India national fruit mango in marathi – भारतीय राष्ट्रीय फळ आणि कोकणचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जगात आंब्याचे सर्वाधिक उत्पन्न आपल्या भारत देशात होते. आंबा हा फळांचा राजा असून भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. भारत देशाच्या व्यतिरिक्त इतर देशांतही आंबा खूप प्रसिद्ध असून त्याला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. यासाठी दरवर्षी 22 जुलै रोजी जागतिक आंबा दिवस साजरा केला जातो.
या लेखातून आपण भारताचे राष्ट्रीय फळ – आंबा माहिती मराठी (india national fruit mango in marathi) जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- भारताचे राष्ट्रीय फळ – आंबा माहिती मराठी (india national fruit mango in marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
भारताचे राष्ट्रीय फळ – आंबा माहिती मराठी (india national fruit mango in marathi)

नाव | आंबा |
वैज्ञानिक नाव | Mangifera indica |
प्रकार | फळझाड |
जात | Magnoliopsida |
वर्ग | Sapindales |
फळांचा रंग | पिवळा, केशरी आणि लाल |
आढळ | जगभर |
प्रसिध्दी | फळांचा राजा |
जगभरात प्रचंड मागणी आणि प्रसिध्दी असणारे फळ म्हणजे आंबा होय. असे असले तरीदेखील या फळाच्या झाडाचा उगम कुठे झाला ? याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. आंब्याची चव आणि गुणधर्मामुळे तो इतर फळांपेक्ष्या वरचढ ठरतो, म्हणून तर त्याला फळांचा राजा म्हणतात.
आंबा झाड विषुवृत्तीय प्रदेशात प्रदेशात आढळते. दक्षिण आशिया खंडात हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येते. आंब्याचे झाड हे साधारण 40 मीटरपर्यंत वाढते. झाडाची पाने सदाबहार असून असून कोवळी असताना त्यांचा रंग थोडा केशरी आणि गुलाबी असतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.
आंब्याची फुले 10 ते 40 सेमी लांबीच्या गुच्छामध्ये तयार होतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असतात, या पाकळ्या साधारण 10 मिमी आकाराच्या असतात. त्यानंतर काही दिवसांनी आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला मोहोर असे म्हणतात. हा सुवासिक असून साधारण जुलै व ऑगस्ट महिन्यात येतो.
आंब्याच्या झाडाला आलेल्या फळांना आंबा असे म्हणतात. हे फळ कच्चे असताना हिरव्या रंगाचे असते. त्याला कैरी असे म्हणतात. कैरी ही चवीला आंबट असते. कैरी पिकल्यावर तिची चव बदलून गोड होते. पूर्ण पिकलेली आंबा फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलत जातो.
भारतात आंबा सर्व ठिकाणी आढळून येते. आपल्या देशात आंब्याच्या 1300 जाती आढळतात. यातील 25-30 जाती व्यापारीकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत.
यातील हापूस ही आंब्याची जात सर्वात प्रसिद्ध असून याची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर करतात. रत्नागिरी आंबा हा भारतात आढळणाऱ्या आंब्याच्या सर्वोत्कृष्ट जातींपैकी एक आहे. हा आंबा सर्वात महाग असून जगभरात याची खूप मागणी आहे.
हा लेख जरूर वाचा – केळी खाण्याचे फायदे माहिती मराठी (banana benefits in marathi)
आंब्याचे प्रकार – महाराष्ट्रातील आंब्याच्या जाती माहिती मराठी (mango types in maharashtra mahiti)
जगभरात आंब्याचे खूप प्रकार आहेत. त्यापैकी 1300 प्रजाती आपल्या भारत देशात आढळतात. यातील काही प्रजाती आपल्या महाराष्ट्रात असून त्या सर्वोत्कृष्ट जातींपैकी एक आहेत.
#1 हापूस – हापूस आंब्याची चव आणि सुगंध अप्रतिम असून, हा आंबा चविला अत्यंत गोड आणि रसदार असतो. हापूस आंबा मूळचा महाराष्ट्राचा आहे, तसेच याची लागवड गुजरात आणि कर्नाटक या प्रदेशात केली जाते.
हापूस आंबा ही प्रजात खूप लोकप्रिय आहे, हा आंबा सर्वात महाग विकला जातो. तसेच या आंब्याला जगभरात प्रचंड मागणी आहे त्यामुळे जगभरात याची निर्यात केली जाते.
हापूस आंबा कसा ओळखावा (how to identify hapus mango in marathi) – हापूस आंब्याची साल भगव्या रंगाची असते. हापूस आंब्याची चव आणि सुगंध अप्रतिम असून, हा आंबा चविला अत्यंत गोड आणि रसदार असतो. यावरून हापूस आंबा ओळखावा.
#2 रत्नागिरी आंबा – हा भारतात आढळणाऱ्या आंब्याच्या सर्वोत्कृष्ट जातींपैकी एक आहे आणि हा आंबा सर्वात महाग विकला जातो. या आंब्याचे वजन 150 ते 200 ग्रॅम असते. महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी, देवगड, रायगड आणि कोकण या भागात रत्नागिरी आंबा पिकवला जातो.
रत्नागिरी आंबा कसा ओळखावा (How to identify Alphonso mango in marathi) – रत्नागिरी आंब्याच्या वरच्या बाजूला लाल रंगाची छटा असते. यावरूनच रत्नागिरी आंबा ओळखावा.
#3 रत्ना आंबा – नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. हा हापूस आंब्याचा एक प्रकार असून हा आंबा आकाराने मोठा असतो. याची चव हापूस सारखी नसली तरी खूप चविष्ट असतो.
#4 केशर आंबा – हा आंबा मूळचा गुजरातमधील असून, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर याची मागणी असते. या आंब्याला केसरी रंग असतो. हे आंबा चवीला फार गोड असतात.
याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात बिनकोयीची सिंधू, कावसजी पटेल, पायरी, आम्रपाली, तोतापुरी, राजापुरी या आंब्याच्या जाती आढळतात.
हा लेख जरूर वाचा – पपनस मराठी माहिती (grapefruit information in marathi)
आंब्याचे उपयोग माहिती मराठी (mango benefits in marathi)
प्रामुख्याने आंब्याचा वापर अन्नासाठी करतात, तसेच औषधी व धार्मिक कार्यासाठी आंबा वापरला जातो. आंब्यापासून अनेक उत्पादन तयार केले जाते.
आंब्याचा रस, जेली आणि जाम बनविताना आंबा वापरला जातो. आंब्याच्या रसाच्या वड्या, आंबापोळी, आम्रखंड अशी विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात.
भारतात अनेक ठिकाणी आंबा हा रस करण्यासाठीच वापरला जातो. पिकलेल्या आंब्याचा आमरस करतात किंवा फोडी करून खातात.
महाराष्ट्रात कच्च्या आंब्याचे चविष्ट लोणचे करतात. कच्च्या आंब्याच्या फोडी उन्हात वाळवून आमटी करताना वापरतात. राजापुरी कैऱ्यांपासून मुरांबा, साखरांबा बनतो. हिरव्या कैऱ्याची किसून, वाळवून पावडर केली जाते, ही पावडर मसाला म्हणून वापरतात. तसेच कैरीची आंबट-तिखट चटणी केली जाते.
आंब्याचे औषधी उपयोग माहिती मराठी (mango medicinal uses in marathi)
आंब्यात अ आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. अ जीवनसत्त्व जंतुनाशक असते तर क जीवनसत्त्व त्वचारोग हारक आहे. त्यामुळे आंबा आपल्याला उत्तम आरोग्य राखण्यास मदत करतो. आंबा खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुधारते.
याव्यतिरिक्त आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ पित्त दूर करतो. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. यावेळेस कैरीचे पन्हे पिल्यास आराम मिळतो.
कच्च्या कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ केली की घामोळ्या पासून होणारा त्रास नाहिसा होतो. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांना लावल्याने दातांच्या वेदना कमी होतात.
आंब्याच्या कोवळ्या पानाच्या रसाने आवाज सुधारतो तसेच खोकला कमी होतो. पायांच्या टाचावर भेगा पडल्या असेल, तर आंब्याच्या पानांचा चीक लावावा, त्यामुळे पायांच्या टाचावरील भेगा नाहीश्या होतात.
हा लेख जरूर वाचा – झाडांचे उपयोग माहिती (uses of trees in marathi)
आंब्याचे धार्मिक महत्व याविषयी माहिती (mango religion uses in marathi)
आंब्याला धार्मिक कार्यातही खूप मह्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. कलशपूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. कलशात नेहमी आंब्याची पाने ठेवतात.
हा लेख जरूर वाचा – भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती (india’s major religion information in marathi)
सारांश
या लेखातून आपण भारताचे राष्ट्रीय फळ – आंबा माहिती मराठी (india national fruit mango in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
पातळ कोय असणारी आंब्याची जात कोणती आहे ?
पातळ कोय असणारी आंब्याची जात सिंधू आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे.
आंबा शास्त्रीय नाव काय आहे ?
आंबा शास्त्रीय नाव मॅनजिफेरा इंडिका असे आहे.
कच्चा आंब्याचे पदार्थ कोणकोणते आहेत ?
कच्चा आंब्याचे पदार्थ पुढीलप्रमाणे आहेत.
कैरी सॉस
कैरीची कढी
कैरीची चटणी
कैरीचे सरबत
लुंजी
कैरीचे रायते
पन्हे
कैरीचा भात
कैरी डाळ
कैरी सालसा
कैरी टॉपिंग
कैरीची भाजी
सलाड लोणचे
भारताचे देशाचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ?
भारताचे देशाचे राष्ट्रीय फळ आंबा हे आहे.
जागतिक आंबा दिवस कधी साजरा केला जातो ?
जागतिक आंबा दिवस 22 जुलै साजरा केला जातो.
जगात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन कोठे घेतले जाते ?
जगात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन भारत देशात घेतले जाते. भारतात जगभरातील आंब्याचे उत्पादनापैकी 56 % उत्पादन घेतले जाते.
आंब्याच्या बी ला काय म्हणतात ?
आंब्याच्या बी ला कोय असे म्हणतात.