शेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा ?

By | October 1, 2022

How to identify trend in stock market – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ? हा जसा अवघड प्रश्न आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अवघड शेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा ? हा प्रश्न आहे. भारतीय शेअर मार्केट मध्ये पैसा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासाठी बाजाराचा अभ्यास असायला हवा.

Trend is your best friend…

याचा अर्थ असा की, ट्रेंड हा आपला खरा मित्र आहे. तोच आपले पैसे शेअर बाजारात वाढवून देऊ शकतो. शेअर मार्केट मध्ये ट्रेंड न समजता काम करणे, अतिशय जोखमीचे काम आहे.

गुंतवणूक आणि ट्रेडिंग करण्यासाठी योग्य ट्रेड निवडला पाहिजे. ट्रेंड न समजता बाजारात काम करणे म्हणजे जुगार खेळण्यासारखा आहे.

शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी योग्य ट्रेड घेणे गरजेचे आहे. आजच्या या लेखामध्ये आपण शेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा – How to identify trend in stock market याबद्दल माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत.

शेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा – How to identify trend in stock market

How to identify trend in stock market
शेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा ?

शेअर बाजारात ट्रेंड ओळखणे, ही नवीन ट्रेडर्स साठी पहिली पायरी आहे. ही गोष्ट समजून घेण्याकरिता ट्रेंड म्हणजे काय ? हे समजून घेणे गरजेचे आहे. ट्रेंड म्हणजे बाजाराची चालू असलेली दिशा किंवा बाजाराची कोणत्या दिशेने हालचाल होणार आहे . ही दिशा शेअर बाजारातील शेअर्सच्या खरेदी आणि विक्री किंमत यावरून ठरत असते.

ट्रेंड हा मुख्यतः तीन स्वरूपात पाहायला मिळतो.

  1. Uptrend (तेजी)
  2. Downtrend (मंदी)
  3. Sideways (एकच ठिकाणी ट्रेड करणे)

हा लेख वाचाशेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे – how to become successful trader in stock market

तेजी – Uptrend information in marathi

शेअर बाजारात स्टॉक पुरवठा (supply) पेक्षा मागणी (demand) अधिक असल्याने तेजी येत असते. तेजीच्या ट्रेंड मध्ये कँडलस्टिक पॅटर्न higher high आणि higher low बनवत असतो, आणि चार्टमध्ये वरच्या बाजूला जाताना दिसतो.

यावरून तुम्ही बाजारातील तेजी ओळखू शकता. यावेळी बाजारात खरेदी करण्याचा सिग्नल मिळतो. अश्या वेळेस योग्य ट्रेड निवडला तर फायदा निश्चितच होतो.

मंदी – Downtrend information in marathi

शेअर बाजारात स्टॉक पुरवठा (supply) जास्त असतो, आणि मागणी (demand) कमी असल्याने मंदी येत असते. मंदी ट्रेंड मध्ये कँडलस्टिक पॅटर्न lower high आणि lower low बनवत असतो, आणि चार्टमध्ये कँडल खालच्या बाजूला जाताना दिसतो.

यावरून तुम्ही बाजारातील मंदी ओळखू शकता. यावेळी बाजारात विक्री करण्याचा सिग्नल मिळतो. अश्या वेळेस योग्य ट्रेड निवडला तर फायदा निश्चितच होतो.

एकच ठिकाणी ट्रेड करणे – sideways trend information in marathi

शेअर बाजारात स्टॉक पुरवठा (supply) आणि मागणी (demand) एकसमान असल्याने हा ट्रेंड येत असतो. हा ट्रेंड ओळखताना लक्षात ठेवा – चार्टमध्ये एका ठराविक रेंज मध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असतो.

यावरून तुम्ही बाजारातील Sideways trend ओळखू शकता. यावेळी बाजारात विक्री किंवा खरेदी करू नये. अशा वेळेस शक्यतो शेअर बाजारात प्रवेश करणे टाळावा.

शेअर बाजारात ट्रेंड ओळखण्याची पद्धत – How to identify trend in stock market

शेअर बाजारात ट्रेंड ओळखण्यासाठी तुम्ही स्टॉक ब्रोकरचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरू शकता. या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला काही टेक्निकल इंडिकेटर उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाने तुम्ही trading view देखील वापरू शकता.

मी तुम्हाला ट्रेंड ओळखण्यासाठी दोन पद्धती सांगत आहे. ज्यामधील पाहिली पद्धत – टेक्निकल इंडिकेटर वापरून तर दुसरी पद्धत कॅन्डलस्टिक पॅटर्न चा अभ्यास करून.

टेक्निकल इंडिकेटर मध्ये – MACD आणि सुपर ट्रेंड हे दोन इंडिकेटर शेअर बाजारातला ट्रेंड ओळखण्यास मदत करतात.

कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये – सपोर्ट आणि रेसिस्टॅन्सच्या मदतीने ट्रेंड ओळखता येतो.

चार्टमध्ये कॅन्डलस्टिक higher resistance आणि higher support बनवत वरच्या बाजूला जात असेल, तर शेयर मार्केट मध्ये तेजी (uptrend) आहे.

चार्टमध्ये कॅन्डलस्टिक lower resistance आणि lower support बनवत खालच्या बाजूला जात असेल, तर शेयर मार्केट मध्ये मंदी (downtrend) आहे.

एकच ठिकाणी ट्रेड करणे – sideways trend हा ट्रेड ओळखता येत नाही.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये शेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा – How to identify trend in stock market याबद्दल माहिती मराठीमध्ये पाहिली.

त्याचबरोबर या लेखात शेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखावा ? ट्रेंडचे प्रकार – uptrend, downtrend आणि sideways trend याविषयी मराठी माहिती पाहिली आहे.

तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भाग बाजार म्हणजे काय ?

उत्तर – शेअरचा मराठीत अर्थ आहे भाग, शेअर बाजारात शेअर विकत घेणे म्हणजे कोणत्याही कंपनीचा भाग विकत घेणे होय.

नाणे बाजार म्हणजे काय ?

उत्तर – नाणेबाजार हा स्टॉक मार्केट प्रमाणेच आहे, स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक ची खरेदी विक्री केली जाते. त्याचप्रमाणे नाणे बाजारामध्ये वेगवेगळ्या नाण्यांची म्हणजे चार जणांची देवाण-घेवाण केली जाते.
उदाहरणार्थ. भारतीय रुपया आणि अमेरिका डॉलर

वस्तू बाजार म्हणजे काय ?

उत्तर – वस्तू बाजार हा जीवनोपयोगी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी विक्री करता येईल असे ठिकाण असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *