लोखंडाची माहिती मराठी – iron information in marathi

By | December 3, 2022

iron information in marathi – लोह ज्याला आपण साधारणपणे लोखंड असे म्हणतो. हा एक नैसर्गीक संपत्तीचा भाग आहे. लोखंड एक धातुरुप मूलद्रव्य असून ते पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात आढळते. सर्वच धातूंमध्ये लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु लोखंड निसर्गात साधारणपणे मुक्तस्वरूपात आढळत नाही, ते नेहमी लोहसंयुगाच्या रूपात आढळून येत असते.

औद्योगिक क्षेत्रात सर्वात जास्त उपयोगी येणारा हा धातू आहे. तसेच मानवी आरोग्यासाठी देखील आवश्यक असा हा घटक आहे. यासाठी आपण आज या लेखात लोखंडाची माहिती मराठी – iron information in marathi जाणून घेणार आहोत.

या लेखात आपण लोखंड कसे बनते ? त्याचे प्रकार आणि फायदे माहिती मराठी जाणून घेणार आहोत.

Table of Contents

लोखंडाची माहिती मराठी – iron information in marathi

iron information in marathi
लोखंडाची माहिती मराठी
नावलोह (Fe)
प्रकारसंक्रामक (धातू)
अनुक्रमांक (Z)26
उत्कलन बिंदू1,538 अंश सेल्सिअस
इलेक्ट्रॉन विन्यास[Ar] 3d64s2
उपयोगयंत्राची साधने बनवण्यासाठी
रेल्वे, कार, जहाज बनवण्यासाठी
कंक्रीट बार आणि इमारतींचे भार वाहून नेणारी फ्रेमवर्क यासारख्या वस्तूूूूू बनवण्यासाठी

औद्योगिक क्षेत्रात सर्वात जास्त वापरला जाणारा धातू लोखंड होय. यांत्रिक गुणधर्म आणि कमी किंमतीमुळे लोखंडाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मोठीमोठी उपकरणे तयार करण्यासाठी जास्त करून लोखंड वापरतात कारण यात उच्च तणाव सहन करण्याची शक्ती असते.

आपल्या आरोग्यासाठी देखील लोह उपयोगी ठरते. चयापचय क्रिया सुरळीत होण्यासाठी आहारात किमान लोहाची आवश्यकता असते. याच्या सेवनाने लाल रक्तपेशींची संख्या आणि हिमोग्लोबिन संतुलित राहते.

लोखंडाचा शोध इतिहासपूर्व काळामध्ये लागला. सुरवातीच्या काळात लोखंडापासून दागदागिने बनविले जात होते. ईजिप्तमधील फेअरो राजे यांस सोन्यापेक्षा मौल्यवान मानायचे.

पृथ्वीवर लोखंडाचे साठा 35 % इतका आहे. एक घन किमी पाण्यात 12 टन लोखंड असते. माणसाच्या शरीरात साधारण 4.5 ग्रॅम लोह असून यापैकी 65 % लोखंड हीमोग्लोबिनात असते.

लोखंड कसे बनवतात ?

मानवाला लोखंडाचा शोध अश्मयुगात लागला. त्यानंतर मानवाने विकास साधून त्यापासून शस्र, अस्र, शेती अवजारे, भांडी वगैरे. बनवण्यास सुरुवात केली. या वेळी लोहाचे सोन्याहून जास्त मूल्य होते, त्यामुळे यापासून दागिने तयार करत असत.

ज्या प्रकारे कोळशाच्या खाणी असतात, तश्याच लोखंडाच्या खाणी असतात. त्यातून लोखंड मिळवले जाते. हे मिळालेले लोखंडाचे लहान तुकडे केले जातात. यामध्ये चुनखडी, कोळसा आणि लोखंडाचे धातुके मिश्रण करून घेतात. त्यानंतर एक उच्च तापमान असणाऱ्या भट्टीमध्ये याचे द्रव्य स्वरूपात येईपर्यंत तापवले जाते.

या पदार्थाचे द्रव्य स्वरूपात आल्यानंतर एक साच्यात घालून त्याला थंड करण्यासाठी काही वेळ ठेवले जाते.

झोटभट्टी पद्धत वापरून लोखंड बनवले जाते. ही पद्धत पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा >> लोखंडनिर्मिती मराठी माहिती

लोखंडाचे प्रकार माहिती मराठी

लोह (56)91.66 %
लोह (54)5.82 %
लोह (57)2.49 %
लोह (58)0.33 %

निसर्गात आढळणारे लोखंड हे चार समस्थानिकांचे मिश्रण आहे. लोखंडाची इतर मूलद्रव्यांबरोबर असंख्य खनिजे भूकवचात मिळतात. यातील थोड्याच खनिजपासून लोखंड निर्मिती होती.

ज्या खनिज साठ्यापासून लोखंड मिळवता येतात, या साठ्यांना धातुक साठे असे म्हणतात.

या धातुकांमध्ये लोखंडाचे प्रमाण 30 ते 60 टक्के दरम्यान असते. ही धातुके प्रामुख्यानं ऑक्साइडे, कार्बोनेटे, सिलिकेटे आणि सल्फाइडे यांच्या रुपात असतात. हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, गोएथाइट, लेपिडोक्रोसाइड, पायराइट, सिडेराइट, पायरोटाइट, टॅकोनाइट, मार्‌कॅसाइट हे लोखंडाचे धातुके आहेत.

लोखंडाचे पाच प्रकार आहेत, यामध्ये मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट, सिडेराइट, पायराइट यांचा समावेश होतो.

  • मॅग्नेटाइट – यामध्ये लोखंडाचे प्रमाण 72.4 % इतके असते आणि उरलेले 27.6 % ऑक्सिजन असते. याचा रंग गडद करडा ते काळा असतो.
  • हेमॅटाइट – यामध्ये लोखंडाचे प्रमाण 69 तेे 94 % इतके असते आणि उरलेले ऑक्सिजन असते. याचा रंग करडा किंवा भडक तांबडा असतो.
  • लिमोनाइट – यामध्ये लोखंडाचे प्रमाण 60 तेे 65 % इतके असते आणि उरलेले ऑक्सिजन आणि पाणी असतो. याचा रंग पिवळा व तपकिरी किंवा काळा असतो.
  • सिडेराइट – यामध्ये 48.2 % लोखंड आणि उरलेले कार्बन डाय-ऑक्साइड असते. यामध्ये मँगॅनीज, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि कोबाल्ट ही मूलद्रव्ये असतात. हे स्फटिकी ते मातकट रुपांत आढळते. याचा रंग हिरवट करडा ते तपकिरी असा असतो.
  • पायराइट – यामध्ये लोखंडाचे प्रमाण 46.6 % इतके असते आणि उरलेले गंधक असते. याचा रंग सोन्यासारखा पिवळसर असतो.

लोखंडाचे उपयोग माहिती मराठी

झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस बनवतात. हा लोहरस थंड करून लोखंड तयार केले जाते. याला ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात. या लोखंडाचा उपयोग नरम लोखंड तयार करण्यासाठी केला जातो.

स्टेनलेस स्टील – याला लोखंडाचे संमिश्र म्हणून ओळखले जाते. यामध्ये लोखंड, क्रोमीअम, कार्बन या धातूंचा वापर केला जातो. याचा उपयोग तीक्ष्ण हत्यारे, जीवन उपयोगी भांडी, सायकल आणि स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल बनविण्यासाठी केला जातो.

मॅगनीज स्टील – याला लोखंडाचे संमिश्र म्हणून ओळखले जाते. यामध्ये लोखंड आणि मॅगनीज या धातूंचा वापर केला जातो. याचा उपयोग कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्यासाठी केला जातो.

क्रोमीअम स्टील – याला लोखंडाचे संमिश्र म्हणून ओळखले जाते. यामध्ये लोखंड आणि क्रोमीअम या धातूंचा वापर केला जातो. याचा उपयोग बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्यासाठी केला जातो.

टंगस्टन स्टील – याला लोखंडाचे संमिश्र म्हणून ओळखले जाते. यामध्ये लोखंड, टंगस्टन आणि कार्बन या धातूंचा वापर केला जातो. याचा उपयोग जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्यासाठी केला जातो.

लोखंडाचा सर्वाधिक वापर संरचनात्मक पोलादे बनविण्यासाठी केला जातो. ते बीड आणि घडीव लोखंड बनविण्यासाठी वापरले जाते. याव्यतिरक्त लोखंड वापरून अनेक अवजड वाहने आणि साचे तयार केले जातात.

लोखंडाचा वापर यंत्राची साधने बनवण्यासाठी, रेल्वे, कार, जहाज बनवण्यासाठी, कंक्रीट बार आणि इमारतींचे भार वाहून नेणारी फ्रेमवर्क यासारख्या वस्तूूूूू बनवण्यासाठी केला जातो. संरक्षणासाठी हत्यारे यापासून तयार केले जातात.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण लोखंडाची माहिती मराठी – iron information in marathi जाणून घेतली. त्याचबरोबर लोखंडाची माहिती मराठी यामध्ये लोखंडाचे प्रकार आणि उपयोग याबद्दल माहिती जाणून घेतली आहे.

लोखंडाची माहिती मराठी – iron information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

लोहा चा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे ?

घडीव लोखंड हा लोहा चा सर्वात शुद्ध प्रकार आहे.

उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरतात ?

उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी मॅगनीज हा धातू वापरतात.

लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी का करतात ?

आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लोखंडाच्या भांड्याचा वापर करणे उपयोगी आहे. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळेच लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी करतात.

लोखंडाला जंग लागण्याचे प्रमुख कारण कोणते ?

लोखंड प्रामुख्याने ऑक्सिडेशन झाल्यामुळे गंजते. यामध्ये लोखंड आणि पाण्याचा संपर्क आला तर लोखंड असते.

लोखंड गंजणे रोखण्याच्या दोन पद्धती लिहा.

1. लोखंडाच्या वस्तूला रंग दिल्याने लोखंडाचा गंज रोखता येऊ शकतो.
2. जस्ताचा किंवा कथिलाचा मुलामा देऊन लोखंड गंजण्यापासून रोखू शकतो.

तुम्हाला हे लेख देखील वाचायला आवडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *