How to get factory license in maharashtra – भारतात औद्योगिक क्रांती होऊन नवनवीन उद्योग आणि उद्योजक निर्माण होत आहेत. जर तुम्हाला देखील कोणता उद्योग चालू करायचा असेल ? तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि परवाने याविषयी सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. कारखाना सुरू करण्यासाठी सरकारने काही तरतुदी केल्या आहेत, या तरतुदींची पूर्तता करून तुम्ही तुमच्या कंपनीची नोंदणी करू शकता.
या लेखातून आपण महाराष्ट्र राज्यात कारखान्याचा परवाना कसा काढायचा (how to get factory license in maharashtra) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
कारखाना कायदा 1948 मराठी (factory act 1948 in marathi)

कारखाना कायदा 1881 हा सर्वात जुना कायदा म्हणून औद्योगिक क्षेत्रात माहीत होता. या कायद्यात अनेक बदल करूनही ते अपुरे पडू लागले. त्यासाठी हा कायदा रद्द करून नवीन कायदा इसवी सन 1948 साली संमत करण्यात आला. या कायद्यानुसार पुढील महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
- कारखान्याची स्थापना, नोंदणी, परवाना आणि नूतनीकरण
- कारखाना कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा
- आरोग्यविषयक तरतुदी
- सुरक्षाविषयक तरतुदी
या लेखातून आपण कारखान्याची स्थापना, नोंदणी, परवाना आणि नूतनीकरण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत.
हा लेख जरूर वाचा – अर्थशास्त्राची व्याख्या मराठी (economics definition in marathi)
कारखाना म्हणजे काय मराठी (factory definition under factories act 1948 in marathi)
एखाद्या इमारतीत किंवा जागेत 10 पेक्षा अधिक कामगार यांत्रिक शक्तीच्या मदतीने किंवा 20 पेक्षा अधिक कामगार विनायंत्राच्या मदतीने वर्षभर उत्पादन करत असतील. त्या ठिकाणास कारखाना असे म्हणतात.
कारखाना कायदा 1948 नुसार राज्यसरकारने यंत्रणा स्थापन केलेली असते. ही यंत्रणा सर्व कारखान्यांचे कायदेशीरपणे व्यवस्थापन करत असते. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अधिकार राज्य सरकारकडे असतात.
बहुतेक राज्यांनी त्यांच्या राज्यांसाठी स्वतंत्र कारखाने नियम तयार केले आहेत. आपल्या महाराष्ट्रात सर्वात व्यापक नियम तयार केले आहेत. या नियमांपासून सूट देण्याचा अधिकार राज्यसरकारला असतो.
असे असले तरीदेखील, ज्या व्यक्तीस कारखाना सुरू करायचा आहे त्याने कारखान्याचा परवाना मिळविणे आवश्यक असते. त्याशिवाय कोणतेही उत्पादन करता येत नाही.
हा लेख जरूर वाचा – कंपनी माहिती मराठी (company information in marathi)
कारखान्याचा परवाना कसा काढायचा (how to get factory license in maharashtra)
परवाना मिळवण्यासाठी खालील माहिती कारखान्याच्या मुख्य निरीक्षकांकडे देऊन अर्ज करायचा असतो.
- कारखाना जागेचे कागदपत्र
- इमारत बांधणीचे नकाशे
- कायदेविषयक पूर्तता
- नोंदणी शुल्क
- उत्पादन संबंधी माहिती
- मालकाचे नाव आणि पत्ता
वरील माहिती अचूक असली तर, कारखाना परवाना मिळण्यास विलंब लागत नाही. जर काही कारणाने तुमचा अर्ज नाकारला गेला, तर याबाबत 30 दिवसांच्या आत राज्यसरकारला दाद मागता येते.
वरील माहिती कारखाना निरीक्षकाकडे दिल्यावर तीन महिन्याच्या आत जर कोणतेच उत्तर आले नाही, तर कारखाना सुरू करण्याचा परवाना मिळाला आहे असे गृहीत धरले जाते.
कारखाना परवाना मिळाल्यानंतर मालकाने कंपनीची पूर्वतयारी करून घ्यायची असते. जसे की, आराखड्यानुसार इमारत बांधणे, कच्च्या मालाची सोय करणे, यंत्र सामग्री जमविणे, कामगाराची नेमणूक करणे.
परवाना मिळाल्यानंतर मालकाने प्रत्यक्ष उत्पादन करण्याअगोदर साधारण 30 दिवस अगोदर खालील माहिती कारखाना निरीक्षकांना देणे गरजेचे असते.
- कारखान्याचे नाव, पत्ता आणि इतर माहिती
- कारखान्याच्या मालकाचे नाव आणि पत्ता
- ताबेदाराचे नाव आणि पत्ता
- पत्रव्यवहार पत्ता
- उत्पादन प्रक्रिया सविस्तर माहिती
- कामगार संख्या
- कारखान्याच्या व्यवस्थापकाचे नाव आणि पत्ता
सारांश
या लेखातून आपण महाराष्ट्र राज्यात कारखान्याचा परवाना कसा काढायचा (how to get factory license in maharashtra) जाणून घेतली आहे. यात आपण कारखान्याचा परवाना काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रक्रिया याची माहिती जाणून घेतली.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
कारखाना सुरू करण्यासाठी परवाना मागणीचा अर्ज कोणाकडे करावा लागतो ?
कारखाना सुरू करण्यासाठी परवाना मागणीचा अर्ज कारखाना परवाना निरीक्षकाकडे करावा लागतो.
जगाचा कारखाना म्हणून कोणता देश ओळखला जातो ?
जगाचा कारखाना म्हणून युनायटेड किंगडम हा देश ओळखला जातो.
सध्या किती उद्योगांसाठी परवाना आवश्यक आहे ?
एखादे दुकान किंवा व्यवसाय स्थापन करण्यासाठी परवाना आवश्यक आहे. पण कमी भांडवल असणाऱ्या व्यवसायास शॉप ॲक्ट काढला तरी चालतो. पण मोठे उद्योग आणि निर्मितीसाठी परवाना आवश्यक आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यात एकूण 174 साखर कारखाने आहेत.
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला ?
प्रवरा सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला.