15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माहिती मराठी

Independence Day 2023 In Marathi – आपल्या भारताचा इतिहास पाहिला तर त्यात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन होय. म्हणूनच की काय हे वाक्य स्वातंत्र्य दिनाला सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदकाच्या तोंडी कायम ऐकायला मिळते.

स्वतंत्र भारत होण्यामागे अनेक जणांचे योगदान आहे. यासाठी 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते.

देशभर मोठ्या उत्साहाने भारतीय स्वातंत्र्य दिवस हा साजरा केला जातो. या लेखातून आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माहिती मराठी (Independence Day 2023 In Marathi) जाणून घेणार आहोत.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माहिती मराठी (Independence Day 2023 In Marathi)

Independence Day 2023 In Marathi

भारताच्या स्वातंत्र्य दिनाची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. ज्या भारत भूमीमध्ये आपण राहतो, ती भारतभूमी कित्येक वर्ष परकीयांच्या गुलामगिरी मध्ये होती तिला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.

इन्कलाब जिंदाबाद म्हणत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावर चढले. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा देऊन स्वातंत्र्याच्या लढ्याला बळकटी देण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले.

शिवजयंती सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करायला लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली ते सुरू करण्यामागे एक छुपी भूमिका होती ती म्हणजे अप्रत्यक्षरीत्या लोकसंघटन करणे इंग्रजांविरुद्ध आवाज उठवणे.

एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांसारखी मंडळी आपापल्या परीने प्रयत्न करत होती. त्याचवेळी दलितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका! संघटित व्हा! आणि संघर्ष करा हा संदेश इथल्या तरुणांना संदेश  देत होते.

भारत देशाला स्वातंत्र्य तर मिळाले परंतु ते स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी देशाचा राज्यकारभार व्यवस्थित रित्या चालण्यासाठी गरज होती ती संविधानाची. या संविधान निर्मितीच्या कामात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही आपल्या भारत देशाची आहे याचा आपल्याला अभिमान हवा.

या संविधान निर्मितीमुळे ‘सर्व लोक कायद्यापुढे समान’ अशी भूमिका आकारास आली. या संविधानामुळे देशाचा राज्यकारभार व्यवस्थित चालू आहे तसेच यापुढेही निरंतर राहील.

एक प्रकारे लोकशाहीला बळकटी देण्यासाठी संविधानाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली म्हणूनच आपण मोठ्या दिमाखात संविधान दिन साजरा करतो.

भारताच्या संविधानाची उद्देशिका वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकता या तत्त्वांनी राज्यघटना कशी ठासून भरलेली आहे.

भारतामध्ये अनेक जाती, धर्म, पंथ जरी असले तरी सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना दिसतात. भाषेच्या आधारावर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती करण्यात आली.

देशाला जसे स्वातंत्र्य मिळाले तशी आपली भाषिक अस्मिता जपण्यासाठी मराठी बांधवांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा हट्ट धरला. गुजराती भाषिकांनी गुजरात स्वतंत्र राज्य व्हावे असा हट्ट धरला. अगदी त्याच पद्धतीने गोवा मुक्ती दिनाच्या माध्यमातून देखील भारतातील एक सर्वात स्वतंत्र छोटे राज्य म्हणून गोवा राज्याची ओळख याच धरतीवर झालेले आपल्याला दिसते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण मराठी माहिती (Independence Day 2023 In Marathi)

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली म्हणूनच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. शालेय विद्यार्थ्यांना देशाचा स्वातंत्र्य लढा कळावा यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेऊन आपल्या कलागुणांची चुणूक दाखवावी हीच यामागील मुख्य भूमिका आहे.

विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावेच, परंतु त्यावेळी आवर्जून आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनासाठी बनवलेले फलक एक मिनिट का होईना जरूर बघावेत. कारण आपला इतिहास जिवंत करण्याची ताकद त्या फलक लेखनामध्ये असते.

अवघ्या काही दिवसांवर 15 ऑगस्ट अर्थात आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन येऊन ठेपलेला आहे. आपल्याला या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्यासमोर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जागृत करणाऱ्या छान छान रांगोळ्या काढल्या जातील. मुले स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भगतसिंग राजगुरू सुखदेव तसेच अन्य महापुरुषांचे देखील आपल्या भाषणातून गुणगान करतील.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंग्याला सलामी करून आपण ज्यावेळी विजयी विश्व तिरंगा प्यारा हे ध्वजगीत म्हणतो, त्यावेळी अंगामध्ये एक वेगळीच लहर आलेले असते आणि ती लहर असते देशभक्तीची. त्या तिरंग्याकडे पाहून प्रत्येक भारतीयाची एकच भूमिका असते माझा तिरंगा माझा अभिमान.

एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरदार सुरू आहे परंतु आपल्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांना आपली ही प्रगती डोळ्यांमध्ये खूप खूपताना दिसत आहे. त्यांच्याकडून आपल्यावरती अनेक भ्याड हल्ले होताना दिसत आहेत.

26 11 ला मुंबई या ठिकाणी झालेला आतंकवाद्यांचा भ्याड हल्ला पुलवामा येथील हल्ला अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील. यासाठी आपण सर्व भारतीयांनी सजग राहणे ही काळाची गरज आहे.

आतंकवादी हल्ले करणाऱ्या व्यक्ती आपल्यापैकीच कोणालातरी हाताशी धरून आपली मोहीम आखत असतात म्हणून देश माझा मी देशाचा या भूमिकेतून असे कोणी गैर काम करत असेल त्यांना थारा दिला नाही तर आपल्या देशावर कोणत्याही प्रकारची संकटे अजिबातच येणार नाहीत.

थोडक्यात काय तर देशाप्रती आपण आत्मसमर्पणाची भावना ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

सारांश

या लेखातून आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माहिती मराठी (Independence Day 2023 In Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

आशा करतो की, तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच सामायिक करा.

तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा…

तुम्हाला आवडतील असे काही लेख –

  1. भगत सिंह राजगुरु सुखदेव भाषण
  2. 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी
  3. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निबंध
  4. 15 ऑगस्ट निमित्त लहान मुलांचे भाषण मराठी
  5. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी माहिती
  6. भारतीय स्वातंत्र्यदिन माहिती मराठी
  7. संविधानाची उद्देशिका म्हणजे काय?

Leave a Comment