चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय माहिती मराठी (how to remove pimple scars naturally at home)

By | November 20, 2022

how to remove pimple scars naturally at home – साधारणपणे वयवर्षे 13 ते 26 यामधील तरुणांना तारुण्यपिटीका येत असतात, याला पिंपल्स किंवा मुखदुषिका असे म्हटले जाते. साधारणपणे मुरूम चेहऱ्यावर धूळ बसल्याने होत असते. यावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. पण सर्वच औषध काम करतील असे होत नाही. काही जणांना या औषधांचे साईड इफेक्ट जाणवतात. त्यामुळे या लेखातून आपण चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय माहिती मराठी (how to remove pimple scars naturally at home) जाणून घेणार आहोत. यात आपण पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

आपण चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय माहिती मराठी (how to remove pimple scars naturally at home)

how to remove pimple scars naturally at home
विषय मुरुम (त्वचारोग)
प्रकार तारुण्यपिटीका
लक्षणचेहऱ्यावर पुटकुळ्या उत्पन्न होणे, त्यातून रक्त किंवा पु युक्त स्राव बाहेर येणे.

हा लेख जरूर वाचाब्रह्म मुहूर्त मराठी माहिती (brahma muhurta information in marathi)

1. एक कप दुध आटवा, त्यात एक लिंबू पिळा. रात्री झोपताना आटवलेले दुध चेहऱ्यावर लावायचा आणि रात्रभर तसाच ठेवायचा. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवायचा, असे केल्याने मुरुम बरा होऊन चेहरा उजळून तजेलदार होतो.

2. गाजर, टोमॅटो, बिट यांचा दररोज दोन महिने पर्यंत रस प्यायल्याने चेहऱ्यावरची मुरुमे, डाग व सुरकुत्या नाहीशा होतात.

3. 100 ग्रॅम संत्राची साल घेऊन त्यांचे चूर्ण बनवा. त्यात 100 ग्राम बाजरीचे पीठ आणि 12 ग्राम हळद मिसळून पाण्यात भिजवुन चेहऱ्यावर लावावे. यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. असे केल्यास काही दिवसात चेहरा उजळतो.

4. लिंबू पिळून चेहऱ्यावर लावायचा, 15 ते 20 मिनिट तसाच ठेवायचा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा. असे महिनाभर केल्याने चेहऱ्यावरील मुरूम निघून जातात.

5. मसुराची डाळ बारीक करून तिची पावडर बनवा. ही पावडर दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावी. 10 मिनिटे हा लेप तसाच ठेवून, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून काढा. असे आठवडाभर केल्यास चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम निघून जातात.

6. चेहरा नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी दिवसात दोन वेळा चेहरा धुवावा. सारखा सारखा चेहऱ्याला हात लावू नये. तसेच शक्य होईल तितका कमी मेकअप करावा.

हा लेख जरूर वाचाआरोग्यासाठी पाण्याचे उपयोग मराठी माहिती (water benefits information in marathi)

7. रात्री झोपताना मुरुमावर मधाचे एक एक थेंब लावावे. रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. असे केल्यास काही दिवसात चेहरा उजळतो.

8. रोजच्या आहारात तेलकट पदार्थाचा समावेश कमी प्रमाणात करावा. कारण आहारातील तेलकट पदार्थाने चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या निर्माण होत असते.

9. ताजी कोरफडचा रस आपल्या चेहऱ्याला लावा आणि 20 ते 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. असे आठवडाभर केल्यास चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम कमी होतात.

10. केळी, दही आणि एक चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवायचा. असे आठवडाभर केल्यास चेहऱ्यावरील मुरुम नाहीसे होतील.

हा लेख जरूर वाचाकेळी खाण्याचे फायदे माहिती मराठी (banana benefits in marathi)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वरील उपाय जरी घरगुती असले, तरी देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उपायकारक ठरेल असे नाही, कारण चेहऱ्यावर मुरूम का येतात? याचे कारण प्रत्येकाचे वेगवेगळे असते. हे कारण तज्ज्ञांकडून जाणून घेऊन आवश्यक तो इलाज करावा.)

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय माहिती मराठी (how to remove pimple scars naturally at home) जाणून घेतली आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पिंपल्स येण्याची कारणे काय आहेत ?

1. साधारणपणे पिंपल्स 13 ते 26 या वयोगटातील मुला-मुलींना होत असतात.
2. तसेच पर्यावरणातील दूषित धूळ चेहऱ्यावर बसल्याने पिंपल्स होत असतात.
3. शिळे पदार्थ, फास्ट फुड/ जंक फुड, तळलेले समोसा, वडापाव यांसारखे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास चेहऱ्यावर मुरूम येतात.
4. केमिकल युक्त कॉस्मेटीक्सचा अतिवापर केल्याने चेहऱ्यावर डाग निर्माण होतात.
5. विरुद्ध आहार सेवन केल्यास आणि झोप कमी घेतल्याने देखील चेहऱ्यावर डाग आणि मुरूम येतात.

तेलकट चेहऱ्यावर उपाय सांगा (Oily skin care tips in marathi)

रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, दही आणि लिंबाचे प्रमाण वाढवावे.
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चेहऱ्यावर ॲलोव्हेरा जेल लावा.
सकाळी उपाशी पोटी आवळा खाल्ल्यानेही तेलकट त्वचा ठीक होते.

त्वचा कोरडी पडण्याची कारणे

1. हवामानात झालेल्या बदलामुळे
2. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर
3. स्विमींग पूलमधील क्लोरीनयुक्त पाण्याने
4. साबण आणि डिटर्जंटमधील रसायनांमुळे
5. सोरायसिस, एक्झिमा यामुळे
6. त्वचेची स्वच्छता करणाऱ्या प्रोडक्ट्सच्या अधिक वापराने
7. याशिवाय कॉलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, एलर्जी आणि पिंपल्सची औषधं घेतल्याने त्वचा कोरडी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *