गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक (investment vs trading in marathi)

By | November 11, 2022

investment vs trading in marathi – गुंतवणूक आणि ट्रेडिंग या दोन शब्दाचा शेअरबाजारात जास्त वापर होताना आपल्याला दिसून येतो. आपल्यापैकी बहुदा बऱ्याच जणांना याबद्दल फारसे काही माहीत नसते, अर्थात बरेच जण शेअर मार्केटमध्ये पैसे आहेत म्हणून शिकून घेतात किंवा त्यामध्ये प्रवेश करतात. परंतु शेअर मार्केट मध्ये येताना आपण ट्रेडर आहोत की गुंतवणूकदार याविषयी निर्णय घेणे गरजेचे ठरते.

शेअर बाजारात प्रत्येक जण हा नफा कमावण्यासाठी आलेला असतो, यातील बरेच जण नफा कमवतात तर काहींना नुकसान झेलावे लागते. गुंतवणूकदार आणि ट्रेडर हे दोघेही आपापल्या पद्धतीने नफा कमवतात. गुंतवणूकदार चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करून दीर्घकालीन मुदतीसाठी ठेवत असतो, यामधून तो मोठा परतावा मिळवत असतो, तसेच या होल्डिंग्स मधून त्याला डिव्हीडंट लाभांश मिळत असतो.

याउलट एक ट्रेडर बाजारात चालू असणाऱ्या मंदी किंवा तेजी या दोन्ही परिस्थितीत आपला फायदा शोधतात. थोड्या कालावधीसाठी पोझिशन घेऊन नफा मिळवतात.

या लेखात आपण गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक – investment vs trading in marathi सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील हा निर्णय घेणे सोपे जाईल.

गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक – investment vs trading in marathi

investment vs trading in marathi
गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक

गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक असून यातून मिळणारा परतावा हा मोठा असू शकतो. यासाठी लागणारा कालावधी हा अमर्यादित असतो. ट्रेडर हा शॉर्ट टर्म साठी केला जाणारा व्यापार असून, यातून एक दिवसीय, एक आठवडा किंवा महिनाभरात नफा मिळवला जातो.

गुंतवणूक या संकल्पनेविषयी मराठी माहिती (investing information in Marathi)

गुंतवणुकीचे उद्दिष्ट दीर्घकालीन कालावधीत स्टॉक्स, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स आणि इतर गुंतवणूक साधनांच्या खरेदी आणि होल्डिंगद्वारे संपत्ती निर्माण करणे होय. व्याज, लाभांश आणि स्टॉक स्प्लिट्स यांसारख्या लाभांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक एका वर्षांच्या कालावधीसाठी किंवा दहा वर्षापेक्षा जास्त वेळेसाठी ठेवली जाते.

बाजारांमध्ये कितीही चढ-उतार आला, तर स्टॉक्सच्या किमती पुन्हा वाढतील आणि कोणतेही नुकसान अखेरीस वसूल होईल या अपेक्षेने गुंतवणूकदार उतार-चढावातून संतुलन राखतात. गुंतवणूकदार प्रामुख्याने बाजारातील मूलभूत बाबींचा अभ्यास करतात, जसे की किंमत-ते-कमाई गुणोत्तर आणि व्यवस्थापन यांचा अंदाज बांधणे.

थोडक्यात गुंतवणूकदार संपत्ती निर्माण करण्याच्या हेतूने गुंतवणूक करत असतात.

व्यापारी या संकल्पनेविषयी माहिती मराठी (trader information in Marathi)

ट्रेडिंगमध्ये जास्त प्रमाणात व्यवहार होत असतात. यामध्ये स्टॉक, कमोडिटी आणि चलन जोड्या किंवा इतर साधनांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते. गुंतवलेले पैसे शॉर्ट पोझिशन मध्ये परतावा निर्माण करून देतील या उद्देशाने ट्रेडर हा व्यापार करत असतो.

गुंतवणूकदार वर्षाला साधारणपणे 15 ते 20 टक्के परतावा मिळतो याउलट एक ट्रेडर महिन्याला 15 ते 20 टक्के परतावा मिळवत असतो. ट्रेडर व्यापार करताना कमी किमतीमध्ये स्टोक्स खरेदी करून जास्त किमतीमध्ये किंवा पाहिजे तितके नफा मिळवून आपले पैसे मोकळे करतात.

गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवणे अगोदर कंपनीच्या मूलभूत बाबींचे विश्लेषण करतात, तर ट्रेडर हे टेक्‍निकल ऍनॅलिसिस च्या माध्यमातून अंदाज वर्तवतात. टेक्निकल अनालिसेस फंडामेंटल अनालिसिस या दोन स्टॉक्सच्या विश्लेषण करण्याच्या पद्धती असून गुंतवणूकदार आणि ट्रेडर याचा आपल्या गरजेनुसार वापर करतात. टेक्निकल ऍनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस याविषयी आपण पुढील लेखात माहिती अभ्यासणार आहोत.

ट्रेडर टेक्निकल अनालिसेस साधने जसे की, मोविंग अवरेज, आर एस आय, स्टोकास्टिक ऑसिलेटर, बाजारातील ट्रेण्ड, स्टॉक किंमत चढ उतार याचा अंदाज बांधून आपला नफा कमावत असतात.

व्यापाराचे ट्रेडिंग करण्याच्या पद्धतीवरून पुढील चार प्रकार पडतात.

types of traders in stock market information in marathi – पहिला प्रकार म्हणजे पोझिशन ट्रेडर (Position Trader) – हा ट्रेडर केलेली गुंतवणूक कमीत कमी महिना आणि जास्तीत जास्त वर्षापर्यंत होल्डिंग करून ठेवत असतो.

दुसरा प्रकार म्हणजे स्विंग व्यापारी (Swing Trader) – यामध्ये केलेली गुंतवणूक कमीत कमी एक दिवसीय तर जास्तीत जास्त एक आठवडापर्यंत मर्यादित असते.

तिसरा प्रकार म्हणजे एक दिवसीय ट्रेडर (day Trader) – ज्यामध्ये केलेली गुंतवणूक फक्त एक दिवस मर्यादित असून सकाळी घेतलेला स्टॉक सायंकाळी शेअर मार्केट बंद होण्याअगोदर विकल्या जातो.

सर्वात शेवटचा आणि चौथा प्रकार म्हणजे Scalp Trader – यामध्ये खरेदी केलेला शेअर अवघ्या काही सेकंद ते मिनिटासाठी मर्यादित असतो.

सारांश

गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक – investment vs trading in marathi याविषयी आपण माहिती जाणून घेतली. तसेच आपण व्यापाराचे प्रकार याविषयी देखील माहिती अभ्यासली.

ट्रेडर असो वा गुंतवणुकदार दोघांनाही आपापल्या बजेटनुसार, आपल्या क्षमतेनुसार, अनुभवानुसार, अन् सर्वात महत्त्वाचे अभ्यासानुसार जोखीम घ्यावी लागते. यासाठी तुम्ही जर मार्केट मध्ये नवीन असाल, तर बाजारा विषयी मूलभूत माहिती माहीत करून घेणे आवश्यक आहे.

गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक – investment vs trading in marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

भारतीय भांडवल बाजार किती भागात विभागला गेला आहे ?

भारतीय भांडवल बाजार दोन भागात विभागला गेला आहे, पहिला भाग म्हणजे सरकारी रोखेबार आणि दुसरा भाग म्हणजे शेअरबाजार.

वित्तीय बाजाराचे प्रामुख्याने किती भागात वर्गीकरण केले जाते ?

वित्तीय बाजाराचे प्रामुख्याने दोन भागात वर्गीकरण केले जाते, पहिला प्रकार भारतीय नाणे बाजार आणि दुसरा प्रकार म्हणजे भारतीय शेअर बाजार.

वित्तीय बाजार म्हणजे काय ?

वित्तीय बाजारपेठ अशी बाजारपेठ असते ज्यात लोक कमी व्यवहारांच्या किंमतीवर आर्थिक सिक्युरिटीज आणि डेरिव्हेटिव्ह्जचा व्यापार करतात. काही सिक्युरिटीजमध्ये स्टॉक आणि बॉन्ड्स, कच्चा माल आणि मौल्यवान धातूंचा समावेश आहे, जे वित्तीय बाजारात वस्तू म्हणून ओळखल्या जातात.

भांडवल बाजार म्हणजे काय ?

भांडवल बाजार म्हणजे संस्थांनी भांडवल उभारणीसाठी तसेच भांडवलांच्या समभाग देवाण घेवाण करण्यासाठी आणि कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालवण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होय. या बाजारात उद्योजक आणि व्यावसायिक संस्था आपले समभाग बॉडस् इ. विकून दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करतात.

हे लेख जरूर वाचा :

2 thoughts on “गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक (investment vs trading in marathi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *