Indian parrot marathi – पोपट हा अतिशय सुंदर आणि चंचल पक्षी आहे. याच्या मनमोहक रूपाला सर्वजणच आकर्षित होतात. यामुळे पोपट पक्ष्याला पाळण्यास जास्त पसंती दिली जाते. हा पक्षी माणसात राहून मानवी बोली शिकू शकतो.
हिरवे, पांढरे, निळे तर पिवळे असे विविध रंगाचे पोपट जगभरात आढळतात. आपल्या भारतात प्रामुख्याने हिरव्या रंगाचा पोपट पक्षी आढळतो. या लेखातून आपण भारतीय पोपट माहिती (Indian parrot marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
पोपट पक्षी माहिती मराठी (parrot bird information in marathi)

नाव | पोपट (parrot) |
वैज्ञानिक नाव | सिटाक्युला क्रामेरी |
उगम | ऑस्ट्रेलियन प्रदेश |
आयुर्मान | 30 ते 40 वर्ष |
पोपट पक्षी जगातील सर्व प्रदेशात आढळत असला तरीही त्याचे उगमस्थान ऑस्ट्रेलियन प्रदेशाला मानले जाते. दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात पोपटाच्या सर्वाधिक जाती आणि प्रकार आढळतात. या पक्ष्याच्या कुळात 82 वंश व त्यांच्या 316 जाती दिसून येतात.
यातील बहुतांश प्रजाती उष्कटिबंधीय प्रदेशात वास्तव्य करतात. प्रत्येक प्रजातीमधील पोपट विविध रंगाचे असतात. यामध्ये हिरवा, करडा, पिवळा, पांढरा, निळा, जांभळा असे रंग आहेत.
पिकाची व फळांची नासाडी करणारा पक्षी म्हणून माणसाने पोपटची बेसुमार हत्या केल्यामुळे यांच्या अनेक जाती नामशेष झाल्या आहेत. मॅस्करीन आणि त्याच्या जवळपासच्या बेटांवर आज एकही पोपट शिल्लक नाही.
भारतीय पोपटाची माहिती मराठी (Indian parrot marathi)

भारतात पोपटांच्या पाचसहा जाती आहेत. यातील तीन प्रजात सर्वत्र आढळणाऱ्या असून बाकीच्या काही विशिष्ट प्रदेशांपुरत्याचा मर्यादित आहेत. राघू जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला यूपॅट्रिया असे आहे.
भारतात आढळणाऱ्या लहान पोपटाला कातरा म्हणून ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव लोरिक्युलस व्हर्नॅलिस आहे. लहान झाडे, कळकांची वने, फळांच्या बागा आणि मळे या ठिकाणी हा पोपट आढळतो.
हा पोपट साधारणपणे चिमणी इतक्या आकाराचा असतो. या पोपटाची शेपटी मोठ्या पोपटांच्या तुलनेत आखूड असते, म्हणून याला लांडा पोपट असेही म्हणतात. शरीराचा रंग गवतासारखा हिरवा, तर पंख आणि शेपटी गडद हिरव्या रंगाची असते.
रंग इतका हिरवा असतो की, जर हा पोपट हिरव्या पालवीच्या झाडांवर बसला तरीही तो ओळखू येत नाही. चोच लाल व वाकडी, डोळे पिवळसर पांढरे असून डोळ्यांभोवती पिवळे कडे असते.
राघू नराच्या गळ्याजवळ निळा डाग असतो पण मादीच्या कंठावर नसतो. पाय पिवळसर किंवा फिकट नारिंगी ते लाल असतात.
एखादी पोकळी ते घरटे म्हणून वापरतात. तसेच झाडांच्या खोडावर चोचीने कोरून ते घरटे तयार करतात. या घरट्यात नर आणि मादी एकत्र राहतात.
त्यांचा प्रजनन काळ जानेवारीपासून एप्रिलपर्यंत असतो. या काळात मादी तीन अंडी घालते. ही अंडी लहान आणि पांढऱ्या रंगाची असतात. तीन आठवड्यानंतर अंडी फुटून पिले बाहेर पडतात. या पिलांचे दोघे मिळून संगोपन करतात.
एकटा किंवा थव्याने राहतो. झाडांची फळे, फुलातील पुंकेसर, पांगाऱ्याच्या फुलातील मकरंद इत्यादी पोपटाचे खाद्य आहे. विशेष म्हणजे तो नेहमी फांदीला उलटे लटकून तो फळे खाताना दिसतो.
फांदीला उलटे लटकून तो फळे खाताना दिसतो आणि ताडाच्या झाडाला टांगलेल्या मडक्यातील ताडी पितो. तसेच तो वटवाघळाप्रमाणे झाडाच्या फांदीला पायांनी उलटे टांगून घेऊन तो रात्री झोप काढतो.
भारतातील पोपटाच्या प्रजाती माहिती (different types of indian parrot marathi)

दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे पोपटाच्या विविध जाती आढळून येतात. भारतात पोपटाच्या 13 जाती आढळतात. यांपैकी चार जाती जास्त प्रमाणात दिसून येतात.
राघू – याचा आकार कबुतराएवढा असतो. याचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला यूपॅट्रिया असे आहे. त्याची लांबी 50 सेंमी असते. आपल्या आजूबाजूला रानात किंवा बागेत ही प्रजात आढळते.
शरीराचा रंग हिरवा आणि खालच्या बाजूला फिकट हिरवा असतो. चोच लाल, आखूड आणि वाकडी असते. मानेभोवती गुलाबी कंठा असतो.
पंखावर लाल रंगाचा ठिपका असतो. खांद्यावर तांबडा पट्टा असतो. मादीला गुलाबी वलय नसते. राघू दिसायला सुंदर असल्याने याला पाळले जाते. विशेष म्हणजे तो माणसाच्या सहवासात राहून माणसाच्या आवाजाची नक्कल करू शकतो.
कीर – या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला क्रॅमरी आहे. हा आकाराने साळुंकीपेक्षा मोठा आणि राघूपेक्षा लहान असतो. हा फळे खाताना ‘किकSS किॲकSS किॲकSS’ असा कर्कश आवाज करतो. म्हणून याला कीर नाव पडले.
संपूर्ण भारतात ही प्रजात आढळते. कीरची लांबी 40 सेंमी असते. याच्या शरीराचा रंग हिरवा असतो. याला पाळण्यासाठी प्राधान्य दिले जाते. सर्कशीत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करून दाखविण्यासाठी यांना शिकविले जाते. हा माणसाच्या आवाजाची नक्कल करणे सहज शिकतो.
लालडोकी पोपट – याचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला सायनोसेफेला आहे. याचा साळुंकीइतका आकार असतो. नराचे डोके लाल, मानेभोवती बारीक काळे वलय आणि खांद्यावर तांबडा डाग असतो. मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा असतो. पण तिच्या मानेभोवती पिवळ्या रंगाचे वलय आणि खांद्यावर तांबडा डाग नसतो.
नीलपंखी पोपट – याचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला कोलुंबॉयडेस आहे. त्याची लांबी 38 सेंमी असते. शेपटी लांब, टोकदार व निळी असते. शरीराचा रंग राखट हिरवा, पंख निळसर हिरवे, नराची चोच लाल असून टोकाकडे पिवळी असते. नराच्या व मादीच्या गळ्याभोवती काळा कंठ असतो. नीलपंखी पोपट दिसायला आकर्षक असतो.
तोता – या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला सायानोसेफाला असे आहे. हा मुख्यतः जंगलात राहतो. हिमालायात 1,830 मी. उंचीपर्यंत तो दिसून येतो. तोता साळुंकीएवढा असतो.
नराचे डोके निळसर तांबड्या रंगाचे, खांद्यावर मोठा तांबडा डाग, शेपटीची मधली पिसे निळी व त्यांची टोके पांढरी असतात. मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा मानेभोवती पिवळ्या रंगाचे वलय असते पण खांद्यावर तांबडा डाग नसतो. चोच शेंदरी रंगाची असते.
सारांश
या लेखातून आपण भारतीय पोपटाची माहिती मराठी (Indian parrot marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
पोपट काय खातो ?
साधारणपणे पोपट शाकाहारी असतात. पण काही पोपट किडेही खातात. ज्वारी, बाजरी अशी धान्ये, फुलातला मध आणि सर्व लहानमोठी फळे हे पोपटाला खायला आवडते.
पोपट कुठे राहतो ?
पोपट एखादी पोकळी घरटे म्हणून वापरतो. तसेच झाडांच्या खोडावर चोचीने कोरून ते घरटे तयार करतात. या घरट्यात पोपट एकटा किंवा जोडीने राहतात.
पोपटाच्या घराला काय म्हणतात ?
पोपटाच्या घराला ढोली असे म्हणतात.
पोपट समानार्थी शब्द मराठी
राघू, मिठू, तोता
पोपट किती वर्ष जगतो ?
पोपट साधारणपणे 30 ते 40 वर्षे जगतात. काही पोपट 80 वर्षे जगल्याचीही नोंद आहे.
पुढील वाचन :