिळवून देत असतो. त्यामुळे बाजारातील ट्रेंड ओळखणे गरजेचे आहे.
ट्रेंड ओळखण्यासाठी ट्रेडिंग सॉफ्टवेअरमध्ये अनेक इंडिकेटर दिले आहेत, ज्याच्या मदतीने सहज ओळखू शकतो.
ट्रेडिंग व्यसन आणि मोठा ट्रेड
बरेच जण शेअर बाजारात यशस्वी होत नाहीत, कारण ते अभ्यासपूर्वक गुंतवणूक करत नाहीत. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांना ट्रेडिंग चे व्यसन लागते, यामुळे उपलब्ध असलेले भांडवल देखील संपुष्टात येते. यामुळे ट्रेनिंग व्यसनापासून दूर राहिलेले कधीही चांगले.
ज्यांना हे व्यसन लागते, त्यांना फायदा आणि नुसकान याबद्दल जास्त अभ्यास करत नाही फक्त ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतात. आपणही जर अश्या व्यसनात असाल तर वेळीच सावध व्हा. काही दिवस ट्रेडिंग बंद केली तरी चालेल. टेक्निकल ऍनालिसिस शिकून आणि समजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा बाजारात प्रवेश करा.
बरेच जण शेअर्स मोठा लॉट उचलत आहे म्हणून आपणही उचलावे आणि त्यातून नफा कमवा. यामुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या मराठीत एक म्हण आहे.
अंथरूण पाहून पाय पसरावेत.
अगदी हीच म्हण या ठिकाणी लागू पडते. विनाकारण मोठा लॉट घेण्याच्या भानगडीत पडू नका. टेक्निकल अनालिसेस च्या आधारे कमीतकमी लॉट मध्ये देखील आपण नफा मिळवू शकतो.
टेक्निकल ऍनालिसिस शिकणे
शेअर मार्केट चा सर्वात मोठा भाग म्हणून पाहिले जाते. यामध्ये विविध अंगांचा अभ्यास केला जातो. शेअर ची किंमत आणि बाजाराची दिशा ओळखणे टेक्निकल ऍनॅलिसिस सोपे करते.
टेक्निकल ऍनालिसिस मध्ये कॅन्डल स्टिक पॅटर्न आणि टेक्निकल इंडिकेटर यांचा अभ्यास करून ट्रेडिंग केले जाते. सर्व सफल ट्रेडर टेक्निकल ऍनालिसिसला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे त्यांची गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त होतो.
या ठिकाणी कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि टाइमफ्रेमचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते. यासाठी हा लेख वाचा – Best time frame for intraday trading
शेअर बाजार माहिती – ट्रेडिंग समजून घेणे
ट्रेडिंग चे बेसिक समजून घेणे. शेअरबाजाराचा कारभार कसा चालतो? शेअर्स चे प्रकार अशा विविध गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. स्टॉक मार्केटमध्ये दररोज होणाऱ्या घडामोडीकडे लक्ष द्यावे लागते.
स्टॉक मार्केट अल्गोरिदम आणि ट्रेडर ची भावना समजून घेणे गरजेचे असते. एखादा ट्रेडर शेअर खरेदी करण्या अगोदर, खरेदी केल्यावर आणि विक्री केल्यानंतर त्याच्या मनाची स्थिती काय आहे? याचे विश्लेषण करावे.
रिस्क मॅनेजमेंट
आपला रिस्क रेवार्ड रेशो समजून घ्या आणि त्यानुसार ट्रेडिंग करा. आपण तितकीच भांडवल गुंतवावे, जितका आपण तोटा सहन करू शकेल. कोणत्याही पद्धतीने आपल्या भांडवलपेक्षा जास्त रक्कम गुंतवू नये.
खरेदी आणि विक्री करताना आपल्या भांडवलाचा ओघ समजून घेणे गरजेचे आहे.
स्टॉप लॉस
स्टॉप लॉस म्हणजे मोठ्या नुकसान होण्यापेक्षा थोडके नुकसान झालेले केव्हाही चांगले. प्रत्येक ट्रेडर्सला टार्गेट माहीत नसले तरी चालेल पण स्टॉप लॉस माहीत पाहिजे. याने आपले भांडवल वाचण्यास मदत होते.
स्टॉप लॉस शिवाय ट्रेडिंग करणे खूप जोखमीचे काम आहे. त्यामुळे स्टॉप लॉस लावणे, ही सवय अंगीकृत करा.
शेअर मार्केट टिप्स घेऊ नका
बऱ्याच दिवसांपासून टेलिग्राम आणि टेलिव्हिजन वर अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? यावर काहीतरी टिप्स देत असतात. या टीप्सला फॉलो करणे खूपच धोकादायक ठरू शकत.
त्यामूळे शेअर बाजारात गुंतवणूक करणे आणि त्यातून नफा कमवणे, हे स्वतः शिकावे लागते. कारण इथे प्रत्येकजण आपापल्या फायद्याचा विचार करून येत असतो.
त्यामुळे कुणावर भरोसा करून आपले भांडवल कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवू नका.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये शेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे – how to become successful trader in stock market मराठीमध्ये पहिले.
त्याचबरोबर या लेखात शेअर बाजारात यशस्वी व्यापारी होण्यासाठी काही नियमावली मराठी माहिती पाहिली आहे.
तुम्हाला How to become successful trader in stock market ही पोस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला शेअर बाजारातील यशस्वी व्यापारी कसे बनावे – how to become successful trader in stock market ही मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली ?
उत्तर – मुंबई शेअर बाजाराची स्थापना 9 जुलै 1875 रोजी झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना कधी झाली ?
उत्तर – राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना इसवी सन 1992 झाली.
मुंबई शेअर बाजाराचे नियंत्रण कोणाकडून केली जाते ?
उत्तर – मुंबई शेअर बाजाराचे नियंत्रण सेबीकडून केले जाते.
वायदे बाजारात व्यवहार करणाऱ्या काय म्हणतात ?
उत्तर – वायदे बाजारात व्यवहार करणाऱ्या फ्युचर्स ट्रेडर्स म्हणतात.