हवामान अंदाज कसा शोधायचा (how to find weather forecast explain in marathi)

By | April 12, 2023

How to find weather forecast in marathi – पुरेसे वस्तुमान असलेल्या वस्तूभोवतालचे वायू, बाष्प आणि धूलिकण ह्यांनी बनलेले आवरण म्हणजे वातावरण होय. एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी हवामान हा शब्द वापरला जातो. हवामान अंदाज बांधता यावा, यासाठी कृषी विद्यापीठांच्या परिसरात हवामान केंद्रे स्थापन केलेली असतात. तसेच भारतीय हवामान विभाग संस्था देखील आहे.

या लेखातून आपण हवामान अंदाज कसा शोधायचा (how to find weather forecast in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

हवामान म्हणजे काय (what is weather explain with an example)

how to find weather forecast in marathi
विषय हवामान
प्रकार वातावरण दर्शविण्यासाठी वापरला जाणारा शब्द

हवामान व्याख्या – एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी हवामान हा शब्द वापरला जातो. हवामान या शब्दासाठी इंग्रजी भाषेत Weather आणि Climate हा प्रतिशब्द आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ एक असला, तरीदेखील यांचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो.

हा लेख जरूर वाचाआकाशातील ढग माहिती मराठी (clouds information in marathi)

WeatherClimate
हा शब्द वातावरणातील अल्पकालीन परिस्थिती वर्तवण्यासाठी वापरला जातो.हा शब्द वातावरणातील दीर्घ कालावधीत झालेल्या बदलांना सूचित करण्यासाठी वापरला जातो.
हा शब्द आगामी दिवस आणि आठवड्याचा अंदाज वर्तवण्यासाठी वापरला जातो.या शब्दाचा वापर उष्णकटिबंधीय, कोरडे, समशीतोष्ण, थंड, ध्रुवीय अशा जागतिक हवामान अंदाज वर्तवण्यासाठी वापरला जातो.
weather and climate difference in marathi

हवामान अंदाज बांधणे का आवश्यक आहे (importance of weather forecasting in marathi)

Importance of weather and climate to agriculture – शेती करण्यासाठी कामाची आखणी केली जाते. यात कामाची विभागणी केली जात असते. पाऊस येण्याअगोदर शेतात पाळी आणि वखार हाकून घ्यावा लागतो, बी-बियाणे पेरण्यासाठी सऱ्या पाडून घ्याव्या लागतात किंवा वाफे पाडावे लागतात. यासाठी पाऊस केव्हा पडेल ? याचा अंदाज बांधता आवश्यक ठरते.

पाऊस एकदा पडायला सुरुवात झाली, की कमी-जास्त प्रमाणात होत असतो. यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे होणारे परिणाम रोखण्यासाठी येणाऱ्या पावसाचा अंदाज बांधणे आवश्यक ठरते.

पावसाचे प्रमाण ओळखून संबंधित ठिकाणी कारखाने, शाळा, कॉलेजला सुट्टी देऊन होणाऱ्या नुकसानापासून बचाव करता येतो.

कामानिमित्त प्रवास करणे किंवा पर्यटनासाठी आवश्यक असे हवामान आहे की नाही ? याचा अंदाज असल्यास, पुढील नियोजन करणे सोपे जाते.

हा लेख जरूर वाचाहवेतील वायू मराठी माहिती (air information in marathi)

हवामान अंदाज कसा शोधायचा (how to find weather forecast in marathi)

भारतीय हवामान विभागाचा अंदाज हा हवामानाच्या अंदाजाचा अधिकृत स्रोत समजला जातो. तसेच कृषी विद्यापीठांच्या परिसरात हवामान केंद्रे स्थापन केलेली असतात. या ठिकाणी हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात.

हवामानाचा अंदाज देणारी स्कायमेट ही खासगी संस्था आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट यांनी वर्तवलेल्या अंदाजाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते.

https://mausam.imd.gov.in/ ही भारतीय हवामान विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. या विभागाचे एक यूट्यूब चॅनल आहे. त्यावर देखील हवामानाच्या अंदाजाविषयी माहिती दिली जाते.

स्कायमेट ची अधिकृत वेबसाइट https://www.skymetweather.com/ ही आहे. स्कायमेट ही संस्था हवामानाच्या अंदाजाची माहिती पुरविते. या वेबसाईटवर हवामानाच्या अंदाजा संबंधीचे नकाशे आणि व्हीडिओ पाहायला मिळतात.

हा लेख जरूर वाचापर्यावरणाचे महत्व माहिती मराठी (paryavaran information in marathi)

सारांश

या लेखातून आपण हवामान अंदाज कसा शोधायचा (how to find weather forecast in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली आहे. यात आपण हवामान म्हणजे काय ? हवामानाचा अंदाज वर्तवणे का आवश्यक ठरते ? याची माहिती देखील आपण जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

भारतात हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्था किती व कोणत्या आहेत ?

भारतात हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्था दोन असून त्या पुढीलप्रमाणे आहेत.
1. भारतीय हवामान विभाग
2. स्कायमेट

भारतीय हवामानशास्त्र संस्था स्थापना केव्हा झाली ?

भारतीय हवामानशास्त्र संस्था स्थापना 17 नोव्हेंबर 1962 रोजी झाली.

जागतिक हवामान शास्त्र दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?

जागतिक हवामान शास्त्र दिन दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

जागतिक हवामान संघटना कोणती आहेत ?

World Meteorological Organization ही जागतिक हवामान संघटना आहे. याची स्थापना 23 मार्च 1950 रोजी जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *