International Father’s Day In Marathi – जागतिक वडील दिवस दरवर्षी 19 जून रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. याची सुरुवात अमेरिकेत वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात झाली होती. सोनोरा डॉडने आपल्या वडीलांच्या आठवणींत फादर्स डेची सुरुवात केली होती. अशा प्रकारे जगात प्रथमतः 19 जून 1909 रोजी पितृदिवस (वडील दिवस) साजरा करण्यात आला.
या लेखातून आपण जागतिक वडील दिवस माहिती मराठी (International Father’s Day In Marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण फादर्स डे कधी असतो ? वडील दिवसाचा इतिहास, तारीख आणि महत्त्व याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- जागतिक वडील दिवस माहिती मराठी (International Father’s Day In Marathi)
- जागतिक वडील दिनाचा इतिहास माहिती मराठी (History Of Father’s Day Founder In Marathi)
- इंटरनॅशनल फादर डे शुभेच्छा मराठी (International Father’s Day Wishes In Marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
जागतिक वडील दिवस माहिती मराठी (International Father’s Day In Marathi)

विषय | जागतिक वडील दिवस (International Father’s Day) |
केव्हा साजरा करतात ? | दरवर्षी 19 जून |
सर्वात प्रथम कुठे साजरा करण्यात आला ? | वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात (19 जून 1909 रोजी) |
सर्वात प्रथम साजरा करणारा | सोनोरा स्मार्ट डोड |
सोनोरा स्मार्ट डोड (Sonora Smart Dodd) हिला जागतिक आई दिवस वरून वडील दिवस साजरा करण्याची कल्पना मिळाली. जागतिक मातृदिन (International Mother Day Is Celebrated On) मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा करतात.
भारत देशासहित संपूर्ण जगात वडील दिवस साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देखील दिल्या जातात.
Why Father’s Day Is Celebrated – फादर्स डे साजरा करण्यामागे काही कारणे आहेत , ते पुढीलप्रमाणे…
- आपल्या जीवनातील वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.
- आपल्या मुलांचे वडीलावर असणारे प्रेम, आदर, शिकवण आणि त्यागाची आठवण करून देण्यासाठी वडील दिवस साजरा करण्यात येतो.
- तसेच कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या वडिलांना शुभेच्या देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
जागतिक वडील दिनाचा इतिहास माहिती मराठी (History Of Father’s Day Founder In Marathi)

सोनोरा स्मार्ट डोड हीचा जन्म 18 फेब्रुवारी 1882 रोजी अमेरिकेत झाला. सोनोरा 16 वर्षाची असताना तिची आई मरण पावली. त्यानंतर तिच्या भावंडाचा तिने सांभाळ केला. सेंट्रल मेथोडिस्ट एपिस्कोपल चर्चमध्ये मातृ दिनाविषयी प्रवचन ऐकुन तिच्या मनात वडील दिवस साजरा करण्याविषयी विचार आले.
त्यानंतर तिने स्पोकेन मंत्रिमंडळाशी संपर्क साधला आणि तिच्या वडिलांचा वाढदिवस 5 जून हा वडिलांचा सन्मान दिवस म्हणून साजरा करण्याचा विचार सांगितला. पण स्पोकेन मंत्रिमंडळाने हा वडिलांचा सन्मान दिवस महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही कल्पना देशभर लोकप्रिय झाली.
अशा प्रकारे आज जगभरात 19 जून हा दिवस जागतिक वडील दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात देखील 19 जून हा दिवस जागतिक पितृदिवस म्हणून साजरा केला जातो.
इंटरनॅशनल फादर डे शुभेच्छा मराठी (International Father’s Day Wishes In Marathi)

नेहमी तेवत ठेवतात ज्ञानज्योत, असतो खूपच स्वाभिमानी धैर्य खचलेल्याना आणि चूक झालेल्यांना दिव्य यशाची प्रेरणा रुजून देतो, तो बाप असतो प्रेमाने हात फिरवणारा, तो बाप असतो… घराच अस्तित्व असतो बाप पण खंत 😞, सगळ्यांना वाटतो डोक्याला ताप सर्वांवर असतो त्याचा धाक पण प्रेमाने हात फिरवणारा असतो तो बाप…
तुम्हाला हेदेखील वाचायला आवडेल…
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण जागतिक वडील दिवस माहिती मराठी (International Father’s Day In Marathi) जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
जागतिक वडील दिवस केव्हा साजरा करतात ?
जागतिक वडील दिवस 19 जून या दिवशी साजरा करतात.
जागतिक वडील दिवस सर्वप्रथम कोणी साजरा केला ?
जागतिक वडील दिवस सर्वप्रथम सोनोरा स्मार्ट डोड हिने साजरा केला.