वाचनासाठी प्रेरणादायी ठरणारे घटक/ बाबी माहिती (how to get inspired to read books in marathi)

How to get inspired to read books in marathi – वाचन वेग बोधनावर अवलंबून असतो. बोधन म्हणजे आकलन होणे. अक्षर, शब्द आणि वाक्यांचे योग्य आकलन झाले की वाचन वेग वाढतो. दृष्टीचा आवाका वाढून वाचन एकाग्रतेने आणि अर्थपूर्ण होते.

एखादी क्रिया करण्यासाठी लागणारे बळ म्हणजे प्रेरणा होय. प्रत्येक व्यक्ती वाचन कोणाच्यातरी प्रेरणेने, काही हेतने किंवा काही गरजांमुळे करत असते. त्यामुळे व्यक्ती व त्यानुसार वाचन होत असते.

मागील लेखात आपण वाचन माहिती मराठी (reading information in marathi) यात आपण वाचनाची व्याख्या, महत्व, फायदे आणि घटक जाणून घेतले होते.

तसेच वाचनाचे प्रकार किती व कोणते (vachanache prakar in marathi) याविषयी देखील सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. या लेखातून आपण वाचानामागील प्रेरणा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

वाचनासाठी प्रेरणादायी ठरणारे घटक/ बाबी माहिती (How to get inspired to read books in marathi)

how to get inspired to read books in marathi
विषय वाचानामागील प्रेरणा
प्रकारवाचन करण्यास प्रोत्साहन देणारे घटक

#1 वय

बालवयात असताना अंगणवाडीत गेल्यावर आपली अक्षर ओळख होते. अक्षर ओळख झाल्यानंतर आपल्याला दिसेल तो मजकूर आपण वाचत चालतो. कारण यातून आपल्याला कुतूहल निर्माण होत असते. त्यामुळे वयाच्या दहा-बाराव्या वर्षी वाचनाचा वेग मोठा असतो. कारण यातून आपल्याला नवीन जगाशी ओळख होत असते.

#2 वातावरण

वाचणाऱ्याच्या अवतीभवती शिक्षित व्यक्ती, विविध विषयावर चर्चा करणारे लोक, किंवा वाचक मंडळ असेल तर आपल्याला देखील वाचावेसे वाटते. पुस्तकांची उपलब्धता, ग्रंथालयाची किंवा सोय स्वतःच्या मालकीचे पुस्तके असल्यास आपल्याला वाचनाची गोडी लागते. अशा वातावरणात व्यक्ती चांगला वाचक बनू शकतो.

#3 गरज

आधुनिक युगातला माणूस गरजे शिवाय काही करत नाही. व्यक्तीला वाचण्याची गरज वाटले पाहिजे आणि ती सातत्याने वाटत राहिली पाहिजे कारण गरज संपली की वाचनही संपते. उदा. परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्याला वाचनाची गरज असते म्हणून तो वाचण्याचा सपाटा लावतो.

#4 उपयुक्तता

वाचकाला वाचनाची उपयुक्तता जर सतत वाटत राहिले तर तो वाचत राहील. वकील, सावकार, वरिष्ठ यांनी लिहिलेला मजकूर स्वतःला वाचता आला पाहिजे. नाहीतर अर्थाचा अनर्थ होईल. सरकारी आणि खासगी संस्थांनी दिल्याल्या नोटिसा वाचल्या पाहिजे, नाहीतर व्यवहारात अडथळे निर्माण होतात. ज्ञानापासून वंचित राहिल्यास आपल्या व्यवसायातील उत्पन्न घटत राहील असे वाटत राहिले की वाचन होत राहील.

#5 सुकरता

व्यवहार जलद होण्यासाठी वाचन आवश्यक असते. जाहिराती, हस्तपत्रिका, निवेदने, सूचना निरनिराळ्या स्वरूपात आपल्यापर्यंत येत असतात. त्या वाचल्यावर खरेदी, विक्री, प्रतिक्रिया चटकन व्यक्त होऊन व्यवहार जलद होतात.

#6 विश्वसनीयता

ऐकीव माहितीपेक्षा आपण डोळ्याने वाचलेला मजकूर खात्रीपूर्ण असतो. त्याची विश्वसनीयता जास्त असते. त्यामुळे महत्वाची कागदपत्र आणि करार लिखित स्वरूपात करता असतात.

#7 स्वभाव

हळव्या, भावुक, संवेदनशील, बौद्धिक कामे करणारा, सत्वशील आणि सर्जनशील व्यक्तींना वाचनाचा छंद असतो.

#8 व्यवसाय

वाचन हेच ज्यांचे भांडवल आहे, असे अनेक व्यवसाय असतात. जसे की, शिक्षक, नेता, वकील, दुभाषी, वृत्तनिवेदक, भाषांतरकार, प्रकाशक, संगणकचालक, सचिव, कार्यवाह, ग्रंथपाल, मुद्रक, विद्यार्थी, मुद्रित शोधक, लेखक, संशोधक इत्यादी काम करणाऱ्यांना वाचन करावे लागतात. कारण वाचनावर या व्यवसायाचे यश, अपयश, श्रेय अवलंबून असते.

#9 शिक्षण

विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, लेखक यांना शिक्षणासाठी वाचन करावे लागते. शिक्षण क्षेत्र सोडले तरी व्यवसाय किंवा नोकरी यात सतत होणाऱ्या बदलांशी एकरूप होण्यासाठी त्या क्षेत्रातील ज्ञान वाचनातून आत्मसात करावे लागते.

#10 स्पर्धा

सकस, अध्यावत, गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट व लवकरात लवकर यश मिळवण्यासाठी वाचन उपयुक्त ठरते. आजच्या काळात सर्वच ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळतात, या स्पर्धेत टिकायचे असेल तर वाचन अतिशय महत्त्वाचे आहे.

#11 आनंद

प्रत्येक व्यक्तीला शांती, आनंद आणि समाधान हवे असते. वाचन केल्याने यातील सर्व मिळण्यास मदत होते.

#12 कुतूहल

आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर पुस्तकात सापडू शकते. त्यामुळे आपण कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी वाचन करत असतो. काही वेळेस आपल्याला काहीतरी कुतूहल वाटत असते, त्यासाठी वाचन करतो. इतिहासातून पानाचा उलगडा करण्यासाठी आपण विविध पुस्तके वाचतो.

एकाग्रतेने कसे वाचन करावे (how to improve concentration and focus in marathi )

Concentration meaning in marathi – एकाग्रता म्हणजे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या शक्तींना एकच एक संवेदक निवडून त्या दिशेने वळविणे होय.

  • घरात वाचन करत असताना गोंगाट ऐकू येत असेल तर, दार लावून घ्या आणि पंखा चालू करा. कानात बोळे घाला.
  • वाचन करताना जागा शांतेतेची निवडा.
  • वाचन सुरू करण्याअगोदर एक दोन मिनिटे डोळे मिटून शांतपणे बसा. असे केल्याने मनातील अस्वस्थता निघून जाते.
  • आपली प्रेरणा कामला लावून लक्षपूर्वक वाचन केल्यास, आपले वाचन कौशल्य विकसित होते. आपला आत्मविश्वास वाढतो.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण वाचनामागील प्रेरणा माहिती मराठी (how to get inspired to read books in marathi) जाणून घेतली आहे. तसेच आपण एकाग्रतेने कसे वाचन करावे (how to improve concentration and focus in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली.

जर तुम्हाला वाचनासाठी प्रेरणादायी ठरणारे घटक/ बाबी (vachanasathi preranadayi tharnare ghatak) ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पुस्तके आपल्याला काय शिकवतात ?

पुस्तके आपल्याला कल्पनेच्या जगात घेऊन जातात. स्वप्न दाखवतात, पण त्याचबरोबर आपण पहात असलेले, ज्यामध्ये आपण जगत असतो ते जगही समजून घ्यायला शिकवतात.

थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात ?

थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात. तशी ते स्वतः कृती करून दाखवतात आणि त्यांच्या या कृतीतून ते समाजाला शिकवण देतात.

Leave a Comment