Independence Day Information In Marathi – जगातील प्राचीन संस्कृतीने नटलेला भारत आशिया खंडातील महत्वाचा देश आहे. या देशात अनेक साम्राज्य उदयास आले व लयास गेली. यामध्ये इसवी सन 1757 ते इसवी सन 1947 या कालखंडात इंग्रजांचे वर्चस्व भारतावर राहिले. अनेक आंदोलने, लढाई आणि बलिदानानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले.
स्वतंत्र भारत होण्यामागे अनेक जणांचे योगदान आहे. यासाठी 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते. देशभर मोठ्या उत्साहाने भारतीय स्वातंत्र्य दिवस हा साजरा केला जातो.
या लेखातून आपण भारतीय स्वातंत्र्य दिवस माहिती मराठी (Independence Day Information In Marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण ब्रिटिशकालीन भारत, ब्रिटिशांचे वर्चस्व आणि स्वातंत्र्यदिनाचा इतिहास इत्यादी विषयांवर माहिती पाहणार आहोत.
Table of Contents
- ब्रिटिश साम्राज्य मराठी माहिती (British Rule In India Information Marathi)
- ब्रिटिशांचे वर्चस्व माहिती मराठी (British Rule Information In Marathi)
- भारतीय स्वातंत्र्यदिन माहिती मराठी (Independence Day Information In Marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
ब्रिटिश साम्राज्य मराठी माहिती (British Rule In India Information Marathi)

इसवी सन 16व्या शतकात सर्वप्रथम ब्रिटिश भारतात आले. त्या वेळेस भारत देशात मुघलांची सत्ता होती. ब्रिटिश येण्याअगोदर भारत देश नैसर्गिक साधनसंपत्तीने बहरलेला होता. या मातीत पीक असो वा खनिज मोठ्या प्रमाणावर मिळत असे.
भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या भारताने मोठा वारसा दिला असला तरी, सुरवातीच्या टप्प्यात देशातील बऱ्यापैकी समाज धर्म आणि अंधश्रध्दाच्या नावाखाली अडाणी आणि अशिक्षित राहिला होता.
पण व्यापारीदृष्ट्या भारत देश सुरवातीला पुढारलेला होता, असे मानले जाते. भारत देशात अनेक साम्राज्य उदयास आली, त्यातील तमिळनाडूतील चोल साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन.
इसवी सन अकराव्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासीम याने सिंध प्रदेश जिंकून ताब्यात घेतला आणि देशात इस्लामी राजवट चालू झाली. या वेळेस भारत देशातील बऱ्यापैकी राज्य आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होती.
इंग्रज साम्राज्य उदयास येण्याअगोदर देशात विविध प्रांत विभागलेला होता. मराठा साम्राज्य, मुघल साम्राज्य अशी विविध राज्यकर्ते होते यावेळी जवळपास 562 संस्थाने भारतात अस्तित्वात होती. ही संस्थाने सुरवातीच्या काळात एकजूट नसून, बहुतांश जण साम्राज्य विस्तार करण्यात गुंतलेले होते.
मुघल साम्राज्याचा विस्तार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मुघल साम्राज्याचे पतन करून हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. पानिपतच्या युद्धात दारुण पराभवानंतर मराठा साम्राज्याचे पतन सुरू झाले याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला.
एकीकडे युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापन केल्या. तर दुसरीकडे इंग्रज लोक, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारताच्या सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणले.
ब्रिटिशांचे वर्चस्व माहिती मराठी (British Rule Information In Marathi)
इसवी सन 1600 मध्ये आलेले ब्रिटिश इंग्रज लोक इसवी सन 1858 मध्ये भारताचे राज्यकर्ते बनले. इसवी सन 1858 ते इसवी सन 1947 या कालखंडात ब्रिटिश सरकारचे राज्य असल्याने या कालखंडातील भारतास ब्रिटिश इंडिया म्हणून ओळखले जाते.
ब्रिटिशांनी भारतातील अमाप संपत्ती लुटून त्यांच्या देशात नेली. व्यापार आणि सत्ता यांची मजबूत साथ असल्याने इंग्रजांना ते शक्य झाले. इंग्रजांची राजवट पद्धती बंद करून सर्व ताबा आपल्या हाती घेतला. त्यामुळे राजे नुसते नामधारी बनले, तसेच काही राजांना इंग्रजांकडून पेन्शन मिळत असे.
ब्रिटिशांनी ब्रिटनला फायदा व्हावा, या हेतूनं भारतात काही सुविधा केल्या. तसेच महत्वपूर्ण सामाजिक बदल घडवून आणले.
भारताचे आधुनिकीकरण करण्यात इंग्रजांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. टपाल सेवा, रेल्वे मार्ग आणि तार सेवा इंग्रजांनी भारतात सुरू केल्या.
विल्यम केरी या ब्रिटिशाने मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश, मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रण केले. तसेच इंग्रजी भाषेचा विस्तार आणि शिक्षणाचा प्रसार केला.
- न्यायालयाची स्थापना केली.
- धरणे व कालवे बनविले.
- शाळा सुरू केल्या आणि त्यात इंग्रजी भाषा सर्वांपर्यंत पोहचवली.
- वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले.
- प्रशासकीय परीक्षा आणि यंत्रणा तयार केली.
- औद्योगिक कारखान्यांची निर्मिती केली.
- वाईट चालीरीती बंद करण्यास प्रोत्साहन दिले, त्यासाठी कायदे केले.
- भारतातील सर्व जमीन मोजून त्याचे रेकॉर्ड तयार केले. प्रशीक्षित मिलीटरी तयार केली.
- लोकशाहीची सुरुवात करून दिली, इसवी सन 1936 व 1946 साली भारतात इंग्रजांचे राज्य असताना निवडणूका झाल्या.
अश्या विविध सुविधा निर्माण केल्या असल्या तरीदेखील भारतीय जनतेवर त्यांनी विविध मार्गांनी अन्याय केला. दररोज वापरण्यात येणाऱ्या मिठावर त्यांनी मोठ्या प्रमाणात कर लावला. तसेच शेतीवर बेसुमार कर आकारणी सुरू केली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.
इंग्रजांनी शेतकऱ्यांना जबरदस्तीने खाद्यपिकाचे पीक घेण्याऐवजी नगदी पिक लागवड करायला लावत परिणामी पुढे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला. यामुळे भुकबळीची संख्या वाढली.
इंग्रजाच्या वसाहतीत काम करणारे कामगारांना अनेक अडचणी येत होत्या. इंग्रजांनी केलेले कायदे फाही फायद्याचे तर काही घातक ठरले. या जुलमी इंग्रजांनी निर्दोष लोकांना फाशीची शिक्षा दिली. तर कित्येकाना तुरुंगवास भोगावा लागला.
Related – भगत सिंह राजगुरु सुखदेव माहिती मराठी
भारतीय स्वातंत्र्यदिन माहिती मराठी (Independence Day Information In Marathi)

विषय | भारत स्वतंत्र दिवस |
प्रकार | राष्ट्रीय सण |
महत्व | इंग्रज राजवटीमधून सुटका झाली |
तारीख | 15 ऑगस्ट 1947 |
ठिकाण | आशिया खंडातील देश |
Independence Day Information In Marathi – जवळपास दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश सोडला आणि भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण गमावले. स्वतंत्र भारत होण्यामागे अनेक जणांचे योगदान आहे. यासाठी 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते. देशभर मोठ्या उत्साहाने भारतीय स्वातंत्र्य दिवस हा साजरा केला जातो.
Related – 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी
स्वातंत्र्यदिनी भारत देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवतात. यानंतर राष्ट्रगीताचे गायन केले जाते. मग देशाचे प्रधानमंत्री आणि देशातील तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर जातात आणि भारतीय थोर नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात.
Related – 15 ऑगस्ट निमित्त लहान मुलांचे भाषण मराठी
15 ऑगस्ट रोजी देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात राष्ट्रध्वजाचा सन्मान, गीत गायन आणि निबंध, भाषणाचे कार्यक्रम घेतले जातात.
Related – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निबंध मराठी
देशभरातील लोक एकमेकांना गोड पदार्थ वाटून स्वातंत्र्यदिवस अगदी आनंदात साजरा करतात. जे व्यक्ती भारत देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत, असे नेते, विद्यार्थी, खेळाडू, गायक अश्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना भारत सरकारकडून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो.
सारांश
या लेखातून आपण भारतीय स्वातंत्र्यदिन याविषयी माहिती मराठी (Independence Day Information In Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.
आशा करतो की, तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच सामायिक करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे हा दिवस देशभर स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते.
ब्रिटिश पूर्व काळात भारतात कोणते व्यवसाय चालत होते ?
भारतात कपड्यांचा , मसाले पदार्थांचा, जहाजबांधणीचा, कातडी व्यवसाय आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय हे प्रामुख्याने केले जायचे.
तुम्हाला आवडतील असे लेख –