
how to learn english at home mahiti – भाषा ही एकाचे विचार दुसऱ्यापर्यंत पोहचवण्याचे एक साधन आहे. इंग्रजी ही जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक आहे. आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे इंग्रजी भाषा शिकणे थोडेसे अवघड वाटते.
या लेखातून आपण सोप्या पद्धतीने इंग्रजी भाषा कशी शिकावी (how to learn english at home mahiti) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
इंग्रजी भाषा मराठी माहिती (english language information in marathi)
इंग्रजी भाषा जगातील सर्वात जास्त बोलली आणि शिकवली जाणारी भाषा आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड ह्या देशांमध्ये इंग्रजी प्रमुख भाषा म्हणून वापरली जाते.
कित्येक देशांची दुसरी भाषा आणि शासकीय भाषा म्हणून इंग्रजी भाषा वापरली जाते. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा असे म्हणतात. विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात इंग्रजी भाषा अत्यंत समॄद्ध आहे.
जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण अशा विविध बाबीसाठी ही भाषा उपयुक्त ठरते.
इंग्रजी भाषा शिकण्याची सोपी पद्धत (how to learn english at home mahiti)
इंग्रजी भाषा आपली मातृभाषा नाही. त्यामुळे ती शिकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळू शकत नाही. पण असे वातावरण निर्मिती करता येते. शक्य असल्यास इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम बनवू शकता.
महाराष्ट्रात मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकवली जाते. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अश्या कॉलेजची निवड करावी जेथे सगळे विषय इंग्रजी भाषेत शिकवले जातात.
त्यामुळे आपल्या कानावर सतत इंग्रजी भाषेतील शब्द पडत राहतील. सोबतच टीव्हीवर इंग्रजी भाषेतील कार्यक्रम बघावे. तसेच इंग्रजीमधून वर्तमानपत्रे, मासिके आणि पुस्तके वाचण्याचा सराव करावा.
भाषा ही अक्षर, शब्द आणि वाक्यांनी बनली आहे. पण फक्त शब्दाचे स्पेलिंग किंवा अर्थ पाठ करून फारसा उपयोग होत नाही. तर त्या शब्दांचा योग्य संदर्भासहीत वाक्यात उपयोगही करता आला पाहिजे. यासाठी इंग्रजी भाषेतील शब्दसंपत्ती वाढवावी लागेल.
पुरेसे शब्द भांडार असेल तर भाषा शिकणे अधिक सोपे जाते. त्यामुळे वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नवीन शब्द आणि त्याचा अर्थ टिप्पणी करून ठेवावा.
इंग्रजी भाषा परिपूर्ण शिकण्यासाठी व्याकरण खूप गरजेचे आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील व्याकरण आणि शब्दसंपदा विकसित करावी. स्वतः छोटी छोटी वाक्य बनवून आपले मित्र मैत्रीण यांच्यासोबत बोलण्याचा सराव करा.
इंग्रजी भाषा कशी शिकावी (how to learn english step by step mahiti)
आपण दैनंदिन जीवनात इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. सोशल मीडिया, ऑनलाईन चित्रपट पाहणे, ईबुक वाचणे, चॅटिंग करणे अशा कितीतरी गोष्टी आपण इंटरनेटच्या मदतीने करतो.
या गोष्टी करत असताना जाणीवपूर्वक इंग्रजी भाषेचा वापर करावा. उदा. सोशल मीडियाचा वापर करताना इंग्रजी भाषेतील फीड पहावे, यूट्यूब वरील इंग्रजी कंटेंट पहावे, इंग्रजीतून पॉडकास्ट आणि गाणी ऐकावी.
तुमच्या आवडीचा विषय निवडून ब्लॉग लेखन करावे. गाणी, कविता, अर्ज, ईमेल, निबंध, कल्पनाविस्तार किंवा एखाद्या गोष्टीविषयी स्वतःचे मत इंग्रजीत लिहिण्याचा सराव करावा.
सारांश
या लेखातून आपण इंग्रजी भाषा कशी शिकावी (how to learn english at home mahiti) याविषयी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
पुढील वाचन :