प्रभावी व्यावसायिक पत्र कसे लिहावे (how to write business letter in marathi)

How to write business letter in marathi – व्यावसायिक पत्र हा एक औपचारिक पत्राचा भाग आहे. औपचारिक पत्र हे प्रामुख्याने एखाद्या कार्यालयास सूचना, तक्रार आणि विनंती करण्यासाठी लिहिले जाते. तर उत्पादन विक्री करण्यासाठी, कच्चा माल मागविण्यासाठी, थकबाकी जमा करण्यासाठी अशा विशिष्ट परिस्थितीत व्यावसायिक पत्राचा वापर होतो.

व्यावसायिक पत्र प्रभावशाली असेल तर चिडलेला ग्राहक शांत होऊ शकतो. तसेच प्रभावी भाषा आणि मांडणी आपल्याला हवी ती कृती समोरच्या व्यक्तीकडून करून घेता येते. एकंदरीत काय तर वाचकाला चांगले किंवा प्रभावी पत्र मिळाले तर त्याच्याकडून अपेक्षित असलेली कृती तो करतो.

यासाठी पत्र प्रभावी लिहिणे, आवश्यक ठरते. या लेखांमधून आपण प्रभावी व्यावसायिक पत्र कसे लिहावे (how to write business letter in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

प्रभावी व्यावसायिक पत्र कसे लिहावे (how to write business letter in marathi)

how to write business letter in marathi
विषय व्यावसायिक पत्रलेखन
प्रकार कार्यालयीन पत्र
वापर व्यापारातील अडचणी, मागणी, विक्री आणि इतर कार्यासाठी

How to write business letter in marathi – व्यावसायिक पत्र प्रभावशाली होण्यासाठी ते सहजतेने लिहिणे आवश्यक आहे. पत्र लेखन करणाऱ्यास भाषेचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे असते. पत्रातील विषय इतका स्वाभाविकपणे मांडावा की, वाचकाला प्रत्यक्ष भेट दिल्यासारखे वाटले पाहिजे.

Professional letter writing marathi – व्यावसायिक पत्र लिहिताना पुढील बाबीं लक्षात घेणे आवश्यक आहे.

  • व्यावसायिक पत्र विशिष्ट व्यवहारांसाठी आणि विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी लिहिली जातात.
  • या पत्राद्वारे अनेक कायदेशीर बंधने निर्माण होत असतात.
  • यासाठी पत्र लिहण्याची भाषा बिनचूक, स्पष्ट, बरोबर, सावध, समंजस आणि शिष्टाचारयुक्त असावी.

प्रभावी व्यावसायिक पत्रासाठी आवश्यक गुण (business letter writing skills in marathi)

तत्परता – पत्रला त्वरित उत्तर देणे हा एका उत्तम व्यावसायिकाचा गुणधर्म मानला जातो. त्यासाठी शक्य होईल, तितक्या लवकर पत्राला प्रत्युत्तर देणे गरजेचे असते. जर मागील संदर्भ किंवा स्पष्टीकरण अथवा खुलासे करायचे असेल, तर पत्रास उत्तर देण्यास जास्त वेळ जातो असे पत्र लिहून कळविणे प्रभावी ठरते. असे केल्याने जुने संबंध टिकवून ठेवता येतात आणि नवीन संबंध बनविता येतात.

विषयाचे ज्ञान – व्यावसायिक पत्र लिहिताना व्यवसाय विषयक ज्ञान असणे अपेक्षित असते. पत्राची गरज आणि समज तसेच व्यवसाय संस्थेच्या धोरणाचे ज्ञान असेल तर पत्र लेखकाला नेमके काय लिहायचे हे समजेल.

औचित्य – व्यवसाय संस्थेचे आणि वाचकाचे संबंध लक्ष्यात घेऊन पत्र लेखकाने पत्रातील भाषा प्रसंगानुसार बदलली पाहिजे. असे केल्यास वाचकाच्या मनात व्यवसाय संस्थेविषयी मैत्रीची भावना निर्माण होते.

भाषेतील अचूकता आणि सुस्पष्टता – पत्रात जर अचूकता आणि सुस्पष्टता असेल तर वाचकाला पत्राचा हेतू समजतो. व्यवसायिक पत्राद्वारे अनेक कायदेशीर आणि महत्वाची संबंध बनत असतात. पत्रात काही चूक झाली तर मैत्रीसंबंध खराब होण्याची शक्यता असते.

उत्पादन विक्री करण्यासाठी, कच्चा माल पुरविण्यात यावा यासाठी, थकबाकी जमा करण्यासाठी, मालाची मागणीसाठी, ग्राहकवर्ग याचा अभिप्राय कळवण्यासाठी तसेच सहविक्रेता म्हणून काम करण्यासाठी असे बरेच विषय व्यावसायिक पत्रात लिहिले जातात.

सौजन्यपूर्ण व्यवहार – विक्रेता असो की ग्राहक ज्यांना पत्र लिहावयाचे आहे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण होऊन याची काळजी घ्यावी. प्रभावी व्यावसायिक पत्रात उतावळेपणा, संताप, लोभ, टोमणे, टीका, विचार मांडण्याची आक्रमक पद्धत अवलंबली जात नाही. तर एक प्रभावी व्यावसायिक पत्र लिहिताना पत्रातील भाषा सभ्य, स्नेहपूर्ण आणि नम्र असावी.

व्यवहार चातुर्य – व्यवसायामध्ये सौजन्यबरोबर व्यवहारचातुर्य असणे आवश्यक ठरते. व्यवसायसंस्थेचे नावलौकिक टिकवणे ही एका पत्र लेखकाची जबाबदारी असते. त्यासाठी दुरावा निर्माण होईल किंवा शत्रुत्व निर्माण होईल असे पत्र लिहू नये. वाचकाची शत्रू बुद्धी असतानासुद्धा पत्रातील विनंती मान्य करायला लावेल असे पत्र व्यवसायिक पत्रलेखकाने लिहायला हवे.

मन वळविणे – वाचकाचे मन वळविण्याचे कौशल्य लेखकाने आत्मसात करायला हवे . याचा उपयोग करून अमान्य होत असलेल्या गोष्टीसुद्धा ठामपणे मांडून मान्य करायला लावता येतात.

संक्षिप्तता – कार्यालयीन पत्र लिहीत असताना वेळेचे भान ठेवले जाते. कारण वाचकाचा वेळ हा मोलाचा असतो. अनावश्यक पत्र वाचण्यात आपला वेळ व्यर्थ जात आहे, अशी भावना कोणत्याही वाचकाला होऊ नये याची खबरदारी घेणे पत्र लेखकाची जबाबदारी आहे. यासाठी पत्र अचूकतेने, सौजन्यपूर्ण, व्यवहारचातुर्य यांचा वापर करून आपले म्हणणे स्पष्टपणे मांडावे.

विक्रिकला – व्यवसायिक पत्रात प्रामुख्याने विक्रिकला हा गुणधर्म आढळून येतो. प्रत्येक व्यवसायिक पत्र विक्रेत्याची भूमिका बजावते. यासाठी पत्र लेखकाने विक्रीकला अवगत करून आपल्या व्यवसाय संस्थेचे नावलौकिक होईल, असे पत्र लिहिणे गरजेचे ठरते.

दृष्टिकोन – वाचकाने जर पत्रातील तुमची चूक दाखवली असेल तर, ती चूक स्वीकारून, चूक दाखविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. आनंदाच्या भरात काहीही वचन देऊ नये आणि रागाच्या भरात पत्रास प्रत्युत्तर देऊ नये.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रभावी व्यावसायिक पत्र कसे लिहावे (how to write business letter in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

हा लेख जरूर वाचाऔपचारिक पत्राची मांडणी कशी करावी ?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

व्यावसायिक पत्रलेखन म्हणजे काय ?

ग्राहक आणि विक्रेता यांना जोडण्याचे काम पत्रव्यवहार करत असते. ग्राहक, माल पुरवठा करणाऱ्या संस्था, बँका, सरकारी कार्यालय यांना व्यवसाय संस्थेच्या वतीने लिहिल्या जाणाऱ्या पत्रास व्यावसायिक पत्र असे म्हणतात.

व्यावसायिक पत्र का लिहिली जातात ?

व्यावसायिक पत्रव्यवहार हे लेखी संपर्क करण्याचे महत्वाचे माध्यम आहे. या माध्यमाचा उपयोग करून माहिती प्राप्त करणे किंवा माहिती देता येते. प्रत्यक्ष न भेटता थोड्याशा खर्चात संपर्क साधता येतो. तसेच संस्थेने केलेल्या व्यवहाराचा पुरावा आणि भविष्यातील संदर्भ नोंदी म्हणून या पत्राचा उपयोग होत असतो.

लेटरहेड म्हणजे काय ?

व्यावसायिक पत्राच्या मध्यभागावरील बाजूस लिहलेले शीर्षक असते. या जागी व्यवसायसंस्थेचे नाव, पत्ता, उद्देश लिहला जातो.

व्यावसायिक पत्राद्वारे व्यवसाय संस्थेचा दर्जा ठरवला जातो का ?

हो, व्यावसायिक पत्राद्वारे व्यवसाय संस्थेचा दर्जा ठरवला जातो. त्यासाठी व्यावसायिक पत्रासाठी उत्तम प्रतीचा कागद आणि दर्जेदार वापरावा, जेणेकरून वाचकाला मजकूर वाचण्याअगोदर वेगळीच छाप पडेल.

व्यावसायिक पत्र केव्हा लिहिली जातात ?

व्यावसायिक पत्र हे विशिष्ट उद्दिष्ट ठरवून लिहिली जात असतात. यात प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश असतो.
1. व्यवसायात होणारे महत्त्वाचे बदल ग्राहकांना कळवणे.
2. मालाच्या विक्रीसाठी पाठवलेले प्रस्ताव
3. व्यापारी चौकशीची पत्रे आणि चौकशीला उत्तर पाठवले जाणारे पत्रे
4. विक्री पत्रे
5. तक्रार आणि अभिप्राय
6. अभिकर्त्याशी व्यवहार
7. विमा, बँक, वाहतूक या सेवा संस्थांशी पत्रव्यवहार
8. मालाची आयात-निर्यात करण्याविषयी पत्रे
9. व्यवसाय संबंधित सरकारी खात्याशी पत्रव्यवहार
10. उधारी वसूल करण्यासाठी पत्रे
अश्या बऱ्याच विषयावर व्यावसायिक पत्र लिहिले जातात.

Leave a Comment