आयकर कायदा माहिती मराठी – income tax information in marathi

By | December 3, 2022

income tax information in marathi – असे म्हटले जाते या जगात दोनच गोष्टी अटळ आहेत पहिले मृत्यू अन् दुसरा प्राप्तीकर. प्राप्ती करण विषयी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आणि भीती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्राप्ती कर नीट समजून घेणे गरजेचे ठरते.

प्राप्तीकर हा केंद्र सरकारचा कर असून भारतातील सर्व नागरिकांना हा कर भरावा लागतो. हा कर भरण्यासाठी काही उत्पन्न मर्यादा आहेत. म्हणजेच जर उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच हा कर भरावा लागत असतो.

हे उत्पन्न ठरवण्यासाठी व्यक्तीचे सर्व माध्यमातून येणारी मिळकत म्हणजेच त्याचे एकूण उत्पन्न होय. या लेखात आपण आयकर कायदा माहिती मराठी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण प्राप्तीकर हा कोणाला भरावा लागतो आणि उत्पन्नाचे विभाग या विषयी माहिती मराठी जाणून घेणार आहोत.

Table of Contents

आयकर कायदा माहिती मराठी – income tax information in marathi

income tax information in marathi
आयकर कायदा माहिती मराठी – income tax information in marathi
विषय आयकर कायदा माहिती
स्थापना1860
कार्य उद्योग ,व्यक्ती किंवा संस्था याकडून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारणी
नियंत्रणकेंद्र सरकार आणि राज्य सरकार
कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च (आर्थिक वर्ष)
income tax information in marathi

प्राप्तिकर भरत असताना उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच भरावं लागत असते. यामध्ये वयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंब, एखादी कंपनी किंवा भागीदारी संस्था, व्यक्ती समूह नगरपालिका आणि कायद्याने निर्मित केलेले व्यक्ती यांना कर भरावा लागतो.

हा लेख जरूर वाचाHow do you find your assessing officer ?

कर आकारणी वर्ष माहिती मराठी (fiscal year information in marathi)

fiscal year or financial year definition in marathi – प्रत्येक वर्षाची कर आकारणी करण्यासाठी एक ठराविक कालावधी तयार केलेला आहे. हा कालावधी एक वर्षाचा असून, याची सुरुवात 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान असते, या कालावधीला आर्थिक वर्ष (financial year) म्हटले जाते. यादरम्यान मागील वर्षाचे उत्पन्न पुढील कर आकारणी वर्षात करपात्र होत असते.

1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत जे प्राप्तीकर भरण्यासाठी पात्र ठरतात, त्यांनी या कालावधीत आपला कर भरणे बंधनकारक आहे.

आयकरसाठी उत्पन्न मर्यादा माहिती मराठी (income tax information in marathi)

उत्पन्नाची व्याख्या माहिती मराठी (income meaning in marathi) – एखादी व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा व्यक्ती समूह यांना सर्व मार्गांनी मिळणारी मिळकत म्हणजेच उत्पन्न होय.

आयकर विभागाने उत्पन्नाची व्याख्या स्पष्टपणे व्यक्त केलेली नसून, कलम दोन आणि उपकलम चोवीस यामध्ये वेगवेगळे उत्पन्नाची यादी दिलेली आहे.

कलम 2 आणि उपक्रम 24 यामध्ये दिलेले उत्पन्नाच यादी पुढीलप्रमाणे आहे.

  • नफा व लाभ (profit and loss)
  • लाभांश (dividend)
  • सार्वजनिक संस्थेला मिळालेल्या देणग्या (charity)
  • नोकरदाराला मिळणाऱ्या सोयी आणि सवलती (benefits for salaried employee)
  • संचालकांना त्यांच्या कंपनी कडून मिळालेल्या सोयी आणि सवलती
  • भांडवली नफा (capital gains)
  • लॉटरी, शब्दकोडे, जुगार, शर्यती, पत्ते यासारख्या क्षेत्रातून मिळालेले उत्पन्न

वरील यादीतील प्रत्येक जणांना त्यांचे प्राप्तीकर भरणे बंधनकारक आहे. यातील काही महत्वाची उत्पन्न असणाऱ्या आयकरमधून सुट किंवा करमाफी देण्यात आली आहे.

  • शेतीचे उत्पन्नवर केंद्र सरकार आयकर लावू शकत नाही, उत्पन्नावर राज्यसरकार आयकर लावू शकतात. काही राज्यात शेतीवर आयकर आहे तर काही राज्यात हा कर काढून टाकण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 1989 पूर्वी शेतीवर आयकर होता, त्यानंतर 1 एप्रिल 1989 पासून हा कर काढून टाकण्यात आला आहे.
  • हिंदू अविभक्त कुटुंबाच्या उत्पन्नातील सभासदचा हिस्सा माफ करण्यात आला आहे.
  • इतर मार्गांनी मिळणारी किरकोळ उत्पन्न आयकर मधून माफ करण्यात आले आहे. हे उत्पन्न 5000 पर्यंत माफ आहे.
  • एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या नोकरदारास मालकाकडून प्रवासासाठी दिलेली सूट यावर कर आकारला जात नाही.
  • तसेच एखादा नोकरदार ज्याने त्याचे निवृत्तीवेतन विकून पैसे जमवलेली आहे, त्याला हा कर द्यावा लागत नाही.
  • सार्वजनिक उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तींने मुदतपूर्व सेवानिवृत्ती स्वीकारल्यास मिळणारे उत्पन्न यावर आयकर नसतो.
  • पोस्टातील बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याज या करातून वगळण्यात आले आहे.
  • शिष्यवृत्ती (scholarships)
  • कामगार आणि त्यांच्या संघटनांच्या ठराविक उत्पन्न
  • राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी दिलेली बक्षिसे
  • घरभाडे भत्ता ठराविक मर्यादेपर्यंत
  • राष्ट्रीयीकृत बँका आणि राष्ट्रीय वित्तसंस्था यांनी स्थापन केलेल्या म्युचल फंडाचे उत्पन्न आयकर मधून वगळले आहे.

तसेच कलम 10(अ) प्रमाणे मुक्त व्यापार क्षेत्रातील व्यापारातून मिळणारे उत्पन्न पूर्णता कर माफ असते. ही माफी व्यवसाय स्थापन झाल्यापासून दहा वर्षांपर्यंत असते.

तसेच कलम 10(ब) प्रमाणे फक्त निर्यात वर आधारित असणाऱ्या व्यवसायाचे उत्पन्न पूर्णपणे करमाफ असते.

तसेच कलम 11, 12, 12 (अ), 13 यानुसार गरजू, आजारी अशा लोकांना मदत करण्यासाठी किंवा समाजोपयोगी काम करण्यासाठी पैसे गोळा करणारी संस्था यांना आयकर मधून करमाफी देण्यात आली आहे. यामध्ये धार्मिक संस्थेचा समावेश होत नाही.

कलम 13(अ) यानुसार भारताचे निर्वाचन आयोगाकडे नोंदवल्या गेलेल्या राजकीय पक्षाच्या उत्पन्नावर आयकर लावला जात नाही.

उत्पन्नाचे प्रकार माहिती मराठी (income types information in marathi)

income types information in marathi
उत्पन्नाचे प्रकार माहिती मराठी

मासिक वेतन, घरापासून मिळणारे भाडे, व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न, भांडवली नफा, लाभांश आणि मशिनरी भाडे हे उत्पन्नाचे प्रमुख प्रकार आहेत.

मासिक वेतन (monthly salary) – एखादी कंपनी किंवा संस्था याकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आणि सवलतीचा यात समावेश होतो. या उत्पन्नातून काही प्रमाणित वजावट होत असते.

घरापासून मिळणारे भाडे (room rent) – यामध्ये स्वतःच्या मालकीचे घर भाड्याने देऊन भाडे आकारले जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्थानिक नगरपालिका कर आकारते.

व्यवसाय (bussiness) – व्यवसायात मिळालेला वार्षिक नफ्यावर आयकर द्यावा लागतो.

हा लेख जरूर वाचाकंपनी माहिती मराठी

भांडवली नफा (capital gains) – यामध्ये एखादी मालमत्ता किंवा वस्तू कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकली जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारणी केली जाते.

यात प्रामुख्याने स्टॉक मार्केट (stock market), रिअल इस्टेट (real estate), जुन्या गाड्या खरेदी-विक्री (vehicle agent) अश्या बाबींचा समावेश होतो. स्टॉक मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक एक ठराविक लाभांश देते.

हा लेख जरूर वाचाशेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे ?

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण आयकर कायदा माहिती मराठी (income tax information in marathi) जाणून घेतली.

त्याचबरोबर उत्पन्नाची व्याख्या, उत्पन्नाचे प्रकार आणि उत्पन्नाची यादी मराठी माहिती पाहिली आहे.

आयकर कायदा माहिती मराठी (income tax information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला आयकर कायदा मराठी माहिती (income tax information in marathi) आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्राप्तिकर म्हणजे काय ?

वैयक्तिक, संस्था किंवा कंपनी, व्यक्ती समूह यांच्या एकूण उत्पन्नावरील कर म्हणजे प्राप्तिकर होय. हा एक अप्रत्यक्ष कर असून संबंधित असलेल्या करदात्याला भरणे बंधनकारक आहे.

आयकर भरला नाही तर काय होईल ?

आयकर भरला गेला नाही तर बऱ्याच समस्या निर्माण होतात, त्या पुढीप्रमाणे आहेत.
1. जर तुमचे एकूण उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 1000 रुपये दंड भरावा लागेल.
2. कर आकारणीच्या 50 टक्के दंड भरावा लागेल.
3. कर देयकावर 1 टक्के दराने व्याज भरावे लागते.
4. तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि कोर्ट दंड लावू शकते.
5. आयकर न भरल्यास कोणतेही कर्ज मिळत नाही.
6. टीडीएस (Tax deduction at source) डबल रेटने कापला जाईल.
7. मॅच्युअल फंडातून मिळणारा परतावा मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *