विनंती पत्र लेखन मराठीत कसे लिहावे ?

How to write request letter in marathi – पत्र लिहिताना ते व्यावसायिक आहे की कौटुंबिक यावर ते कसे लिहायचे हे अवलंबून असते. औपचारिक पत्राची भाषा सहज आणि विशिष्ट पूर्ण असते. आपण कोणतीतरी सूचना, समस्या किंवा इतर कोणत्याही मुद्द्याला घेऊन पत्र लिहीत असतो. अशा प्रकारे औपचारिक पत्र हे कार्यालयीन कामकाजाशी संबंधित असतात. विनंती पत्र हे औपचारिक म्हणजेच व्यावसायिक प्रकारात मोडते. यामुळे हे पत्र लिहिताना विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते.

या लेखातून आपण विनंती पत्र लेखन मराठीत कसे लिहावे (how to write request letter in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. विनंती अर्जाच्या नमुन्यातून (request letter format in marathi) आपण पाहुयात की विनंती अर्ज कसे लिहतात.

विनंती पत्र लेखन मराठीत कसे लिहावे (How to write request letter in marathi)

how to write request letter in marathi
  • विनंती पत्र लिहायला सुरुवात करताना पत्राच्या उजव्या कोपऱ्यात आपले संपूर्ण नाव, पत्ता, आणि मोबाईल नंबर लिहावा.
  • त्याच्या खाली डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे नाव म्हणजेच स्वीकारण्याचे नाव , त्यांचे पद नाव, संस्थेचे नाव इत्यादी माहिती लिहावी.
  • त्याच्या खाली पत्राचा विषय आणि संदर्भ लिहावा.
  • यानंतर नवीन ओळीवर महोदय किंवा महोदया असे लिहून पत्राची सुरुवात करावी.
  • औपचारिक पत्रामध्ये लिहिलेला मजकूर मुद्देसूद आणि विषयाला धरुन असावा.
  • पत्राची भाषा आकर्षक असावी.
  • त्याच्या खाली उजव्या कोपऱ्यामध्ये आपला / आपली असे लिहून आपली नाव लिहून सही करावी.
  • काही वेळा पत्रासोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. त्यांची माहिती सुद्धा सोबत असे लिहून लिहावी.
  • काही पत्रे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या कार्यवाहीसाठी पाठवली जातात. त्यामुळे अशा पत्रांमध्ये प्रत माहितीसाठी असे सुद्धा लिहावे.

विनंती पत्र मराठी नमुना (request letter format in marathi)

विषय : ज्ञानेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वकृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र

शिवराम दळवी
ज्ञानेश्वर विद्यालय
नेवासा – 414 603
23 ऑगस्ट 2022

प्रति,
माननीय आयोजक,
ज्ञानेश्वर विद्यालय
नेवासा – 414 603

विषय – पाच विद्यार्थ्यांना वकृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी विनंती

माननीय महोदय,

मी शिवराम दळवी ज्ञानेश्वर विद्यालयातील बी.ए च्या तृतीय वर्षात शिकत आहे. विद्यालयात होणाऱ्या वकृत्वस्पर्धात नाव नोंदणीसाठी एकच आठवडा मुदत होती. या मुदतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्याने आपले नाव नोंदविले आहे.

पण काही कारणास्तव आमच्या वर्गातील पाच जणांना त्यांचे नाव नोंदविता आले नाही. त्यांची नावे मी खाली नमूद करत आहे.

  1. किशोर पाटील
  2. रवी जाधव
  3. सोनाली कुलकर्णी
  4. काजल पवार
  5. निखिल देशपांडे

कृपया आपण या पाच विद्यार्थ्यांना वकृत्व स्पर्धेत सहभागी करून घ्यावे, ही नम्र विनंती…

आपला आज्ञार्थी,
शिवराम दळवी
(वर्गप्रतिनिधी – ज्ञानेश्वर विद्यालय)

शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

|| श्री ||


काजल इनामदार नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरीगाव. पिंपरी चिंचवड, 411018

प्रति,

मा. संचालक सरस्वती बुक डेपो, पुणे 411018

विषय – शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी

महोदय,

मी काजल इनामदार नवमहाराष्ट्र विद्यालयाची इयत्ता दहावीची वर्गप्रमुख आहे. आपणास पत्र लिहण्यास कारण की, शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी होती.

शाळेमध्ये नवीन पुस्तके लागत असल्या कारणाने आम्हाला काही पुस्तके विकत घ्यायची आहेत. या पत्राबरोबर काही पुस्तकांची यादी सामायिक केली आहे.

आशा आहे की आपण पुस्तके उपलब्ध करून देताल.

कळावे,

काजल इनामदार (वर्गप्रमुख दहावी)


सोबत :

[पुस्तकांची यादी]

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण विनंती पत्र लेखन मराठीत कसे लिहावे (How to write request letter in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

विनंती अर्ज करताना कोणती बाब महत्त्वाची असते ?

विनंती अर्ज करताना पत्रामध्ये लिहिलेला मजकूर मुद्देसूद आणि विषयाला धरुन असावा.

विनंती पत्र लिहिण्यामागे काय हेतू असतो?

विनंती पत्र लिहिण्यामागे सामान्यतः आपला उद्देश साध्य व्हावा हा हेतू असतो.

Leave a Comment