सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी माहिती – IGST, SGST, CGST full form in marathi

IGST, SGST, CGST full form in marathi – सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी हे कर आकारणी सुरळीत व्हावी, राज्य आणि केंद्र सरकारच्या मध्ये कर आकारणी बाबत कसलेही वाद होऊ नये म्हणून तयार करण्यात आलेली पद्धत आहे.

वस्तू आणि सेवा यावर पूर्वीपासूनच कर आकारण्यात येत होता. परंतु सुरवातीस वस्तू आणि सेवा कर आकारणी राज्यानुसार वेगवेगळी होती, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वस्तूच्या किमतीत तफावत होती.

यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने पूर्वीपासून चालू असलेली करप्रणाली रद्द करून, नवीन करप्रणाली लागू केली.

या लेखात आपण सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी माहिती – IGST, SGST, CGST full form in marathi जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचा – शेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे (how to become successful trader in stock market)

Table of Contents

जीएसटी विषयी माहिती मराठी – GST Information in marathi

IGST, SGST, CGST full form in marathi
सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी माहिती

GST ही एक भारतातील करप्रणाली आहे. ज्याची सुरुवात 1 जुलै 2017 पासून झाली. जीएसटी चा मराठी फुल्ल फॉर्म गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा आहे. या अंतर्गत वस्तू आणि सेवा यावर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% असे दर ठरवण्यात आले आहे.

जीएसटीच्या अगोदर वस्तू आणि सेवा यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आकारणी केली जात होती. यामध्ये प्रत्यक्ष करात आयकर, मालमत्ता, भेटवस्तू, संपत्ती आणि महानगरपालिकावर कर आकारणी करत. तर अप्रत्यक्ष करामध्ये एकूण 17 कर भरावे लागत असे. यामध्ये उत्पादन, विक्री, कस्टम आणि वीएटी इत्यादी कर भरावे लागत असे.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरत असताना प्रदेशानुसार वस्तूंच्या किंमतीत बरीच तफावत जाणवत होती. यासाठी भारतात 1 जुलै 2017 पासून एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला.

या नवीन करप्रणालीमध्ये जीवनापयोगी असलेल्या वस्तू आणि सेवावर कर वगळण्यात आला आहे. यामध्ये अन्नधान्य, गूळ, मीठ, ताज्या भाज्या, वर्तमानपत्र, सॅनिटरी नॅपकिन्स, न्यायिक कागदपत्र यांचा समावेश होतो.

जीएसटी प्रकार माहिती मराठी – GST types information in marathi

जीएसटी ही पद्धत वापरत असताना कर आकारणी करत असताना केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये वाद निर्माण होऊ नये म्हणून, काही प्रकार बनवले आहेत.

प्रकारइंग्रजीमराठी
CGST full form Central goods and service taxकेंद्रीय वस्तू आणि सेवा कर
IGST full form Integrated Goods and Services Taxइंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर
SGST full form State Goods and Services Taxराज्य सरकार वस्तू आणि सेवा कर
UTGST full form Union Territory Goods and Service Taxकेंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर

सीजीएसटी माहिती मराठी (CGST full form in marathi)

CGST information in marathi – हा जीएसटीचा पहिला प्रकार आहे. CGST full form in marathi – सीजीएसटीचा मराठी फुल्ल फॉर्म सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्स (Central goods and service tax) असा आहे. यामध्ये केंद्राच्या कर संकलनाचा समावेश होतो.

एका राज्यात वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच राज्यात विकल्या जाणार्‍या वस्तू किंवा सेवांवर सीजीएसटी आकारला जातो. जेव्हा कुणी दुकानदार आपल्याकडून एसजीएसटी शुल्क आकारतो, याच वेळी तो दुकानदार सीजीएसटी कर सुद्धा आकारतो.

प्रत्येक वस्तू आणि सेवाही निर्धारित केलेल्या नियमानुसार कर आकारणी करण्यात येते. उदा. समजा तुम्ही एक वस्तू खरेदी केली. त्या वस्तूचा निर्धारित कराचा दर हा 28 टक्के आहे. तर त्यातील 14 टक्के कर हा एसजीएसटी आणि उर्वरित 14 टक्के कर हा सीजीएसटी म्हणून आकारला जाईल. हा कर केंद्र सरकारकडे जातो.

एसजीएसटी माहिती मराठी (SGST full form in marathi)

SGST information in marathi – हा जीएसटीचा दुसरा प्रकार आहे. SGST full form in marathi – एसजीएसटीचा मराठी फुल्ल फॉर्म स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स (state goods and service tax) असा आहे. यामध्ये कर आकारण्याची जबाबदारी राज्याची असते. यामध्ये केंद्र हस्तक्षेप करत नाही.

जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा एकाच राज्यात पुरवली जाते, तेव्हा त्यावर एसजीएसटी कर आकारणी केली जाते. हा कर पूर्णपणे राज्याला मिळतो.

जीएसटी कायद्यांतर्गत हा कर राज्यातील सर्व वस्तूंच्या किंवा सेवांच्या खरेदी आणि विक्रीवर आकारला जातो. तसेच या करामधून काही बाबींना सूट देण्यात आली आहे. यामध्ये वीएटी, लक्झरी टॅक्स आणि करमणूक कर यांचा समावेश होतो.

आयजीएसटी माहिती मराठी (IGST full form in marathi)

IGST information in marathi – हा जीएसटीचा तिसरा प्रकार आहे. आयजीएसटीचा मराठी फुल्ल फॉर्म इंटिग्रेटेड गुड्स सर्व्हिस टॅक्स असा आहे. यामध्ये कर संकलन भारतीय संघराज्याच्या अधिकारात येते. नंतर केंद्रीय सरकार गोळा करते, परंतु नंतर ते राज्यांमध्ये हस्तांतरित केले जाते.

जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पुरविली जाते तेव्हा आयजीएसटी कर आकारणी करण्यात येते.

एखाद्या वस्तू किंवा सेवांची विक्री, हस्तांतरण, विनिमय यांसह इत्यादींचा पुरवठा या अंतर्गत केला जातो. बर्‍याच वेळा व्यापारी एकाच राज्यात व्यवसाय करतात. पण त्यासाठी लागणारा माल हा इतर राज्यातून खरेदी केला जातो.

अशा वेळी त्याला दुसर्‍या राज्यात खरेदी केलेल्या वस्तूंवर आयजीएसटी भरावा लागतो.

यूटीजीएसटी माहिती मराठी (UTGST full form in marathi)

UTGST information in marathi – हा जीएसटीचा चौथा प्रकार आहे. UTGST चा फुल्ल फॉर्म केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर (Union Territory goods services tax) असा आहे.

हा कर एसजीएसटीसारखाच आहे. हा कर वसूल करण्याचा अधिकार केवळ केंद्रशासित प्रदेशांना आहे. म्हणजेच ज्याप्रकारे राज्य सरकार एसजीएसटी गोळा करते. तसेच केंद्रशासित प्रदेश यूटीजीएसटी कर आकारणी करतात.

जीएसटी कराचे दर मराठी माहिती – gst rates information in marathi

दरवस्तू आणि सेवा
0%जीवनापयोगी असलेल्या वस्तू आणि सेवा (अन्न-धान्य, मीठ, गूळ, ताज्या भाज्या, वर्तमानपत्र, सॅनिटरी नॅपकिन्स, न्यायिक कागदपत्र)
5%सामान्य वस्तू आणि सेवा (साखर, तेल, मसाले, चहा, कॉफी, खते)
12%दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा (स्नॅक्स, टूथपेस्ट, छत्री, औषधे आणि मोबाईल फोन)
18%इतर वस्तू आणि सेवा (डिटर्जंट, चॉकलेट, मिनरल वॉटर, आइस्क्रीम, शॅम्पू, रेफ्रिजरेटर)
28%चैनीच्या वस्तू आणि सेवा (पान मसाला, ऑटोमोबाईल, पंचतारांकित हॉटेल्समध्ये निवास)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सी जीएसटी म्हणजे काय ?

CGST full form in marathi – केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (Central goods and service tax)

आय जीएसटी म्हणजे काय ?

IGST full form in marathi – इंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर (Integrated goods and service tax)

एस जीएसटी म्हणजे काय ?

SGST full form in marathi – राज्य वस्तू आणि सेवा कर (state goods and service tax)

युटी जीएसटी म्हणजे काय ?

UTGST full form in marathi – केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर (Union Territory goods and service tax)

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण जीएसटी माहिती मराठी – GST information in marathi जाणून घेतली.

त्याचबरोबर सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी माहिती – IGST, SGST, CGST information in marathi जाणून घेतली आहे.

जर तुम्हाला gst marathi mahiti – जीएसटी मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Information source :

  • Tv9marathi
  • Wikipedia

Leave a Comment