नीलकंठ पक्षी माहिती मराठी

Categorized as Blog

Indian Roller Bird Information In Marathi – निलकंठ हा पक्षी माळरानात बऱ्याचदा तुम्ही पाहिला असेल. हा पक्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा राज्यांचा राज्यपक्षी आहे. या लेखातून आपण नीलकंठ पक्ष्याची माहिती मराठी (Indian Roller Bird Information In Marathi) जाणून घेणार आहोत.

नीलकंठ पक्षी माहिती मराठी (indian roller bird information in marathi)

नावनीलकंठ (indian roller/Blue Jay)
इतर नावेभारतीय नीलपंख, चास
शास्त्रीय नावCoracias benghalensis
प्रकारपक्षी
आढळभारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार

भारतीय नीलकंठ भारतात सर्वत्र आढळतो. हा पक्षी हिवाळ्यामध्ये हिमालयातून स्थलांतर करून इतर प्रदेशात येतात. भारत देशासह बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या देशांतही नीलकंठ पक्षी आढळतो.

हा पक्षी माळरानात तसेच विरळ जंगलात राहतो. त्याला दाट जंगलाबाहेर राहायला आवडते. रंग आणि आकारावरून त्याच्या तीन उपजाती आहेत.

भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ आणि रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो.

हा पक्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा आणि ओडिशा या राज्यांचा राज्यपक्षी आहे. याचा आकार मोठ्या कबुतरा इतका असतो.

पंखाची आतली बाजू व टोके गडद निळ्या रंगाची असतात. उडताना गडद निळ्या रंगाचे पट्टे उठून दिसतात. डोक्याच्या वरची बाजू मंद निळ्या रंगाची असते, गळ्याभोवती व मानेभोवती निळ्या, तपकिरी पांढरट रंगाचे बारीक बारीक फराटे असतात.

नर आणि मादी नीलपंख दिसायला सारखेच असतात. त्याचे डोके आणि चोच काळ्या रंगाची असते. छाती तांबूस तपकिरी रंगाची असून पोट आणि शेपटीखालचा भाग फिकट निळ्या रंगाचा असतो.

पंखाची आतली बाजू गडद निळ्या रंगाची असून उडताना गडद निळ्या रंगाचे पट्टे चांगलेच उठून दिसतात. डोक्याच्या वरची बाजू मंद निळ्या रंगाची असते, गळ्याभोवती व मानेभोवती निळ्या, तपकिरी पांढरट रंगाचे बारीक बारीक फराटे असतात.

भारतीय नीलपंख माहिती मराठी (blue jay bird in marathi)

भारतीय नीलपंख हा पक्षी तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांच्या राज्यपक्षी आहे. तेलंगणा राज्यात याला पालपिट्टा असे म्हणतात. तेलंगणा राज्यातील टपाल खात्यातर्फे 14 डिसेंबर 2018 रोजी निलकंठची प्रतिमा व त्याची मुद्रा असलेला शिक्का तिकिटावर मारलेला आहे.

दरवर्षी मार्च ते जुलै या दरम्यान भारतीय नीलपंखचा वीण हंगामाचा काळ असतो. या वेळी तो गवत, काड्या वापरून झाडाच्या ढोलीत आपले घरटे बांधतो. या घरट्यात मादी एकावेळी 4 ते 5 अंडी देते.

या अंड्याचा रंग हलका निळा किंवा तपकिरी असतो. या काळात मादी 17 ते 18 दिवस अंडी उबवण्याचे काम करते, तर नर अन्न पुरविण्याचे काम करतो. पिल्ले जन्माला आल्यानंतर दोंघे मिळून त्याचा सांभाळ करतात.

भारतीय नीलपंख पक्षी नाकतोडे, भुंगे आणि मोठे किडे खातो. तसेच सरडे, पाली, बेडूक, विंचू आणि लहान उंदीर खातो.

चास पक्षी माहिती मराठी (chas bird information in marathi)

शेतातील कीटक खाऊन तो शेतकऱ्यास एक मदतच करत असतो. त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. दरवर्षी दसऱ्याला यांचे दर्शन घेऊन त्याची पूजा केली जाते.

हिंदू शास्त्रात नीलकंठ पक्ष्याला अत्यंत शुभ मानले जाते. हा पक्षी भगवान शिवांचा एक प्रकार आहे असे मानले जातो.

शकुन शास्त्रानुसार, जर निळकंठाने खाल्लेले फळ तुम्हाला दिसले तर, तुम्ही स्वतःसाठी जी इच्छा मागितली असेल ती पूर्ण होते असे म्हटले जाते.

चास हा पक्षी जास्त उंचीवर राहणे पसंत करत नाही, ती नेहमी रानावनात, झाडांवर आपले घर बनवून राहत असतो. चास हा पक्षी हुशार आणि रंगीबेरंगी असतो. नर आणि मादी दोघेही सारखेच दिसतात.

Related – साळुंकी पक्षी माहिती मराठी

सारांश

या लेखातून आपण नीलकंठ पक्षी माहिती मराठी (indian roller bird information in marathi) सविस्तरपणे जाणून घेतली. ही माहिती आवडली असल्यास, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

FAQs

नीलकंठ पक्षी शुभ का मानले जाते ?

पुराणातील कथेनुसार, रावण मारल्यानंतर रामावर एक ब्राह्मण हत्येचे पाप लागले. हे मिटवण्यासाठी भगवान शिव ने नीलकंठ पक्षाचे रूप धारण केले. तेव्हापासून नीलकंठ पक्षी हिंदू संस्कृतीत अतिशय शुभ मानले जाते.

नीलकंठ पक्षाची पूजा कधी करतात ?

दसर्‍याच्या सणाला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ आणि भाग्य उदय करणारे मानले जाते. यामुळे दसऱ्याला याची पूजा करतात.