इतिहास म्हणजे काय?

Itihas mhanje kay marathi mahiti – इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची सूसंगत पद्धतीने केली गेलेली मांडणी होय. ही मांडणी आपल्याला भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान देत असते.

मराठीमध्ये एक ओळ आहे “जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.” त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आपल्या प्रगती साधायची असेल, तर त्याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे ठरते. कारण इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो. इतिहासात भूतकाळाचे वर्णन आणि भविष्यातील भाकित दडलेले असते.

आजच्या या लेखात आपण इतिहास म्हणजे काय मराठी माहिती (itihas mhanje kay marathi mahiti) जाणून घेणार आहोत. यामधे आपण इतिहासाचे कालखंड आणि प्रकार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

इतिहास म्हणजे काय मराठी माहिती (itihas mhanje kay marathi mahiti)

itihas mhanje kay marathi mahiti
इतिहास म्हणजे काय मराठी माहिती

इतिहास या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृत शब्दापासून झाली आहे. इति + ह् + आस याचा अर्थ या प्रमाणे घडले. अश्या प्रकारे इतिहास या शब्द निर्माण झाला. या शब्दाचा अभिप्रेत अर्थ – भूतकाळातील गोष्टी अशा घडल्या असा आहे.

इतिहास केवळ माणसापुरता मर्यादित नसून पृथ्वीवरील सर्व सजीव आणि निर्जीव घटकांचा भूतकाळ आहे. यामध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीपासून पृथ्वीचा विकासापर्यंत गोष्टी सामावलेल्या आहेत.

आजपर्यंत अनेक इतिहासकार झाले, यातील प्रत्येक जनाने इतिहासाबद्दल आपापली व्याख्या मांडली. या वाख्या एकमेकांशी अगदी समान आहेत.

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद होय.

ई. एच. कार या इतिहासकाराच्या मते भूतकाळ आणि वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.

हॅपाल्ड यांच्या मते इतिहास हा अनुभवांचा नंदादीप आहे.

भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय.

बर्कहार्ड हे इतिहासकार असे म्हणतात एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद म्हणजे इतिहास होय.

इतिहासाचे कालखंड किती व कोणते माहिती मराठी

साधारणपणे इतिहासाचे तीन कालखंड पडतात. यामध्ये प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड , आधुनिक कालखंड यांचा समावेश होतो.

इतिहासाची माहिती प्राचीन दस्तऐवज, करारनामा, कागदपत्रे, तामृपत्र, शिलालेख यावरुन मिळत असते. याच बरोबर प्राण्यांचे अवशेष, मानवी अस्थी यावरूनही भूतकाळातील घटनांची माहिती मिळते.

प्राचिन शिल्पे, चित्रे, भांडी, हस्तकौशल्ये, स्थळे, वास्तू, मूर्त्या यावरूनही त्या काळातील माहिती मिळत असते.

Related – इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय?

सारांश

आशा करतो की तुम्हाला, इतिहास म्हणजे काय (itihas mhanje kay marathi mahiti) याचे उत्तर मिळाले असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती साधने वापरतात ?

इतिहासाची अभ्यास करण्यासाठी प्राचीन दस्तऐवज, करारनामा, कागदपत्रे, तामृपत्र, शिलालेख यावरुन मिळत असते. याच बरोबर प्राण्यांचे अवशेष, मानवी अस्थी याचा वापर केला जातो.

कोणता कालखंड हा आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो ?

अठराव्या शतकाचा कालखंड हा आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो.

प्राचीन काळापासून व्यापाराचे मुख्य केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?

प्राचीन काळापासून व्यापाराचे मुख्य केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण प्रयागच्या आसपासचे प्रदेश (कौशांबी) होय.

मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता आहे ?

मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड साधारणपणे इसवी सन 600 ते 1600 पर्यंत मानला जातो.

भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार कोण आहेत ?

भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार पुढीप्रमाणे आहेत.
1. जेम्स मिल याने द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया ची निर्मिती केली.
2. जेम्स ग्रँट डफ याने हिस्टरी ऑफ द मराठा हे पुस्तक लिहिले.
3. रॉबर्ट ऑर्म
4. जॉन मॅल्कम
5. पीटर ओबर
6.एडवर्ड थॉर्नटन
7. जॉन कॅपर