How to think positive in marathi – विचार करणे हे माणसाला मिळालेल सर्वात मोठे वरदान मानले जाते कारण याच विचारांच्या जोरावर माणसाने खूप प्रगती केली आहे. त्यामुळे विचार हे माणसाचे शस्र मानले जाते.
आपण दररोज उठल्यापासून अनेक विचार करतो. मुळात मानव हा विचारांपासून वेगळा राहूच शकत नाही. आपल्या मनात नेहमी कोणत्यातरी विषयावर विचार प्रक्रिया चालूच असते.
यातील काही विचार ठराविक वेळाने आपण विसरतो किंवा त्याला बाजूला करतो. पण विचार भावनिक असतील, तर त्या विचारांना बाजूला करणे खूप अवघड असते. जसे की, एखाद्याने आपल्याला धोखा देणे, अपघातातून मरता मरता वाचणे इत्यादी.
यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, विचार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून, जसे विचार तसेच आपले जीवन असते. विचार दोन प्रकारात विभागले जातात. पहिला म्हणजे सकारात्मक व दुसरा नकारात्मक भूमिका असलेला.
या लेखातून आपण सकारात्मक विचार कसा करायचा (How to think positive in marathi), सकारात्मक विचाराचे फायदे आणि टिप्स याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- विचार म्हणजे काय (what is thought marathi)
- सकारात्मक विचाराचे फायदे माहिती (positive thinking benefits marathi)
- सकारात्मक विचार कसा करावा (How to think positive in marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
विचार म्हणजे काय (what is thought marathi)
विचार म्हणजे मानसिक किंवा बौद्धिक दृष्टिने केलेले माहितीचे संस्करण (processing) होय. उदा. तुम्ही मोबाईल खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. दुकानदार तुम्हाला अनेक मोबाईल दाखवतो. कोणता मोबाईल घ्यायचा हे ठरवताना तुम्ही त्याचे फायदे, तोटे , किंमत विचारात घेता. म्हणजेच तुम्ही तुमच्याकडे असलेला व माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊन त्या माहितीवर प्रक्रिया करता.
माहितीचे संघटन, आकलन, इतरांसोबत मांडणे आणि हे करत असताना मेंदूत होणाऱ्या मानसिक प्रक्रिया म्हणजेच विचार प्रक्रिया होय.
साधारणपणे विचार दोन प्रकारची असतात.
- सकारात्मक विचार – या विचारांत मानवी मानसिकता आशावादी असते. यामध्ये प्रामुख्याने कोणत्याही परिस्थितीत सुधारणा घडून आणायची प्रेरणा असते.
- नकारात्मक विचार – या विचारातील मानवी मानसिकता नकारार्थी स्वरूपाची असते. त्यामुळे आयुष्याची वाटचाल अधोगतीकडे होते.
आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टीही घडत असतात, त्याची फक्त वाईट बाजू आपल्या मनात येत राहणे म्हणजे नकारात्मक विचारांचा परिणाम होय. याचे कारण म्हणजे आपल्या मनावर चांगल्या घटनांपेक्षा वाईट घटनांचा जास्त परिणाम होतो.
एक गम्मत आहे, आपले मन चांगल्या घटना मेंदूमध्ये सुरक्षित ठेवते. पण कोणता वाईट प्रसंग घटला तर येणाऱ्या प्रत्येक वाईट प्रसंगापासून आपला बचाव व्हावा, म्हणून आपले मन अधिक सक्रिय होते परिणामी ती गोष्ट दीर्घकाळ आपल्या विचारांचा भाग बनून जाते.
नकारात्मक विचारांचा आपल्या काम करण्याच्या क्षमतेवर, निर्णय घेण्याच्या ताकदीवर, परस्पर संबंध आणि आपल्या आनंदावर परिणाम होतो.
नकारात्मक विचार हे दुसरे काही नसून भूतकाळात घडलेल्या किंवा ऐकलेल्या घटनांची पुनरावृत्ती आहे. यामुळे वर्तमानात आपले मन लागत नाही. म्हणून आपल्या जीवनात यशस्वी होण्याचा आनंद अनुभवता येत नाही. हा आनंद मिळवून आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी एक बदलाची गरज आहे, तो बदल म्हणजे सकारात्मक विचार.
सकारात्मक विचाराचे फायदे माहिती (positive thinking benefits marathi)

आपल्या जीवनाची दिशा आपले विचार ठरवत असतात. त्यामुळे आपले विचार योग्य दिशेने जाणे आवश्यक असते. विचारांना योग्य मार्ग मिळाला, की आयुष्य सोपे आणि सुखी वाटू लागते.
सकारात्मक विचार असलेली व्यक्ती नेहमी आनंदी असते. जो व्यक्ती आनंदी त्याची प्रकृतीही पूर्णपणे ठीक असते. म्हणजेच सकारात्मक विचार करणाऱ्याचे शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहते.
जर एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असेल तर अशा व्यक्तीने नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. यामुळे आत्मविश्वास वाढीस लागतो.
जो व्यक्ती कोणाचे तरी वाईट करतो, त्यापासून लोक दूर राहणे पसंत करतात. जर तुम्ही सर्वांसाठी चांगले विचार केले आणि प्रत्येकाशी चांगलेपणाने वागले, तर लोक तुमच्याशी नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.
सकारात्मक विचार केल्याने माणसाची सहनशक्ती वाढते. यामुळे शरीरातील किरकोळ वेदना सहज सहन करता येतात. भावनिक आणि मानसिक त्रासदेखील कमी होतो.
सकारात्मक विचार करणाऱ्याला पराभूत करणे सोपे नसते. कारण तो नेहमीच प्रत्येक समस्येवर उपाय शोधून काढतो. सकारात्मक विचार करणारे लोक जीवनात नक्कीच यश मिळवतात.
सकारात्मक विचार करणाऱ्यांचे मन अधिक शक्तिशाली असते, कारण गंभीर परिस्थितीतही झटपट निर्णय घेतल्याने त्यांच्या मनाचा विकास होतो. यामुळे ते योग्य वेळी योग्य निर्णय सहज घेऊ शकतात.
चांगल्या विचारामुळे माणूस स्वतःच्या प्रेमात पडतो. तो स्वतःची चांगली काळजी घेतो. तो आपल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम करतो. पण नकारात्मक विचार करणारा व्यक्ती कोणत्याही गोष्टीची योग्य काळजी घेऊ शकत नाही. तो कायम दोष देण्यात आपला वेळ वाया घालवतो.
सकारात्मक विचार कसा करावा (How to think positive in marathi)

Simple Steps to Stop Negative Thoughts marathi – सकारात्मक विचार मनात येण्यासाठी आपल्या दिवसाची सुरूवात पहाटेची करा. अर्थात सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात योगा, व्यायाम किंवा फिरणे. असे केल्याने दिवसाची सुरूवात एका ऊर्जेने सुरू होते.
आपले काम करताना चांगले आणि वाईट प्रसंग घडत राहतात. खरंतर समस्या या आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि समस्याशिवाय जीवन असू शकत नाही. पण येणाऱ्या समस्या हाताळण्यासाठी आपली मानसिक तयारी करावी. मुख्य म्हणजे जास्त वेळ समस्याकडे लक्ष न देता त्यातून मार्ग काढून आपल्या कामात लक्ष द्यावे.
एखादे काम करताना त्यासाठी नियोजन लागते, मात्र प्रत्येक कामात नियोजन करणे अपेक्षित नसते. म्हणजेच प्रत्येक कामाविषयी मायक्रो प्लॅनिंग करू नये. एखाद्या गोष्टीविषयी जास्त विचार करत राहिल्यास, काम करायचे लांब राहते आणि उलट आपल्याला अतिविचार करायची सवय लागते. परिणामी कोणत्याही कामात लक्ष लागत नाही तसेच आपले काम करण्याची क्षमता कमी होते.
How to remove negative thoughts from mind in marathi – सकारात्मक विचार हा आपल्या मनाचा आरसा आहे. त्यामुळे आपले मन स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न करीत रहावा. यासाठी चांगली पुस्तके, चांगले विचार असणारी माणसे आणि निसर्गाच्या सहवासात राहावे. विशेषतः वाचन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनला पाहिजे. त्यासाठी दररोज किमान एक तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे.
व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाण, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि नैसर्गिक बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. स्वतःची जडणघडण चांगली व्हावी, म्हणून प्रयत्न करावे. निसर्गातील पक्षी, प्राणी, झाडे, फुले अश्या सर्वावर प्रेम करून आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही, याचा प्रयत्न करावा.
सकारात्मक विचार करण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा देऊन भूतकाळात घडलेल्या वाईट घटना व्यवस्थित समजून घ्याव्यात. वाईट असो वा चांगले प्रश्नाचे मूळ माहीत नसेल तर त्यावर मार्ग काढणे, अवघड असते. म्हणून भूतकाळातील चुका परत होणार नाही, असा आशावाद घेऊन कामाची सुरुवात करा.
सारांश
आपले विचार, आपले भविष्य ठरवत असतात. विचार नेहमी चांगले आणि सकारात्मक असले की, जीवन जगण्याचा खरा आनंद मिळतो.
या लेखातून आपण सकारात्मक विचार कसा करावा (How to think positive in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली आहे.
जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
नकारात्मक विचार का येतात ?
नकारात्मक विचार येण्यासाठी कारणीभूत असणारे घटक पुढीलप्रमाणे.
1. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे नकारात्मक विचार असणे.
2. भूतकाळात आपल्यासोबत वाईट प्रसंग घडलेला असणे.
3. ज्ञानाचा अभाव असणे.
4. न्यूनगंड आणि मनातील भीती
5. चांगल्या सवयी अंगीकृत नसणे.
6. चुकीची संगत आणि चुकीची आवड असणे.
7. जीवनाचे ध्येय ठरवलेले नसणे.
यशस्वी जीवनासाठी सकारात्मक विचार गरजेचा आहे का ?
नक्कीच, यशस्वी जीवनासाठी सकारात्मक विचार गरजेचा आहे. कारण विचार हाच आपल्या जीवनाचे ध्येय आणि धोरण ठरवत असतो. त्यामुळे विचार नेहमी सकारात्मक असावे.
पुढील वाचन :