india’s major crops information in marathi – भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती व्यवसायचा मोलाचा वाटा आहे. संपूर्ण जगामध्ये तांदूळ, गहू आणि ऊस या पीक पुरविण्यात भारत देश अग्रेसर आहे. तसेच शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे ज्यावर आयकर आकारला जात नाही.
या लेखात आपण भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती मराठी – india’s major crops information in marathi जाणून घेणार आहोत. यात आपण भारतातील प्रमुख पिके आणि त्यांची प्रमुख सुधारित जाती या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. याशिवाय आपण भारतातील प्रमुख चारापिके आणि त्यांच्या जाती, इतर प्रमुख फळपिके आणि त्यांच्या जाती याविषयी माहिती अभ्यासणार आहोत.
हा लेख जरूर वाचा – महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे (maharashtra division in marathi)
भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती मराठी – india’s major crops information in marathi

भात हे भारत देशातील प्रमुख अन्न मानले जाते. पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. यामध्ये फुले समृध्दी (VDN-99-29), रत्नागिरी 24, रत्नागिरी 73, फुले राधा, फुले मावळ, जया, पालघर, दारणा, कर्जत, अंबिका, तेरणा, पराग, बासमती, इंद्रायणी, सह्याद्री, अविष्कार आणि प्रभावती या प्रमुख सुधारित जाती आहेत.
ज्वारी ह एक धान्यप्रकार आहे. हे एक तृणधान्य आहे. यास जोंधळा असेही म्हणतात. भारत देशातील धान्यामध्ये याचा प्रमुख समावेश होतो. यामध्ये वसुधा (IRSV 423), फुले माऊली, फुले चित्रा, मालदांडी 35-1, फुले यशोदा, PKV क्रांती, सेलेक्शन 3, परभणी मोती, CSH 15, CSV 18 या प्रमुख जाती आहेत.
भारतात हुरड्यासाठी फुले उत्तरा, गुरांच्या चाऱ्यासाठी रुचिरा, फुले अमृता, मालदांडी, पुसा चारी या वाणाचा वापर केला जातो. मालदांडी, मंठी, दगडी या रब्बी ज्वारीच्या जाती आहेत.
गहू हे भारतातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. जगातील गहू पिकाचे एकूण क्षेत्र आणि उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. यामध्ये त्र्यंबक (NIW301), निफाड 34, कल्याणसोना, सोणालिका, विनिता (N8223), तपोवन (NIW917), पंचवटी, गोदावरी, N-59 या प्रमुख सुधारित जाती आहेत.
बाजरी हे एक प्रकारचे धान्य आहे. बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी लागते. बाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिका येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरून पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते. श्रद्धा, सबुरी, शांती, आयसीटीपी 8203, ICMV 155 या प्रमुख सुधारित जाती आहेत. गुरांच्या चाऱ्यासाठी जायंट बाजरा आणि राजको बाजरा या वाणांचा वापर केला जातो.
ऊस ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ऊस मुख्यत्वे, गुळासाठी, साखरेसाठी पिकवण्यात येतो. भारत आणि ब्राझील या देशांत हा प्रामुख्याने पेरला जातो. भारतात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. संजीवनी (को-7219), संपदा (कोएम 7125), कृष्णा (कोएम 88121), निरा (को-86032), महालक्ष्मी (को-8014, फुले सावित्री (को-94012), को-740, को-429, फुले 265 या प्रमुख सुधारित जाती आहेत.
कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक नगदी पीक आहे. देवराज, बुरी, कंबोडिया, लक्ष्मी, वरलक्ष्मी, अजित, वरुण, दुर्गा, फुले 492, DCH 32, CAHS 468, BT कॉटन या प्रमुख सुधारित जाती आहेत.
हा लेख जरूर वाचा – महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे (Tourist places in Maharashtra)
भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती मराठी – india’s major crops information in marathi
सुर्यफुलाचे देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यामध्ये मॉर्डन, भानू, सूर्या, SS 56, EC 68414 या प्रमुख सुधारित जातीचा समावेश होतो.
करडई हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. याच्या पानांची खाण्यासाठी भाजी करतात. तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले जाते. भीमा, तारा, गिरणा, शारदा, फुले, कुसुमा, नारी या सर्व प्रमुख सुधारित जाती आहेत.
भुईमूग हे एक शेंगावर्गीय पीक आहे. यात फुले प्रगती (JL 24), फुले उनप (JL 283), कराड-4-11, कोकण गौरव, ट्रॉम्बे कोकण, टीएजी 24, टीजी 26 या प्रमुख सुधारित जातींचा समावेश होतो.
तुर हे भारतीय लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचे धान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा पदार्थ आहे. यापासून वरण बनविण्यात येते. विपुला, टी.विशाखा, कोकण तूर, ICPL 78, BDN 708 या प्रमुख सुधारित जातीचा समावेश होतो.
मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. प्रभात, आफ्रिकन टॉल, पंचगंगा, हायस्टार्च, किरण, त्रिशूलता, डेक्कन डबल हायब्रीड, गंगा 11, बायो 9637, शक्ती 1, नवज्योत, मांजरी, करवीर या मका या पिकाच्या प्रमुख सुधारित जाती आहेत.
हरबरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते. दिग्विजय, विजय, विशाल, चाफा, अन्नेगिरी, काक 2, विराट आणि विहार या हरभऱ्याच्या प्रमुख सुधारित जाती आहेत.
भेंडी ही एक फळभाजी आहे. परभणी क्रांती, फुले उत्कर्षा, अर्का अनामिका, अर्का अभय या भेंडीच्या प्रमुख सुधारित जाती आहेत.
हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. कृष्णा, टेकुरपेटा, अलेप्पी, कडप्पा, कराडी, प्रभा, सुदर्शना, राजापुरी या हळदीच्या प्रमुख सुधारित जाती आहे.
आले हे महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. हे मूळ हे सुगंधी असल्याने मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जाते. आले हे खोकला घालविण्यासाठी खाल्ले जाते तसेच अनेक औषधांमध्ये वापरले जाते. रिओ-डी -जानेरो, माहीम, जमैका, जपानी, कालिकत या प्रमुख सुधारित जाती आहेत.
याबरोबरच भारतामध्ये काकडी, टोमॅटो, सोयाबीन, मूग, कांदा, मोहरी, तीळ, चवळी, उडीद आणि लसूण या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
हा लेख जरूर वाचा – महाराष्ट्रातील जंगली प्राणी माहिती मराठी (maharashtra wildlife animal information in marathi)
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती मराठी – india’s major crops information in marathi याविषयीं माहिती जाणून घेतली. यात आपण भारतातील प्रमुख पिके आणि त्यांची प्रमुख सुधारित जाती या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. याशिवाय आपण भारतातील प्रमुख चारापिके आणि त्यांच्या जाती, इतर प्रमुख फळपिके आणि त्यांच्या जाती याविषयी माहिती अभ्यासणार आहोत.
भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती मराठी – india’s major crops information in marathi तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
टोमॅटोच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
धनश्री, भाग्यश्री, फुले राजा, अर्कराज
कांद्याच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
फुले समर्थ, बसवंत 780
सोयाबीनच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
फुले कल्याणी (डी एस 228), पीके-1019
मुगाच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
वैभव, कोपरगाव-1, BPMR-145
काकडीच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
हिमांगी, फुले शुभांगी, पूना खिरा
मोहरीच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
सीता, वरुण
तीळ या पिकाच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
तापी
चवळीच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
फुले पांढरी (PCP-9708), श्वेता
उडीदच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
टीपीयु-4 आणि टीएयू-1
लसूणच्या प्रमुख सुधारित जाती कोणत्या आहेत ?
फुले बसवंत