जुनी नाणी व नोटा कुठे विकायच्या ?

How to sell old coins in india marathi – मित्रांनो, चलन हे विनिमय करण्यासाठी महत्वाचे माध्यम मानले जाते. प्रत्येक देश चलन म्हणून नाणी व नोटांची निर्मिती करत असतो. ही निर्माण केलेली नाणी व नोटा काही वर्षांनी व्यवहारातून कालबाह्य करून त्यांच्या जागी नव्या नोटा व नाणी येतात.

भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी चलनातून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्या. अश्याच प्रकारे बऱ्याच नोटा व नाणी चलनातून बंद करण्यात आल्या आहेत.

अश्या वेळी तुम्ही आवड म्हणून जुन्या नाणी व नोटांचा संग्रह करू शकता. जर तुम्हाला या चलनाचा संग्रह नसेल करायचा तर तुम्ही जुन्या नोटांची विक्री करून त्याबदल्यात पैसे कमावू शकता.

आज आपण या लेखातून जुनी नाणी व नोटा कुठे विकायच्या (How to sell old coins in india marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जुन्या नाण्यांची माहिती (old coins in india marathi)

मित्रांनो, पूर्वीपासून ते आतापर्यंत भारत देशात विविध प्रकारच्या नोटांचा आणि नाण्यांचा विनिमय करण्यासाठी वापर केला जात आहे. यानुसार फुटकी हे सर्वात कमी किमतीचे चलन असून त्यानंतर कवडी, दमडी, पै ,ढेला, पैसा, आणा व रुपया ही चलने अस्तित्वात आली.

यातील सर्व चलने बंद होऊन रुपया हे चलन अस्तित्वात आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काही लोक जुने नाणी किंवा नोटांचा संचय करतात. जर तुम्हाला जुन्या नोटांचा संग्रह करायला आवडतं नसेल तर तुम्ही त्याची विक्री देखील करू शकता.

सध्या एक व दोन रुपयांची जुनी नाणी तसेच एक रुपये, दोन रुपये आणि पाच रुपयांच्या जुन्या नोटांना बाजारात चांगलीच मागणी आहे. जर अशी नाणी किंवा नोटा तुमच्याकडे असतील तर तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.

तुम्हाला वाटत असेल, या नाण्यांचा बदल्यात तुम्हाला कुणी का पैसे देईल ? तर मी तुम्हाला सांगतो की, जुने नाणी आणि नोटा साठवणारे नोटाफिलिस्ट म्हणजे कागदी नोटांचा अभ्यास किंवा संग्रह करणारे दुर्मीळ नाणी आणि नोटांच्या शोधात असतात.

हे लोक जुन्या नोटांच्या आणि नाण्यांच्या बदल्यात चांगली किंमत देतात.

जुन्या नाण्यांची आणि नोटांची किंमत यादी (old coins and notes price list marathi)

माता वैष्णोदेवीची प्रतिमा असलेले पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. ही नाणी खरेदी करण्यासाठी लोक लाखो रुपये देण्यास तयार होतात.

इसवी सन 1957 सालचे गव्हर्नर एच. एम. पटेल यांची सही असलेल्या नोटा, ओएनजीसीच्या पाच रुपये आणि दहा रुपयांच्या स्मारक नाण्यांसाठी चांगलीच किंमत मिळते.

तुमच्याकडे आरबीआयचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची सही असलेली शंभर रुपयांची नोट असेल तर तुम्ही त्याबदल्यात 2000 रुपये मिळवू शकता.

ब्रिटिशांच्या काळातील म्हणजे इसवी सन 1943 मध्ये असलेली दहा रुपयांची नोट सध्या 25 हजार रुपयांना विकली जाते. या नोटेवर आरबीआय गव्हर्नर सीडी देशमुख यांची सही असून एका बाजूला अशोक स्तंभ तर दुसर्‍या बाजूला एका जहाजाचा फोटो आहे.

इसवी सन 1862 सालची राणी व्हिक्टोरियाची प्रतिमा असलेली नाणी खरेदी करण्यासाठी खरेदीदार दीड लाख रुपये देण्यास तयार आहे. कारण हे चांदीचं नाणं अत्यंत दुर्मीळ स्वरूपाचे आहे.

अश्या प्रकारे पूर्वीपासून ते आतापर्यंत चलनात असलेल्या नोटा आणि नाणी बाजारात विकल्या जातात. जर तुमच्याकडे अशी नाणी किंवा नोटा असतील तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

जुनी नाणी व नोटा कुठे विकायच्या (How to sell old coins in india marathi)

भारतात जुनी नाणी व नोटा विकण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. ज्यापैकी कॉइनबझार, इंडियामार्ट आणि क्विकर या वेबसाईटवर सर्वात जास्त चलने खरेदी विक्री केली जातात.

याव्यतिरिक्त OLX, eBay, इंडियन कॉइन मिल, अमेझॉन इत्यादी वेबसाईटवर नाण्यांची खरेदी विक्री केली जाते. या वेबसाईट वर तुमचे खाते तयार करून नाणी व नोटा विक्री किंमत टाकून अपलोड करा.

या नोटा आणि नाणी खरेदी करू इच्छिणारे लोक तुमच्याशी संपर्क करून तुम्हाला हव्या त्या योग्य किंमतीवर खरेदी करतील.

याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या ऐतिहासिक संग्रहालयात जाऊन प्रत्यक्ष विचारपूस करून स्वतःजवळ असलेली नाणी किंवा नोटा विकू शकता.

सारांश

या लेखातून आपण जुनी नाणी व नोटा कुठे विकायच्या (How to sell old coins in india marathi) याविषयीं सविस्तरपणे जाणून घेतले. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

जुने नाणे विकणे कायदेशीर आहे का ?

होय, जुने नाणे विकण्यावर रिझर्व्ह बँकेचे कसलेही बंधन नाही. पण बाजारात अनेक जुन्या नोटा खरेदी विक्री करताना अनेक घोटाळे होतात, त्यामुळे हा व्यवहार सावधगिरीने करावा.

भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार कोणत्या बँकेकडे आहे ?

भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार रिझर्व बँक ऑफ इंडिया या मध्यवर्ती बँकेकडे आहे.

भारतात कागदी चलन निर्मिती कारखाना कोणत्या वर्षी सुरु झाला ?

भारतात कागदी चलन निर्मिती कारखाना सन 1928 या वर्षी सुरु झाला.

चलन छपाईचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे ?

चलन छपाईचा कारखाना महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात आहे.

एक रुपयाच्या नोटा वर कोणाची सही असते ?

एक रुपयाच्या नोटावर वित्त सचिवाची सही असते.

भारतीय चलन पद्धतीने व्यवस्थापन कोणा तर्फे केले जाते ?

भारतीय चलन पद्धतीने व्यवस्थापन रिझर्व बँक ऑफ इंडियातर्फे केले जाते.

सध्या भारतीय चलनात सर्वात मोठी नोट किती रुपयांची आहे ?

सध्या भारतीय चलनात सर्वात मोठी नोट दोन हजार रुपयांची आहे.

पुढील वाचन :

  1. पैसा म्हणजे काय माहिती मराठी
  2. ई-कॉमर्स माहिती मराठी
  3. ऑनलाइन पैसे कमवण्याचे मार्ग माहिती मराठी

Leave a Comment