स्टॉकचे मूलभूत विश्लेषण कसे समजून घ्यावे (how to understand fundamental analysis in marathi)

By | November 11, 2022

How to understand fundamental analysis in marathi – स्टॉकचे मूलभूत विश्लेषण म्हणजे एखाद्या समभागांच्या आंतरिक मूल्यांचे मूल्यमापन करणे होय. यामध्ये प्रामुख्याने कंपनीची आर्थिक विकास, व्यवस्थापन, कामगार विषयक निर्णय, उत्पादन, बाजारातील भविष्य, भविष्याची वाटचाल याविषयी माहितीचे विश्लेषण करावे लागते. या विश्लेषणाची एक महत्वाची बाब म्हणजे स्टॉकचे आंतरिक मूल्य किंवा वाजवी मूल्य एका रात्रीत बदलत नाही. यामुळे दीर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार फंडामेंटल अनालिसिस या पद्धतीचा वापर जास्त प्रमाणात करताना दिसून येते.

या लेखात आपण स्टॉकचे मूलभूत विश्लेषण कसे समजून घ्यावे (how to understand fundamental analysis in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण मूलभूत विश्लेषणाचे प्रकार, महत्त्व आणि फायदे आणि स्टॉकचे मूलभूत विश्लेषण कसे करावे याविषयी माहिती अभ्यासनार आहोत.

स्टॉकचे मूलभूत विश्लेषण कसे समजून घ्यावे (how to understand fundamental analysis in marathi)

how to understand fundamental analysis in marathi
मूलभूत विश्लेषण माहिती
विषयस्टॉकचे मूलभूत विश्लेषण
प्रकारकंपनी विश्लेषण करण्याची एक पद्धत
उपयोगकंपनीच्या समभागांची खरेदी करताना

फंडामेंटलचा मराठी अर्थ (fundamental meaning in marathi) मूलभूत असा होतो, तर अनालिसेसचा मराठी अर्थ (analysis meaning in Marathi) विश्लेषण असा होतो. विश्लेषण म्हणजे काय तर एखाद्या गुंतागुंतीचा विषय समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे विश्लेषण होय.

स्टॉकचे मूलभूत विश्लेषण करताना मुख्यतः तीन बाबींचा विचार केला जातो. पहिला म्हणजे कंपनीची ऐतिहासिक माहिती, ज्यात आपण कंपनीची स्थापना आणि तेव्हापासून कंपनीने केलेला विकास याविषयीची माहिती असते. या माहितीवरून कंपनीची भविष्यातील झेप कशी असेल, याविषयीचा अंदाज काढता येईल.

दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीची सर्वज्ञात असलेली माहिती, ज्यामध्ये कंपनीचे बाजारातील महत्व लक्षात येते. कंपनीचे उत्पादन आणि सेवा याविषयी लोकांचे काय मत आहे, हे जाणून घेणे आवश्यक असते. यावरून आपण कंपनीचे भविष्याचा वेध घेऊ शकतो. कंपनीचे कामगार विषयक सुविधा आणि कामगारांसाठी योजना याही कंपनीच्या उज्जल भविष्याची गुरुकिल्ली मानली जाते.

तिसरी गोष्ट म्हणजे, कंपनीने आजपर्यंत आपले अस्तित्व कसे टिकवले याविषयी माहिती. या माहितीत कंपनीच्या स्थापनेपासून आजपर्यंत घेतलेले निर्णय आणि बाजारातील ट्रेण्ड कसा टिकवला याची माहिती घेणे. कंपनीचे नेतृत्व आणि व्यवस्थापन याविषयीची अचूक माहिती जाणून घेणे गरजेचे ठरते. कंपनीच्या उत्पादन विक्री करण्यासाठी ग्राहकवर्ग आणि कच्चा माल पुरवणारे इतर कंपन्या यांच्यासोबत असणारे संबंध जाणून घ्यावे लागेल.

याव्यतिरिक्त कंपनी आणि कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे दररोज प्रसिद्ध होत असतात, यावर आपले बारीक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच कंपनीचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असणारे वातावरण याविषयी माहिती अभ्यासली जाते.

कंपनीचे उत्पादन करणारे इतर स्पर्धक आणि त्याची कामगिरी यांचे तुलनात्मक दृष्टीने केलेले विश्लेषण उपयुक्त ठरते. या सर्व बाबींचा विचार करून कंपनीचे शेअर्स आणि आंतरिक मूल्य यांची सांगड घालून कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी माहिती सकारात्मक आहे का, याविषयी अंदाज बांधावा.

मूलभूत विश्लेषणाचे प्रकार माहिती (fundamental analysis types information in marathi)

मूलभूत विश्लेषणाचे प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार आहेत. ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे गुणात्मक आणि दुसरा प्रकार म्हणजे परिमाणवाचक होय.

गुणात्मक मूलभूत विश्लेषण म्हणजे ब्रँड मूल्य, व्यवस्थापन निर्णय, दिलेल्या कालावधीत कंपनीची आर्थिक कामगिरी आणि इतर तत्सम घटकांचा विचार करून केले गेलेले विश्लेषण होय. परिमाणवाचक मूलभूत विश्लेषण हे पूर्णपणे संख्या-आधारित आहे आणि कंपनीच्या आर्थिक स्टेटमेन्टचा विचार करते आणि निरीक्षणांवरून शेअर किंमत निष्कर्ष काढते.

स्टॉकचे मूलभूत विश्लेषण कसे करावे (how to do fundamental analysis of stocks in marathi)

how to do fundamental analysis of stocks in marathi – स्टॉकचे मूलभूत विश्लेषण करण्याच्या अगोदर कंपनीची रचना आणि महसूल, कंपनीचा वर्षानुवर्षे नफा, वर्षानुवर्षे महसूल वाढ, कंपनीचे कर्ज, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि उलाढालीचा दर याकडे लक्ष द्यावे लागते कारण हे घटक कंपनीचे आंतरिक मूल्य ठरवत असतात.

स्टॉकचे मूलभूत विश्लेषण (fundamental analysis of stocks in marathi) पुढीलप्रमाणे करावे.

  • कंपनी, तिचे कार्य, व्यवसाय मॉडेल समजून घेणे.
  • प्रारंभिक तपासणीसाठी आर्थिक गुणोत्तर वापरणे .
  • कंपनीच्या आर्थिक अहवालांचा बारकाईने अभ्यास करावा.
  • कंपनीचे प्रतिस्पर्धी/प्रतिस्पर्धीचा शोध घेणे आणि त्यांचा अभ्यास करावा.
  • कंपनीचे कर्ज याविषयी माहिती मिळवणे आणि प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करणे.
  • कंपनीच्या संभाव्यतेचे विश्लेषण करा.

मूलभूत विश्लेषण महत्व आणि फायदे माहिती (Benefits and importance of fundamental analysis in marathi)

  • एखाद्या कंपनीचे मूलभूत विश्लेषण त्या कंपनीच्या स्टॉकची वाजवी किंमत मिळवण्यास मदत करते, जे नेहमी त्याच्या वाजवी मूल्यावर व्यापार करत नाही. बर्‍याचदा त्याची किंमत जास्त असते किंवा कमी असते.
  • मूलभूत विश्लेषणामुळे बाजारातील दीर्घकालीन ट्रेंडचा अंदाज लावण्यात मदत होते. हे सामान्यतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरले जाते कारण ते तुम्हाला स्टॉकची किंमत समजून घेण्यास मदत करते.
  • हे गुंतवणूकदारास गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्या शोधण्यास मदत करते देते.
  • व्यवसाय कौशल्य, जे गुंतवणूक विश्लेषणामध्ये अत्यंत फायदेशीर आहे कारण ते व्यवसायाच्या भविष्याबद्दल सांगू शकते.

सारांश

मूलभूत विश्लेषण कसे समजून घ्यावे (how to understand fundamental analysis in marathi) याविषयी आपण माहिती जाणून घेतली. तसेच आपण स्टॉकचे मूलभूत विश्लेषण कसे करावे (how to do fundamental analysis of stocks in marathi) आणि मुलभूत विश्लेषणाचे प्रकार आणि महत्व (Benefits and importance of fundamental analysis in marathi) याविषयी देखील माहिती अभ्यासली.

मूलभूत विश्लेषण कसे समजून घ्यावे (how to understand fundamental analysis in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

वस्तूची किंमत आणि मागणी यांचा संबंध कसा असतो ?

वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. याउलट वस्तूची किंमत वाढल्यास मागणी कमी होते, म्हणजेच मागणीच्या नियमानुसार किंमत आणि मागणी यातील संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो.

किंमत निर्धारण पद्धती कोणकोणत्या आहेत ?

पूर्ण स्पर्धा, पूर्ण मक्तेदारी आणि अपूर्ण स्पर्धा या तीन भिन्न अवस्थांमध्ये किंमत ठरते. मुक्त बाजारात किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या परस्पर प्रतिक्रियेने ठरते.

पुढील वाचन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *