How To Get Rahivashi Dakhla Online Marathi – रहिवासी दाखला म्हणजे एखादा व्यक्ती कोणत्या ठिकाणचा (राज्याचा) राहणारा आहे, हे दर्शविणारे अंतिम प्रमाणपत्र होय. विविध सरकारी योजना, नोकरी, शिक्षण, व्यवसाय तसेच इतर ठिकाणी पत्ता पुरावा म्हणून रहिवासी दाखल्याचा उपयोग होत असतो.
रहिवासी दाखला हे प्रमाणपत्र राज्य सरकारकडून देण्यात येते. जर तुम्ही रहिवासी दाखला कसा काढावा (How To Get Rahivashi Dakhla Online Marathi) याविषयी माहिती शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
कारण या लेखातून आपण रहिवासी दाखला ऑनलाइन पद्धतीने कसा काढायचा, त्यासाठी लागणारे कागदपत्रे, आणि वेळ याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
रहिवासी दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Rahivashi dakhla documents in marathi)
ओळखीचा पुरावा – पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, निमशासकीय ओळखपत्र, आरएसबीवाय कार्ड, वाहनचालक परवाना
पत्त्याचा पुरावा – पासपोर्ट, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, 7/12 आणि 8 अ चा उतारा
वयाचा पुरावा – जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा – रहिवासीचा तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासीचा कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासीचा ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला
इतर कागदपत्रे – वीज देयक, भाडेपावती, रेशनकार्ड, दूरध्वनी बिल, विवाहाचा दाखला, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, पतीच्या रहिवासाचा दाखला, एक पासपोर्ट आकाराचा फोटो
रहिवासी दाखला कसा काढावा (How To Get Rahivashi Dakhla Online Marathi)

मित्रांनो, रहिवासी दाखला काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने आपले सरकार या नावाने एक ऑनलाइन पोर्टल चालू केले आहे. या पोर्टलवर सरकारने अनेक प्रमाणपत्रे मिळविण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्जदाराने लॉग इन आयडी तयार करून आवश्यक ती माहिती, कागदपत्रे आणि शुल्क भरून अर्ज करावा लागतो.
याव्यतिरिक्त तुम्ही महासेवा केंद्र किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू केंद्राच्या मदतीनेही डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.
साधारणपणे डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर 15 दिवसांनंतर डोमेसाइल प्रमाणपत्र मिळते. जर 15 दिवसात प्रमाणपत्र मिळाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही अपील करू शकता.
सारांश
मित्रांनो, मी आशा करतो की रहिवासी दाखला कसा काढावा (How To Get Rahivashi Dakhla Online Marathi) याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर हा लेख तुमच्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद….