India’s major religion information in marathi – भारत देश विविध जाती धर्म आणि पंथानी नटलेला देश म्हणून ओळखला जातो. या देशात विविध समुदायाचे लोक आनंदाने राहतात. भारतीय सण आणि परंपरा याची चर्चा जगभर होताना दिसून येते. त्याचप्रमाणे भारतात विविध धर्मीय लोक सुद्धा आहेत. तर याची माहिती आज आपण घेणार आहोत.
मागील लेखात आपण महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी पाहिली होती. या लेखात आपण भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती (india’s major religion information in marathi) जाणून घेणार आहोत.
धर्म म्हणजे काय (religion meaning in marathi)
त्याआधी धर्म म्हणजे काय ? याबाबत थोडक्यात आढावा घेऊ. – मराठीत धर्म हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे. संस्कृत भाषेत याला अनेक अर्थ आहेत. जसे की,
- एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा स्वभाव तिचा धर्म मानला जातो. उदाहरणार्थ जाळणे हा अग्निचा धर्म आहे.
- एखाद्या माणसाने काय करावे, त्याचे कर्तव्य काय आहे हा त्याचा धर्म आहे. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणे हा त्याचा धर्म आहे.
- वेदात सांगितलेला आचार उदाहरणार्थ स्वर्ग प्राप्तीसाठी असं करावं.
- ज्यामुळे समाजाची धारणा होते सामाजिक स्थैर्य टिकून राहते अशी नियमावली.
- असं जीवन मार्ग ज्यामध्ये शेवटी मोक्ष प्राप्त होतो.
धर्म व्याख्या मराठी (religion definition in marathi)
धर्माची व्याख्या अनेक धर्मचिंतकांनी केली आहे. त्यापैकी जेम्स मार्टिन्यू यांच्या व्याख्येनुसार,
धर्म म्हणजे एखाद्या चिरंतन ईश्वरावर विश्वास. हा ईश्वर म्हणजेच दिव्य आत्मा व संकल्प आहे की जो विश्वाचे नियंत्रण करतो व मानवाशी संबंध प्रस्थापित करतो.
पण ही व्याख्या फक्त ईश्वरवादी धर्मालाच लागू पडते कारण सर्वधर्म ईश्वरवादी नाहीत. उदाहरणार्थ बौद्ध व जैन धर्मात ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेले नाही.
त्यामुळे धर्म ही एक सामाजिक संस्था मानली जाते. यामध्ये कोणताही धर्म एखाद्या व्यक्तीलाच लागू होत नाही तर एखाद्या मोठा माणूस समूहाला एकत्रितपणे लागू होतो. यामुळे धर्म ही व्यक्तिगत नसून सामाजिक संस्था आहे. प्रत्येक धर्मात धर्मगुरु पाहायला मिळतात.
भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती (india’s major religion information in marathi)

धर्म | धर्म प्रमुख | पवित्र धर्मग्रंथ |
---|---|---|
हिंदू | कोणीही नाही | भगवद्गीता |
इस्लाम | हजरत मुहम्मद | कुराण |
ख्रिस्ती | येशू ख्रिस्त | बायबल |
शीख | गुरुनानक | श्रीगुरूग्रंथसाहिब |
जैन | 24 तीर्थकर | समयसार |
बौद्ध | गौतम बुद्ध | त्रिपिटक |
पारशी | इरदृष्ट | अवेस्ता |
भारतामध्ये एकूण सात प्रमुख धर्मा आहेत. यामध्ये हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी यांचा समावेश होतो. यापैकी हिंदू धर्म हा धर्म संप्रदाय नसून अनेक धर्म संप्रदायाचा तो एक महासंघ आहे.
प्रत्येक धर्मामध्ये मोक्ष ही संकल्पना पाहायला मिळते. प्रत्येक धर्मात एक धर्म ग्रंथ आहे, जो त्या संप्रदायातील लोकांना जीवन कसे जगावे ? आणि दुःखातून मुक्ती कशी मिळावी याबाबत मार्गदर्शन करते. त्याचबरोबर मानवी जीवनात नैतिक मूल्य बाबत मार्गर्शन करण्यात येते.
या जगामध्ये खूप लोक राहतात आणि या बरोबरच अनेक जाती धर्म सुद्धा मानले जातात. या जगामध्ये जितके लोक राहतात तितकेच ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत. प्रत्येक धर्म एक दुसऱ्या पेक्षा खूप वेगळा आहे. या बरोबर त्यांच्या परंपरा सुद्धा वेगवेगळ्या आहेत.
धर्माची नावे | अनुयायी (भारत) | अनुयायी (जगभर) |
---|---|---|
हिंदू | 966.3 दशलक्ष | 1.35 अब्ज |
इस्लाम | 204 दशलक्ष | 1.9 अब्ज |
ख्रिस्ती | 27.8 दशलक्ष | 2.382 अब्ज |
शीख | 20.8 दशलक्ष | 25-30 दशलक्ष |
जैन | 4 लाख | 6 लाख |
बौद्ध | 8.4 दशलक्ष | 535 दशलक्ष |
पारशी | 57 हजार | 1-2 लाख |
हिंदू धर्म मराठी माहिती (hindu dharma in marathi)
Hindu dharma in marathi – हिंदू धर्म हा दम धर्म संप्रदाय नसून तो अनेक धर्म संप्रदायाचा एक महासंघ आहे. या संप्रदाय मध्ये असणारे विविध रूपांमध्ये जीवनाच्या अंतिम ध्येय याविषयी वर्णन केलेले आहे.
हिंदू धर्मात काम, अर्थ, धर्म, मोक्ष या चार पुरुषार्थाच्या भाषेत मानवी जीवनातील देण्याचा विचार केला आहे. यापैकी मोक्ष हे सर्वश्रेष्ठ ध्येय मानले गेले आहे.
सत्य, अहिंसा आणि अस्तेय इंद्रियनिग्रह या मूल्यांचा समावेश हिंदू धर्मात केला आहे. या मूल्यांचे पालन करून समाज सुधारणा होऊ शकते, असे मानले गेले आहे. या मूल्यांच्या आधारे इंद्रियांची आणि मनाचे नियंत्रण केले जाते.
जगातील सर्वात मोठ्या आणि महान धर्मामध्ये हिंदू धर्म तिसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्ण जगामध्ये हिंदू धर्माचे अनुयायी फक्त आशिया खंडातील भारत या देशात पाहायला मिळतात. हिंदू धर्माच्या अनुयायांची संख्या एक अरब म्हणजेच 100 कोटी पेक्षा जास्त आहे.
गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, परशुराम जयंती, आषाढी एकादशी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी (गोकुळ अष्टमी), पोळा हे हिंदु धर्मातील पवित्र सण आहेत.
त्याबरोबरच गणेश चतुर्थी, रक्षाबंधन, घटस्थापना, दसरा (विजयादशमी), कोजागरी पौर्णिमा, दीपावली, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, कार्तिकी एकादशी , सट, दत्त जयंती, मकरसंक्रांत, दुर्गाष्टमी, महाशिवरात्र, होळी, रंगपंचमी हे देखील सण साजरे केले जातात. यामधील दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो.
हिंदू धर्माचे संस्थापक कोण आहेत ?
हिंदू धर्माचे संस्थापक कुणीही नाही.
हिंदू धर्माचा ग्रंथ कोणता ?
हिंदू धर्माचा ग्रंथ भगवतगीता आहे.
हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि अंतिम ध्येय कोणता पुरुषार्थ आहे ?
हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि अंतिम मोक्ष पुरुषार्थ आहे.
हिंदू धर्मात पुराणांची संख्या किती आहे ?
हिंदू धर्मात पुराणांची संख्या 18 आहे.
कोणत्या धर्माला सनातन धर्म मानण्यात आले आहे ?
हिंदु धर्माला सनातन धर्म मानण्यात आले आहे.
इस्लाम धर्म मराठी माहिती (islam dharm in marathi)
Islam dharm in marathi – इस्लाम हा जगातील एक महत्त्वाच्या धर्मापैकी एक आहे. इस्लाम धर्माच्या मूळ सर्व जगामध्ये पाहायला मिळतात. इस्लाम धर्मामध्ये पैगंबर रसूल यांनी माणसाने कसे वागावे कसे वागू नये हे सांगण्यासाठी परमेश्वर वेळोवेळी आपले संदेशवाहक पाठवतो. ते ईश्वराचे आदेश मानवाला देतात, अशी इस्लाम धर्मात मूलभूत श्रद्धा आहे.
याव्यतिरिक्त अजून काही मूलभूत इस्लाम धर्मात मानले जातात.
अल्लाह – ईश्वर एकच असून तो सृष्टीचा निर्माता आहे. तो सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान, न्यायी आणि दयाळू आहे. परमेश्वराच्या मर्जीत राहून त्याला संपूर्ण शरण जीवन मानवाचे जीवन सार्थ होईल अशी मान्यता आहे.
कुराण – हा इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. या धर्मग्रंथात ईश्वराकडे जाण्याचा, दुःखापासून आणि पापापासून मुक्त होण्याचा, आदर्श जीवन जगण्याचा मार्ग सांगितला आहे.
देवदूत – हे परमेश्वराचे सहाय्यक आहेत आणि ते आपल्या बऱ्या-वाईट कामांची नोंद ठेवतात, अशी मान्यता आहे.
आखिरत – अंतिम निवाड्यात दिवस यालाच कयामत का दिन म्हटले जाते. असे म्हटले जाते या वेळी सर्वांना आपल्या केलेल्या कर्माचा हिशोब परमेश्वराला द्यावा लागतो. आणि झोप पुण्यवान असेल त्यालाच स्वर्गात जागा नव्हती आणि झोपा केला असेल त्याला नरकामध्ये जावे लागेल.
इस्लाम धर्मामध्ये रोज पाच वेळा नमाज व कलमा पठण करावे लागते. याव्यतिरिक्त रमजानच्या महिन्यात उपवास करणे, वार्षिक उत्पन्नाचा ठराविक भाग दानधर्म करणे, आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे अशी काही मूल्ये आहेत.
जगातील सर्वात मोठ्या धर्मा पैकी इस्लाम धर्म दुसऱ्या क्रमांकावर आहे. इस्लाम धर्माचे अनुयायी मुसलमान या नावाने सुद्धा ओळखले जातात. ख्रिश्चन धर्मानंतर संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त इस्लाम धर्माचे पालन केले जाते. यामध्ये 1.6 अरब मुसलमान इस्लाम धर्म मानतात.
मुस्लिम सण आणि उत्सव – मोहरम, मिलाद-उन-नवी, शाब-ए-मेराज, शाब-ए-बरात, ईद-उल-फ़ित्र (रमजान ईद), ईद-उल-अधा (बकरी ईद) ही मुस्लिम धर्मातील पवित्र सण आहेत.
ख्रिस्ती धर्म मराठी माहिती (christian religion in marathi)
Christian religion in marathi – येशू ख्रिस्त हा ईश्वराचा पुत्र असून तो मानवाच्या पृथ्वीवर आला, अशी मान्यता आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे उपदेश बायबल या धर्मग्रंथात नवा करार मध्ये पाहायला मिळतात.
ख्रिस्ती धर्मानुसार ईश्वराचे तीन रूपे आहेत – परमपिता परमेश्वर, परमेश्वर पत्र येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा. यामध्ये परमेश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वमंगल आहे. करुणा, प्रेम, क्षमा यांनी तो परिपूर्ण असुन सर्व विश्व त्याची निर्मिती आहे आणि त्याच नियमांनी चालते.
केलेल्या कर्मानुसार पाप-पुण्याचा निवाडा होऊन पापी मनुष्याला नरक आणि पुण्यवान मनुष्याला स्वर्ग लाभ होतो, अशी मान्यता आहे. पापांची कबुली, क्षमायाचना, ईश्वरावर अनन्य श्रद्धा याद्वारे मानव पापापासून मुक्त होऊ शकतो.
ख्रिस्ती निती विचारात प्रेम भावनेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. ख्रिस्ती धर्मा कोणत्याही प्रकारे भेदभाव करत नाही. हा धर्म सर्वांवर प्रेम करा शिकून देतो. परमेश्वराच्या धाकात आणि आज्ञेत राहणे अशी शिकवण यामधे आहे.
लोकसंख्येनुसार ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. संपूर्ण जगामध्ये 31 टक्के लोक ख्रिश्चन धर्माचे अनुसरण करतात यामध्ये साधारण 2.2 अरब पेक्षा जास्त लोक आहेत.
ख्रिश्चन सण आणि उत्सव – येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन नाताळ ख्रिस्तमस हा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर लेंट, गुड फ्रायडे, ईस्टर पाम संडे, पेंटेकोस्ट, मेरी, जोसेफ, पीटर, झेवियर इ. संतांचे सण देखील साजरे केले जातात.
हे देखील वाचा – येशू ख्रिस्त प्रार्थना
ख्रिस्त पुराण हा ग्रंथ कोणी लिहिला ?
ख्रिस्त पुराण हा ग्रंथ फादर स्टीफन्स लिहिला.
येशूचा जन्म कुठे झाला ?
येशूचा जन्म बेथलेहेम या गावी गाईच्या गोठ्यात झाला.
येशूचा पुनरुत्पादन दिन कोणत्या नावाने ओळखला जातो ?
येशूचा पुनरुत्पादन दिन Easter Sunday नावाने ओळखला जातो.
ख्रिस्त पुराण रचनेचे अग्रदूत कोण आहेत ?
ख्रिस्त पुराण रचनेचे अग्रदूत फादर स्टीफन्स हे आहेत.
शीख धर्म मराठी माहिती (sikh dharma in marathi)
Sikh dharma in marathi – गुरुनानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. हिंदू आणि मुस्लीम जीवनदृष्टीचा समन्वय साधून एकच ईश्वर असणार धर्म त्यांनी स्थापन केला. या धर्माला शीख संप्रदाय असे म्हटले जाते. शीख संप्रदायाचा पवित्र ग्रंथ आदिग्रंथ आहे, या ग्रंथाला श्रीगुरूग्रंथसाहिब असे म्हटले जाते.
गुरुनानक यांच्या मते ईश्वर एकच आहे. जपुजी हा गुरुग्रंथसाहिबचा महत्त्वाचा भाग आहे. शीख धर्मात मोक्ष हेच जीवनाचे अंतिम ध्येय मानले गेले आहे. गुरुनानकांनी श्रमदान, सहकार्य, सेवा या मूल्यांना विशेष महत्त्व दिले आहे.
शीख धर्मांत प्रामुख्याने गुरू नानक जयंती, वैशाखी, होला मोहल्ला, गुरू गोविंदसिंह जयंती, वसंत पंचमी साजरी केली जाते.
शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत ?
शीख धर्माची स्थापना गुरूनानक आहेत.
शीख धर्माचे नववे गुरु कोण आहेत ?
शीख धर्माचे नववे गुरु गुरू तेगबहादूर आहेत.
जैन धर्म मराठी माहिती (jain religion in marathi)
Jain religion in marathi – जैन हा धर्म कोण्या एका व्यक्तीने स्थापन केलेला नसून तो अनेक तीर्थकरांनी वेळोवेळी प्रकट केलेला धर्म मानला जातो. जैन धर्माच्या मते, मानवी जीवनातील अंतिम ध्येय मोक्ष आहे. क्रोध आणि लोभ या विकारांनी ग्रस्त होऊन मानव कर्मबंधनात पडतो. यातून सुटका मिळवणे म्हणजे मोक्ष प्राप्त करणे होय.
मानवी आत्मा स्वतः तप करून सर्वज्ञ होऊ शकतो, अशी यांची मान्यता आहे. जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्मांपैकी एक आहे. हा प्राचीन भारतीय धर्म आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे.
अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे.
या धर्मांत प्रामुख्याने वर्षप्रतिपदा, ज्ञानपंचमी, चातुर्मासी चतुर्दशी, कार्तिक पौर्णिमा, मौनी एकादशी, पार्श्वनाथ जयंती, मेरु त्रयोदशी, महावीर जयंती, दिवाळी असे सण साजरे केले जातात.
जैन धर्मातील प्रमुख दोन संप्रदाय कोणते ?
जैन धर्मातील प्रमुख दोन संप्रदाय दिगंबर आणि श्र्वेतांबर हे आहेत.
जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते ?
जैन धर्माचे पहिले तीर्थकर वृषभदेव भगवान होते. यांनाच आदिनाथ या नावाने ओळखले जाते.
जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर कोण ?
जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर वर्धमान महावीर हे आहेत.
बौद्ध धर्म मराठी माहिती (baudh dharm in marathi)
Baudh dharm in marathi – बौध्द धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांना मानले जाते. या धर्मात मानवाला दुःख मुक्त करण्याची प्रभावी प्रेरणा आहे. गौतम बुद्ध यांनी चार आर्यसत्य मांडली आहे. यामध्ये दुःख मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे.
दुःख – प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी प्रिय गोष्ट असते. प्रत्येकाला आजार, अडचणी, विरह आणि मरण या गोष्टीतून जावे लागते. या कारणाने मानवी जीवनात दुःख येते.
दुःख समुदय – दुःख कोणत्यातरी कारणाने होत असते, याचे मुळ शोधले असता असे समजते. माणसाला हाव असते म्हणून दुःख होते. माणसाला अविद्या असल्याने दुःख होते.
दुःख निरोध – दुःख चे मूळ कारण नष्ट झाले तर दुःख नाहीसे होईल. यालाच दुःखाचे निर्वाण असे म्हणतात. बुद्धांच्या मते मानवी जीवनातील हाव आणि अविद्या नष्ट झाली, तर मानवाचे दुःख नाहीसे होईल.
दुःख निरोध गामिनी प्रतिपत – दुःख नाहीसे करण्यासाठी आपल्यासमोर मार्ग उपलब्ध आहेत. बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितले आहेत. सत्य, अहिंसा, अस्तेय, मादक द्रव्यांचे सेवन न करणे आणि काम जीवनावर नियंत्रण या पांचशिलांचा समावेश होतो.
बौध्द धर्म जगातील चार नंबरचा मोठा धर्म असून याची सुरूवात भारत देशामध्ये झाली त्यानंतर याचा प्रचार झाला आणि जपान, नेपाळ, चीन अश्या देशात बुद्धांचे अनुयायी तयार झाले. पूर्ण जगामध्ये पाच टक्के लोकसंख्या बौद्ध धर्माचे अनुसरण करतात.
बौध्द धर्माचे सण – गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा भारतासह जगभरात साजरी केली जाते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोसर, सम्राट अशोक जयंती, अशोक विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, शौर्य दिन कोरेगाव भिमाची लढाई, रमाई जयंती साजरी केली जाते.
याव्यतिरिक्त मनुस्मृती दहन दिन, संविधान दिन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन, माई जयंती, संत रोहिदास जयंती महात्मा फुले जयंती साजरी करतात.
बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली ?
गौतम बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली.
बौद्ध धर्माची त्रिरत्न कोणती ?
बुद्ध, धम्म आणि संघ ही बुद्ध धर्माची त्रिरत्न आहेत.
बौद्ध धर्माचा उदय भारतामध्ये कोणत्या शतकात झाला ?
भारतात इ. स. पू. सहाव्या शतकापासून ते इ. स. आठव्या शतकात बौद्ध धर्माचा उदय झाला.
सम्राट अशोकाने कोणाकडून बौध्द धर्माची दीक्षा घेतली ?
सम्राट अशोकाने निगोथ या बौद्ध भिक्षुकडून बौध्द धर्माची दीक्षा घेतली.
बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली ?
बौद्ध धर्माची पहिली परिषद पाटलीपुत्र या ठिकाणी झाली.
बौद्ध धर्मातील पंथ कोणते आहेत ?
महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत.
पारशी धर्म मराठी माहिती (parsi dharm information in marathi)
Parsi dharm information in marathi – पारशी धर्माचे संस्थापक इरदृष्ट आहेत. अवेस्ता हा पारशी धर्मीय लोकांचा धर्मग्रंथ आहे. या धर्मात विश्व निर्माता परमेश्वराचे अस्तित्व स्वीकारले आहे. अहुर या नावाने त्यांच्या देवांचा उल्लेख केला जातो. पतेती हा पारशी धर्मीय लोकांचा पवित्र सण आहे.
पतेती म्हणजे काय ?
पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस आहे. या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात.
सारांश
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती (india’s major religion information in marathi) जाणून घेतली.
भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती (india’s major religion information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही भारतातील धर्माची माहिती मराठीत आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
भारतात किती धर्म आहेत ?
भारतात एकूण सात प्रमुख धर्म आहेत. यामध्ये हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी या धर्माचा समावेश होतो.
जगातील सर्वात मोठा धर्म कोणता ?
जगातील सर्वात मोठा धर्म ख्रिस्ती असून या धर्माचे जगभरात 2.382 अब्ज आणि भारतात 27.8 दशलक्ष इतके अनुयायी आहेत.
भारतीय धर्म जीवनात सुरूवातीला कशाला महत्व होते ?
भारतीय धर्म जीवनात सुरूवातीला संस्कृतीला महत्व होते.
1 thought on “भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती”