Itihasachi shastriya padhat mhanje kay – इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय इयत्ता पाचवी किंवा सहावी या वर्गात विचारला जाणारा प्रश्न आहे. याआधी आपण शास्त्र या शब्दाचा मराठी अर्थ समजून घेऊ. एखाद्या विषयाच्या व्यवस्थित आणि तर्कशुद्ध अभ्यासाला शास्त्र असे म्हणतात.
हे शास्त्र अनेक ठिकाणी उपयोगी पडत असते. जसे की, वास्तुशास्त्र, नैसर्गिक शास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अश्या विविध शाखंमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला जातो.
आजच्या या लेखामध्ये आपण इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय – itihasachi shastriya padhat mhanje kay हे समजावून घेऊ.
इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय – itihasachi shastriya padhat mhanje kay

एखाद्या विषयाच्या व्यवस्थित आणि तर्कशुद्ध अभ्यासाला शास्त्र असे म्हणतात. यानुसार इतिहास या विषयाचा खोलवर अभ्यास करून व्यवस्थित समजून घेणे, म्हणजे इतिहासाची शास्त्रीय पद्धत होय. इतिहासात अनेक संज्ञा आहेत. ज्यामध्ये विविध विषयांवर अभ्यास केला जातो. इतिहासाचा अभ्यास करण्यास इतिहासकार म्हणतात.
इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती साधने वापरतात – इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी भौतिक साधने, लिखीत साधने आणि मौखिक साधनांचा वापर होत असतो.
इतिहासाची लिखित साधने कोणती – लिखित साधनांत वेगवेगळ्या भाषांतील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख यांचा समावेश होतो.
इतिहासाची भौतिक साधने कोणती – नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो.
इतिहासाची मौखिक साधने – पूर्वीपासून चालत आलेल्या दंतकथा आणि मौखिक बाबींचा समावेश यामध्ये होतो.
इतिहासातील महत्वपूर्ण माहिती
प्र. इतिहास म्हणजे काय (itihaas manje kai) ?
उत्तर – भूतकाळातील घडलेल्या घटनांचा सविस्तरपणे केला जाणारा अभ्यास म्हणजे इतिहास होय. इतिहास व नागरिकशास्त्र हे विषय आता सर्वच विद्यापीठात शिकवले जात आहे.
प्र. इतिहासाचे कालखंड किती व कोणते ?
उत्तर – इतिहासाचे तीन कालखंड आहेत. ते पुढीप्रमाणे आहेत.
1. प्राचीन कालखंड
2. मध्ययुगीन कालखंड
3. आधुनिक कालखंड
प्र. वस्तू आणि वास्तू त्यांचे अवशेष यांना इतिहासाची कोणती साधने म्हणतात ?
उत्तर – भौतिक साधने
प्र. शास्त्रीय पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर – शास्त्रीय पद्धतीचा जनक फ्रेडरिक विन्झ्लो टेलर यांना म्हणतात.
प्र. भारतीय इतिहासकारांची नावे
उत्तर – भारतीय इतिहासकारांची नावे पुढीप्रमाणे.
1. गौरीशंकर हीराचंद ओझा
2. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे
3. यदुनाथ सरकार
4. रमेशचन्द्र मजुमदार
5. रामशरण शर्मा
6. बिपिन चन्द्र
7. रोमिला थापर
8. दामोदर धर्मानंद कोसंबी
9. राधा कुमुद मुखर्जी
10. सुमित सरकार
11. सव्यसाची भट्टाचार्य
प्र. वस्तुनिष्ठ लेखनाचा आग्रह धरणारे पहिले इतिहासकार कोण ?
उत्तर – फ्रेंच तत्त्ववेत्ता व्होल्टेअर हे वस्तुनिष्ठ लेखनाचा आग्रह धरणारे पहिले इतिहासकार आहे.
प्र. इतिहास लेखन म्हणजे काय ?
उत्तर – इतिहासात उपलब्ध पूराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते, अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.
सारांश
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय – itihasachi shastriya padhat mhanje kay जाणून घेतली.
जर तुम्हाला ही इतिहासाची शास्त्रीय पद्धत आणि इतिहासाबद्दल माहिती मराठीत आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल