सातबाराचा उतारा ऑनलाईन पद्धतीने कसा काढावा ?

how to get satbara utara online marathi – जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा म्हणून शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे सातबारा उतारा दिला जातो. गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती साताबाऱ्याच्या स्वरूपात दिली जाते.

गाव नमुना 7 हे अधिकारपत्रक तर गाव नमुना 12 हे पीक-पाहणी पत्रक आहे. जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.

सात बाराचा उतारा मिळवण्यासाठी किती किचकट प्रक्रिया असते, हे तुम्हाला माहीतच असेल. पण आता मात्र कोणत्याही कार्यालयात न जाता अगदी घरबसल्या तुम्ही डिजिटल सातबारा उतारा काढू शकता.

या लेखातून आपण सातबाराचा उतारा ऑनलाईन पद्धतीने कसा काढावा (how to get satbara utara online marathi) याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सातबाराचा उतारा ऑनलाईन पद्धतीने कसा काढावा (how to get satbara utara online marathi)

how to get satbara utara online marathi

महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांना व राज्यातील इतर नागरिकांना त्यांच्या शेती आणि जमिनीशी संबंधित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे.

या वेबसाइटवरून तुम्ही ऑनलाईन खसरा-खतावणी रेकॉर्डसहित जमिनीशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता.

डिजिटल सातबारा काढण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

पहिली पायरी – https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr ही सातबाराची अधिकृत वेबसाईट उघडा.

दुसरी पायरी – जर तुम्ही पहिल्यांदा सातबारा घेत असाल तर OTP Based Login वर Click करून चालू असलेला मोबाईल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करा.

तिसरी पायरी – तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, आलेला OTP पुढील रकान्यात टाकून Verify OTP वर क्लिक करा.

चौथी पायरी – यांनतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये सातबारा ठिकाणाचा पत्ता भरावा लागतो, यात तुमचा अचूक जिल्हा, तालुका, गाव, निवडा. यानंतर तुमच्या जमिनीचा गट नंबर आणि सर्वे नंबर प्रविष्ट करायचा आहे.

पाचवी पायरी – डिजिटल सातबारा उतारा काढण्यासाठी 15 रुपये द्यावे लागतात. ही रक्कम देण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरील Recharge या पर्यायावर क्लिक करा.

सहावी पायरी – 15 रुपयांचे payment केल्यावर तुमच्यासमोर Download 7/12 हा पर्याय दिसू लागेल, यावर क्लिक केल्यास तुमचा डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड होईल.

अशा प्रकारे तुम्ही अगदी 15 रुपयांत घरबसल्या सातबारा उतारा मिळवू शकता. हा उतारा सर्व शासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी वापरता येतो.

सारांश

या लेखातून आपण डिजिटल सातबारा उतारा ऑनलाईन पद्धतीने कसा काढायचा (how to get satbara utara online marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला सातबारा उतारा मिळवताना कसलाही अडचण येत असेल तर, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या समस्यांचे निराकरण करताना आम्हाला नक्कीच आनंद होईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

सातबारा उतारा म्हणजे काय ?

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1971 अंतर्गत शेती व जमिनीची मालकी हक्क दाखविणारा पहिला व अंतिम पुरावा म्हणून सातबारा उतारा दिला जातो.

सातबारा उताऱ्यावर कोणती माहिती असते ?

सातबारा उताऱ्यावर जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती आहे याविषयीची माहिती दिलेली असते. तसेच सदरची जमीन त्या व्यक्तीकडे कशी आली हे सातबारा उताऱ्यावरून कळते. शेताचा नकाशा, भूधारण पद्धती, बँकेचे कर्ज, हंगामी पिके कोणती घेतली अशी बरीच माहिती सात बाऱ्यात असते.

पुढील वाचन :

  1. रब्बी हंगामातील पिकांची नावे
  2. शेतकरी समस्या व उपाय माहिती मराठी
  3. नैसर्गिक आपत्ती भूकंप माहिती मराठी
  4. झाडांचे उपयोग माहिती

Leave a Comment