आंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी माहिती (International yoga day 2022)

By | December 3, 2022

International yoga day 2022 – योग हे एक प्राचीन शास्त्र असून ही एक भारतीय परंपरेची समृद्ध देणगी आहे. योगामुळे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन आणि आत्मिक शांती प्राप्त होते. आपल्या प्रत्येकाला एक व्यक्तिमत्त्व असते, हे व्यक्तिमत्त्व केवळ शारीरिक गुणांवर ठरत नाही. तर त्यासोबत व्यक्तीचे मानसिक, बौद्धिक, भावनिक गुण महत्वाचे ठरत असतात. नियमित योगा केल्याने वरील सर्व गुण विकसित होण्यास मदत होते.

वरील परिच्छेदात म्हंटल्याप्रमाणे, योग हे एक प्राचीन शास्त्र असून ही एक भारतीय परंपरेची समृद्ध देणगी आहे. त्यामुळे योगा भारतात फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे.

या लेखातून आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी माहिती (International yoga day 2022) जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाजागतिक आरोग्य दिन माहिती मराठी (World Health Day 2022)

Table of Contents

आंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी माहिती (International yoga day 2022)

International yoga day 2022 in marathi
विषय आंतरराष्ट्रीय योग दिवस (International yoga day)
प्रकार व्यक्तिमत्व विकासाचे शास्त्र
सुरुवातभारतात (5000 वर्ष अगोदरपासून)
आंतरराष्ट्रीय (21 जून 2015)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (india’s prime minister) यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (General Assembly of USA) 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या (United States)193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि त्यानुसार 21 जून रोजी 2015 रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा योग दिवस साजरा (international yoga day celebrated in first time) करण्यात आला.

योग म्हणजे काय व्याख्या मराठी (yoga definition in marathi)

योग आत्मप्रचीती प्राप्त करण्यास अर्थ प्रदान करते. योग या शब्दाचा शाब्दिक अर्थ संस्कृत मध्ये ‘योक’ असा आहे. म्हणूनच योगाची व्याख्या ही देवाच्या सार्वभौमिक भावनेबरोबर व्यक्तिगत भावना एकत्रीत करणे अशी करता येते.

हा लेख जरूर वाचाआरोग्यासाठी पाण्याचे उपयोग मराठी माहिती (water benefits information in marathi)

योग केल्याने कोणते फायदे होतात (yoga benefits in marathi)

  • व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोन बदलतो म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.
  • अंतर्गत आणि बहिर्गत अवयवांचा व्यायाम होतो.
  • शरीर तंदुरुस्त आणि लवचिक बनते. मन प्रसन्न आणि शांत होऊन उत्साह वाढीस लागतो.
  • सारासार विचार करण्याची क्षमता विकसित होते.
  • श्वसन व्यवस्था सुधारते आणि रक्तातील प्राण वायूचे प्रमाण वाढते.

योग करताना कोणती काळजी घ्यावी (What care should be taken while practicing yoga)

  • योगासन करण्यासाठी शांत, स्वच्छ आणि पुरेसा उजेड असलेली जागा निवडायची. अंगावर कमीत कमी आणि सैल कपडे घालून योगासन करावे, तसेच योगा करताना सतरंजीचा वापर करावा.
  • सकाळी पोट रिकामे असताना योगा करावा आणि योगासने केल्यावर कमीत कमी अर्धा तास काही खाऊ नये.
  • योगासन करताना श्वास कोंडू नका. तसेच सर्व योगासन सावकाश करा.
  • योगासन केल्यावर एकदम हात पाय मोकळे करून आसन सोडू नये.

आंतरराष्ट्रीय योग दिवस थीम 2022 (international yoga day 2022 theme)

हा लेख जरूर वाचाकेळी खाण्याचे फायदे माहिती मराठी (banana benefits in marathi)

  • आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा योग दिवस (international yoga day first time) 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी योगाची थीम Yoga for Heart अशी होती.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसऱ्यांदा योग दिवस (international yoga day second time) 21 जून 2016 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी योगाची थीम Connect with Youth अशी होती.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्यांदा योग दिवस (international yoga day third time) 21 जून 2017 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी योगाची थीम Yoga for Health अशी होती.
  • जागतिक पातळीवर चौथ्या वेळेस योग दिवस (international yoga day fourth time) 21 जून 2018 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी योगाची थीम Yoga for Peace अशी होती.
  • जागतिक पातळीवर पाचव्या वेळी योग दिवस (international yoga day fifth time) 21 जून 2019 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी योगाची थीम Yoga for Heart अशी होती.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर सहाव्या वेळी योग दिवस (international yoga day sixth time) 21 जून 2020 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी योगाची थीम Yoga at Home and Yoga with Family ही होती.
  • जगात सातव्या वेळी योग दिवस (international yoga day seventh time) 21 जून 2021 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी योगाची थीम Yoga For Wellness अशी होती.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर आठव्या वेळी योग दिवस (international yoga day eighth time) 21 जून 2022 रोजी साजरा करण्यात येणार असून यावर्षी योगाची थीम Yoga for Humanity अशी आहे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी माहिती (International yoga day 2022) जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो ?

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो.

योग या शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला आहे ?

योक या संस्कृत शब्दापासून योग हा शब्द रूढ झाला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यामागे काय हेतू आहे ?

जगातील सर्वांचे शारीरीक, मानसिक आणि बौद्धिक गुण विकसित व्हावे, हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यामागे हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *