How to port sim card marathi – मित्रांनो, तुम्ही वापरत असलेल्या सिम कार्ड कंपनीचे टॅरिफ पॅकेज महाग असल्याने तुम्ही त्रस्त असाल. तसेच नेटवर्क प्रॉब्लेम किंवा इतर कारणांनी तुम्ही टेलिकॉम ऑपरेटर बदलण्याचा विचार करत असाल.
सिम ऑपरेटर बदलण्यासाठी तुमचा फोन नंबर बदलणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटत असल्यास ते चुकीचे आहे. आता तुम्ही कोणताही सिम ऑपरेटर बदलताना तुमचा वर्तमान फोन नंबर ठेवू शकता.
या लेखातून आपण सिम कार्ड पोर्ट कसे करावे (How to port sim card marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सिम कार्ड पोर्ट कसे करावे (How to port sim card marathi)

Requirements |
---|
वर्तमान सिम ऑपरेटरमध्ये 3 महिने पूर्ण असावे. |
वर्तमान सिम कार्डचे बिल भरलेले असावे. |
Step 1 – सर्वात पहिले तुमच्या वर्तमान मोबाईल नंबर वरून पुढीलप्रमाणे एसएमएस पाठवा. PORT स्पेस <मोबाइल नंबर जो तुम्हाला पोर्ट करायचा आहे> 1900 वर पाठवा. उदा. PORT 0123456789
Step 2 – यांनतर तुमच्या मोबाइल नंबरवर 8 अंकी UPC (युनिक पोर्टिंग कोड) संदेश प्राप्त होईल. हा UPC क्रमांक 15 दिवसांसाठी वैध असतो. पण तुम्ही शक्य होईल तितक्या लवकर नवीन सिम कंपनीच्या स्टोरला भेट द्यावी.
Step 3 – तुम्ही स्टोरमध्ये गेल्यावर 8-अंकी UPC नंबर आणि मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करावी लागतात. यासाठी आधार कार्ड सोबत न्यावे.
Step 4 – स्टोरमधील ग्राहक कार्यकारी अधिकारी नंबर पोर्टेबिलिटीसाठी आवश्यक प्रक्रिया पुर्ण करून तुम्हाला नवीन सिम कार्ड किट देईल.
Step 5 – यामध्ये सिमकार्ड आणि सिम वापरण्याचे नियम असतात. पोर्टेबिलिटी प्रक्रिया पुर्ण केल्यावर पुढील 3 दिवसात तुमचा नंबर नवीन ऑपरेटरमध्ये स्विच होईल.
Step 6 – मोबाईल नंबर यशस्वीरित्या पोर्ट झाल्यावर जुन्या सिम कार्डची Network Range निघून जाईल. यानंतर तुम्हाला नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकायचे आहे. तुमचे नवीन सिम कार्ड चालू होईल.
अशा प्रकारे तुम्ही एका नेटवर्क ऑपरेटिंग कंपनीकडून कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटरमध्ये स्विच करू शकता.
सारांश
या लेखातून आपण सिम कार्ड पोर्ट कसे करावे (How to port sim card marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठीं कोणती कागदपत्रे लागतात ?
मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी ओळखपत्र व पत्ता पुरावा असणारे कागदपत्रे लागतात.
उदा. आधार कार्ड, वाहन चालक परवाना
मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी काय नियम असतात ?
मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी पुढील नियम असतात.
1. वापरकर्त्याने जुन्या ऑपरेटरची सेवा किमान 90 दिवस वापरणे अनिवार्य आहे. यानंतरच तो सिम पोर्टिंगची विनंती करू शकतो.
2. MNP करताना तुमचे प्रीपेड किंवा पोस्टपेडचे बिल भरलेले असावे.
3. MNP करताना लागणारी कागदपत्रे पूर्ण असावी.
नंबर पोर्ट करण्यासाठी किती वेळ लागतो ?
नंबर पोर्ट करण्यासाठी जास्तीत जास्त 7 व कमीत कमी 3 दिवस इतका वेळ लागतो.
मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी विनंती कशी रद्द करावी ?
मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी विनंती रद्द करण्यासाठी पुढीलप्रमाणे मेसेज करा.
CANCEL <तुमचा मोबाईल नंबर> आणि 1900 वर पाठवा.
पुढील वाचन :