Indian States And Capitals List In Marathi – भारत देश जगातील प्राचीन संस्कृती आणि दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आहे. भारतात फार पूर्वीपासूनच अनेक साम्राज्याची सत्ता होती. पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताचा कारभार लोकशाही पद्धतीने चालू झाला.
तेव्हापासून भारतात संसदीय लोकशाही पद्धतीने कामकाज सुरू झाले. यावेळी भारतातील राज्यांची निर्मिती त्यांच्या भाषानुसार झाली. उदा. मराठी भाषेचे राज्य महाराष्ट्र
प्रत्येक राज्याचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन केले जाते. पण जे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नाहीत, अश्या प्रदेशाचा कारभार केंद्र सरकार पाहतो. सध्या भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
या लेखातून आपण भारतातील 28 राज्यांची नावे आणि त्यांच्या राजधानी (Indian States And Capitals List In Marathi) कोणत्या आहेत, याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी (Indian States And Capitals List In Marathi)
- भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी (Indian States And Capitals List In Marathi)
- भारतातील केंद्रशासित प्रदेशांची नावे (8 Union Territories Of India And Their Capitals In Marathi)
- सारांश
भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी (Indian States And Capitals List In Marathi)

भारताच्या इतिहासात डोकावले असता, भारत देशावर विविध सत्तांनी राज्य केले, त्यावेळी या अनेकांनी स्वतःच्या सोयीनुसार विविध प्रांत तयार केले होते. यातील महत्त्वाचा प्रांत म्हणजे दिल्ली प्रांत होय.
सध्या भारताची राजधानी आणि संसद भवन दिल्ली येथेच आहे. पण एकट्या दिल्लीवरून संपूर्ण देशात नियंत्रण ठेवणे जवळजवळ अशक्यच होते. तसेच पूर्वी तयार केलेल्या प्रांतावरून आणि भाषेच्या हद्दीवरून नवीन राज्याची स्थापना करण्यात करण्यात आली.
यातूनच पुढील राज्ये आणि त्यांच्या राजधानीची निर्मिती झाली. जे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नाहीत, किंवा कोणत्याही राज्यामध्ये समाविष्ट झाले नाहीत, अशा प्रदेशाचा संपूर्ण कारभार केंद्र सरकारद्वारे पाहिला जातो.
संबंधित लेख – भारताची वनसंपत्ती मराठी माहिती
भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी (Indian States And Capitals List In Marathi)

राज्य | स्थापना | राजधानी |
---|---|---|
आंध्र प्रदेश | 1 ऑक्टोबर 1953 | अमरावती |
आसाम | 1 नोव्हेंबर 1956 | गुवाहाटी |
बिहार | 1 नोव्हेंबर 1956 | पटना |
कर्नाटक | 1 नोव्हेंबर 1956 | बेंगलोर |
केरळ | 1 नोव्हेंबर 1956 | तिरुअनंतपुरम |
मध्य प्रदेश | 1 नोव्हेंबर 1956 | भोपाळ |
ओडिसा | 1 नोव्हेंबर 1956 | भुवनेश्वर |
राजस्थान | 1 नोव्हेंबर 1956 | जयपुर |
तमिळनाडू | 1 नोव्हेंबर 1956 | चेन्नई |
उत्तर प्रदेश | 1 नोव्हेंबर 1956 | लखनऊ |
पश्चिम बंगाल | 1 नोव्हेंबर 1956 | कोलकाता |
महाराष्ट्र | 1 मे 1960 | मुंबई |
गुजरात | 1 मे 1960 | गांधीनगर |
नागालँड | 1 डिसेंबर 1963 | कोहिमा |
पंजाब | 1 नोव्हेंबर 1966 | चंदीगड |
हरियाणा | 1 नोव्हेंबर 1966 | चंदीगड |
हिमाचल प्रदेश | 25 जानेवारी 1971 | शिमला |
मेघालय | 21 जानेवारी 1972 | शिलॉंग |
मणिपूर | 21 जानेवारी 1972 | इंफाळ |
त्रिपुरा | 21 जानेवारी 1972 | अगरतला |
सिक्कीम | 26 एप्रिल 1975 | गंगटोक |
अरुणाचल प्रदेश | 20 फेब्रुवारी 1987 | इटानगर |
मिझोरम | 20 फेब्रुवारी 1987 | ऐझॉल |
गोवा | 30 मे 1987 | पणजी |
छत्तीसगड | 1 नोव्हेंबर 2000 | रायपूर |
उत्तरांचल | 9 नोव्हेंबर 2000 | देहरादून |
झारखंड | 15 नोव्हेंबर 2000 | रांची |
तेलंगणा | 2 जून 2014 | हैदराबाद |
संबंधित लेख – भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार माहिती
भारतातील केंद्रशासित प्रदेशांची नावे (8 Union Territories Of India And Their Capitals In Marathi)
जे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नाहीत, अश्या प्रदेशावर संपूर्ण नियंत्रण आणि व्यवस्थापन केंद्र सरकारकडून केले जाते. अश्या प्रदेशांना केंद्रशासित प्रदेश असे म्हणतात.
सातव्या घटनादुरुस्ती कायदा 1956 नुसार भारतात 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते, पण काळाच्या ओघात तसेच गरजेनुसार या केंद्रशासित प्रदेशांची राज्यांमध्ये रूपांतर करण्यात आले.
सध्या भारतामध्ये 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत.
केंद्रशासित प्रदेश | स्थापना | राजधानी |
---|---|---|
अंदमान आणि निकोबार | 1 नोव्हेंबर 1956 | पोर्ट ब्लेर |
चंदीगड | इ. स. 1953 | चंदिगढ |
दादरा-नगर हवेली | 11 ऑगस्ट 1961 | सिल्वासा |
दमण आणि दीव | 30 मे 1987 | दमण |
दिल्ली | 1 नोव्हेंबर 1958 | दिल्ली |
पुडुचेरी | 1 नोव्हेंबर 1954 | पुडुचेरी |
लक्षद्वीप | 1 नोव्हेंबर 1956 | कवरत्ती |
लडाख | 31 ऑक्टोबर 2019 | लेह |
भारतीय संसदेने 31 ऑक्टोबर 2019 रोजी मंजूर केलेल्या ठरावानुसार जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनविला. तसेच लडाख जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून त्याला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनविले.
दादरा व नगर हवेली आणि दिव दमण यांचे एकत्रीकरण करण्यात आले. यामुळे भारतातील राज्यांची संख्या 29 वरून 28 इतकी झाली. सध्याला देशात 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
संबंधित लेख – भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती मराठी
सारांश
तर मित्रांनो, आशा करतो, की तुम्हाला भारतातील राज्यांची नावे, त्याची स्थापना आणि राजधानी (Indian States And Capitals List In Marathi) याविषयीची समजली असेल. तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.