शेअर होल्डींग म्हणजे काय (how to read shareholding pattern of a company)

By | November 11, 2022

How to read shareholding pattern of a company – कोणत्याही कंपनीचा शेअर म्हणजेच समभाग खरेदी करत असताना प्रत्येक गुंतवणूकदार त्या कंपनीच्या मूलभूत विश्लेषण करत असतो. शेअर होल्डिंग पॅटर्न हा स्टॉक्सच्या मूलभूत विश्लेषण करण्याच्या पद्धतीमध्ये महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. या पॅटर्नमध्ये कंपनीमध्ये कोणी गुंतवणूक केली आहे, याची माहिती दिलेली असते.

या माहितीच्या आधारे आपण चांगला स्टॉक निवडून संपत्ती निर्माण करू शकतो. यामुळे तुम्हाला देखील शेअर होल्डिंग पॅटर्न काय आहे आणि शेअर होल्डिंग पॅटर्न कसा समजावून घ्यावा याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.

आजच्या या लेखात आपण शेअर होल्डींग म्हणजे काय (how to read shareholding pattern of a company) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने कंपनीच्या मूलभूत विश्लेषण करताना कोणी गुंतवणूक केली आहे याचा आधार घेऊन हा स्टॉक आपल्याला कसा परिणाम देऊ शकेल, याचा अंदाज बांधता येईल.

हा लेख जरूर वाचा – स्टॉकचे मूलभूत विश्लेषण कसे समजून घ्यावे (how to understand fundamental analysis in marathi)

शेअर होल्डींग म्हणजे काय (how to read shareholding pattern of a company)

how to read shareholding pattern of a company in marathi
विषयशेअर होल्डींग पॅटर्न
प्रकारसमभाग मूलभूत विश्लेषण (घटक)
उपयोगकंपनीच्या मूलभूत विश्लेषण करताना

शेअर याचा मराठी अर्थ (share meaning in marathi) समभाग असा आहे. होल्डींग याचा मराठी अर्थ (holdings meaning in marathi) राखून ठेवणे असा आहे. शेअर होल्डिंग म्हणजे (shareholding meaning in marathi) समभागांची मालकी असणे.

जेव्हा एखादी कंपनी तिच्या व्यापार विस्तारासाठी शेअर्स जारी करते तेव्हा विविध प्रकारचे गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यांचा कंपनीत किती हिस्सा आहे, ही माहिती प्रत्येक गुंतवणुकदारास असणे आवश्यक आहे.

शेअर होल्डिंगचे प्रकार माहिती (types of shareholding pattern in marathi)

TypesMeaning in marathi The components it contains
Promotersप्रवर्तकमालक किंवा व्यवस्थापक वर्ग
FII (Foreign Institutional Investors)परदेशी संस्थागत गुंतवणूकदारहेज फंड, विमा कंपन्या, पेन्शन फंड, गुंतवणूक बँका आणि म्युच्युअल फंड
DII (Domestic Institutional Investors)देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारभारतीय म्युच्युअल फंड, भारतीय इन्शुरन्स कंपनी, स्थानिक पेन्शन फंड, वित्तीय संस्था आणि बँका
Publicसार्वजनिकवैयक्तिक गुंतवणूकदार

शेअर होल्डिंगचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. ज्यात पहिला प्रकार म्हणजे प्रवर्तक समभागधारक (shareholding pattern promoters) आणि दुसरा प्रकार म्हणजे सार्वजनिक समभागधारक (Public Shareholding) होय.

प्रवर्तक समभागधारक (promoters shareholding) यामध्ये कंपनीच्या प्रवर्तक यांनी केलेली गुंतवणुक असते. यात प्रामुख्याने कंपनीचे संस्थापक यांचा समावेश असतो. ज्या प्रवर्तकाचा जास्त हिस्सा कंपनीमध्ये असेल त्याला प्रमुख व्यवस्थापकीय निर्णय घेण्याचे काम दिले जाते. तसेच त्यांचा कंपनीच्या संचालक मंडळातही मोठा सहभाग असतो.

सार्वजनिक समभागधारक (Public Shareholding) यामध्ये प्रवर्तक नसलेल्या व्यक्ती किंवा संस्थांद्वारे केलेली गुंतवणूकीचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने म्युच्युअल फंड, बँका किंवा वित्तीय संस्था, विमा कंपन्या, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, थेट विदेशी गुंतवणूकदार किंवा एफडीआय, सामान्य जनता यांनी केलेली गुंतवणूक असते.

हा लेख जरूर वाचा – गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक (investment vs trading in marathi)

शेअर होल्डिंग पॅटर्न नियम माहिती (sebi guidelines for shareholders)

सेबी (security exchange board of India) यांच्या नियमानुसार एखादा व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही कंपनीमध्ये एक टक्क्याहून अधिक समभाग खरेदी करत असेल, तर अशा गुंतवणूकदाराचा तपशील कंपनीने उघड केला पाहिजे. याविषयी वेळोवेळी अद्यावत माहिती प्रत्येक तीन महिन्यांनी करावी.

प्रवर्तक आणि सार्वजनिक शेअरहोल्डिंग व्यतिरिक्त, कंपनीमध्ये सार्वजनिक नसलेले किंवा प्रवर्तक नसलेले शेअरहोल्डिंग देखील असू शकते शेअरहोल्डिंग पॅटर्नचा खुलासा ज्या स्टॉक एक्स्चेंजवर कंपनी सूचिबद्ध आहे त्या स्टॉक एक्स्चेंजला करावी.

प्रवर्तकांनी कोणत्या कारणास्तव त्यांचे शेअर्स गहाण ठेवल्यास, शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये प्रवर्तकांनी अशा तारणाचे तपशील आणि तारण ठेवलेल्या समभागांचे प्रमाण जाहीर केले पाहिजे.

शेअर होल्डिंग पॅटर्न कसा पाहायचा (how to find shareholding pattern of a company)

शेअर होल्डिंग पॅटर्न प्रत्येक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असते. त्याचप्रमाणे प्रत्येक कंपनी स्टॉक एक्सचेंजकडे रजिस्टर आहे, त्या नोंदणीकृत स्टॉक एक्सचेंजकडे शेअर होल्डिंग पॅटर्न विषयी माहिती दिलेली असते. याव्यतिरिक्त कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते.

शेअर होल्डिंग पॅटर्न कसा समजून घ्यावा (how to understand shareholding pattern in marathi)

प्रवर्तकांची उच्च भागीदारी (promoters investment) – प्रवर्तकाची मोठ्या प्रमाणावर असणारी भागीदारी ही कंपनीच्या गुंतवणुकीसाठी अनुकूल मानली जाते. प्रवर्तकांची उच्च भागीदारीचा अर्थ असा होतो की, कंपनीच्या होणाऱ्या नफ्यावर आणि कंपनीच्या उज्ज्वल भवितव्यावर प्रवर्तकाचा भरोवसा आहे.

विदेशी गुंतवणूकदार (foreign investors) – परराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या राष्ट्राचा झपाट्याने होणारा विकास महत्त्वाचा असतो, यातून परराष्ट्र गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात परतावा मिळविण्यासाठी आपली गुंतवणूक विदेशी कंपन्यांमध्ये करत असतात. त्यामुळे ज्या कंपनीत प्रवेश गुंतवणूकदार असतात त्या कंपनीचे उत्पादन आणि सेवा उच्च आहे असे मानले जाते. या कंपनीतून मिळणारा परतावा हा चांगला असतो.

कोणत्याही शेअर निवडणे अगोदर त्याचे शेअर होल्डिंग पॅटर्न बघणे आवश्यक असते. कंपनीच्या शेअर होल्डिंगमध्ये मागील तीन महिन्यात झालेला बदला कडे लक्ष देणे आवश्यक असते. प्रवर्तककाकडून स्वतःच्या हिस्सा विक्री करणे किंवा गहाण ठेवणे ही गोष्ट शेअर खरेदी करण्यासाठी नकारात्मक बाब मानली जाते. तर याउलट वित्तीय संस्था आणि विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक शेअर खरेदी करण्यासाठी सकारात्मक बाब मानली जाते.

हा लेख जरूर वाचा – कंपनी माहिती मराठी (company information in marathi)

सारांश

शेअर होल्डींग म्हणजे काय (how to read shareholding pattern of a company) याविषयी आपण माहिती जाणून घेतली. तसेच आपण शेअर होल्डिंग मधील महत्त्वाचे घटक (shareholding pattern of a company in marathi) आणि शेअर खरेदी करण्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक बाजू (share market buy and sell tips in marathi ) याविषयी देखील माहिती अभ्यासली.

शेअर होल्डींग म्हणजे काय (how to read shareholding pattern of a company) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

एफ.आय.आय म्हणजे काय (fii meaning in marathi) ?

एफ.आय.आय म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार, यामध्ये हेज फंड, विमा कंपन्या, पेन्शन फंड, गुंतवणूक बँका आणि म्युच्युअल फंड यांचा समावेश होतो.

डी.आय.आय म्हणजे काय (dii meaning in marathi) ?

डी.आय.आय म्हणजे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार, यामध्ये भारतीय म्युच्युअल फंड, भारतीय इन्शुरन्स कंपनी, स्थानिक पेन्शन फंड, वित्तीय संस्था आणि बँका यांचा समावेश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *