जागतिक आदिवासी दिन माहिती मराठी

Jagtik Adivasi Divas Mahiti Marathi – भारतात विविध संस्कृती आणि परंपरा आजही पाहायला मिळतात. यातीलच एक घटक म्हणजे आदिवासी. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, बोली भारताच्या विविधतेत भर घालते. शिवाजी महाराजांच्या काळात या समाजातील बऱ्याच व्यक्तींनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.

देशाच्या विकासकामात आदिवासी समाजाची महत्वाची भूमिका असूनही हा समाज विकासापासून वंचित राहिला आहे. आजही हा समाज डोंगरदऱ्यात राहणे पसंत करतात. या लोकांत जनजागृती व्हावी या दृष्टीने 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो.

या लेखातून आपण जागतिक आदिवासी दिन माहिती मराठी (Jagtik Adivasi Divas Mahiti Marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

आदिवासी म्हणजे काय (adivasi samaj in marathi)

jagtik adivasi divas mahiti marathi
विषयआदिवासी
प्रकारसामाजिक घटक
रहिवासीभारतीय उपखंड
प्रमुख जाती22

नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी होय. नागर संस्कृती म्हणजे अशा प्रकारची राजकीय संस्कृती आहे जिच्यामध्ये लोकशाहीला पोषक अशी मूल्ये नागरिकांमध्ये रुजलेली असतात.

आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते आजही भारतात पाहायला मिळते. आदिम मानवापासून हे लोक जंगलात राहत आले आहेत. यामुळे यांना वनवासी देखील म्हंटले जाते.

पुरातन संस्कृत ग्रंथांमध्ये आदिवासींना अत्विक असा उल्लेख आढळतो. आदिवासी समाज निसर्गपूजक म्हणून ओळखला जातो, यांच्या सर्व संस्कृती निसर्गाशी निगडित असतात. याव्यतिरिक्त इतर समाजाशी त्यांचे काही देणे घेणे नसते.

लाकूड कटाई करणे, वनांमधून कंदमुळे काढणे, फळे, तंतू, मध व औषधी वनस्पती गोळा करणे यावर आदिवासी लोकांचा उदरनिर्वाह चालतो.

भारतातील आदिवासी जमाती माहिती (list of Aboriginal people in india)

भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आणि ईशान्य भारत आणि भारतातील अंदमान आणि निकोबार बेटे, आणि फेनी, खागरबन, आणि खारबन या राज्यात आदिवासी समाज आढळतो.

भारतातील आदिवासी जमातींच्या नावांची यादी पुढीलप्रमाणे आहेत.

  • आंध
  • ओरांव
  • कातकरी
  • कोकणा
  • कोरकू
  • कोलाम
  • गोंड
  • ढोर-कोळी
  • टोकरे-कोळी
  • ठाकर
  • परधान
  • पावरा
  • भिल्ल
  • मल्हार कोळी
  • मन्नेरवारलु
  • महादेव कोळी
  • माडिया गोंड
  • वारली
  • हलबा
  • पारधी
  • टाकणकार
  • पारधी
  • फासेपारधी

महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी (festival of maharashtra information in marathi)

भारतातील आदिवासी भाषा किती आहेत (adivasi language in india mahiti)

भारतात अनेक जमाती आहेत, या प्रत्येक जमातींच्या बोलीभाषेत विविधता दिसून येते. आदिवासींच्या बहुतांश भाषांना लिपी अस्तित्वात नाही तर काही आदिवासी भाषांना लिपी आहे. उदा. संथाली, गोंडी ही द्रविडी भाषा कुटुंबातील प्रमुख आणि समृद्ध बोलीभाषा आहे.

भारतात आर्यपूर्व काळात अस्तित्वात बोलल्या जाणाऱ्या अनेक मूळ आणि प्राचीनतम बोलीभाषा आढळल्या. ढोरी (टोकरे कोळी), कोरकू, कोलामी, खारिया, गोंडी, गोरमाटी, ठाकरी, वाघरी, वाघरामी, पारधी, देहवाली, दो, परधानी, पावरी, भिलोरी, भूमिज, माडिया, मुंडारी, संथाली, सावरा, हलबी, मावळी इत्यादी आदिवासी भाषा आहेत.

हा लेख जरूर वाचाभाषा मराठी माहिती (bhasha in marathi)

आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते माहिती (adivasi and jungle relations in marathi)

आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते भारतात आजही दिसून येते. आदिवासी समाज वन्य व्यवसायांवर अवलंबून आहे. लाकूड कटाई करणे, वनांमधून कंदमुळे काढणे, फळे, तंतू, मध व औषधी वनस्पती गोळा करणे यावर आदिवासी लोकांचा उदरनिर्वाह चालतो.

आदिवासी लोकांसाठी जंगल म्हणजेच संसार असतो, त्यांना समाजातील इतर घटकांचा काहीही घेणे देणे नसते, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. यामुळे हा समाज बऱ्यापैकी मागासलेला दिसून येतो. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे राजकीय आणि मूलभूत अधिकारांपासून हा समाज दूर असतो.

हा लेख जरूर वाचापर्यावरणाचे महत्व माहिती मराठी

जागतिक आदिवासी दिन माहिती मराठी (jagtik adivasi divas mahiti marathi)

आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने या लोकांत जनजागृती व्हावी म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीतील वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात.

भारतीय संविधानानुसार आदिवासी यांना अनुसूचित जमाती या नावाने ओळखले जातात. भारतीय संविधानाने या समाजाची प्रगती व्हावी, म्हणून विशेष तरतुदी लागू केल्या आहेत.

हा लेख जरूर वाचासंविधानाची उद्देशिका म्हणजे काय (constitution of india in marathi)

आदिवासी समाजाला आपले हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी पेसा कायदा अस्तित्वात आला आहे. पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासींची संस्कृती, प्रथा परंपरा याचे जतन, संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे आहे.

शासनाने आदिवासी जमातीच्या विकासासाठी कोणकोणत्या योजना आखल्या आहेत?

आदिवासींच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. इसवी सन 1972 मध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना करण्यात आली. याचे सह्याद्री विभागाचे मुख्यालय नाशिक येथे, तर गोंडवाना विभागाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.

इसवी सन 1992 मध्ये या संचालनालयाची पुनर्रचना करून नाशिक, नागपूर, अमरावती आणि ठाणे येथे नवीन आयुक्त कार्यालये व त्याअंतर्गत प्रकल्प अधिकाऱ्यांची 23 कार्यालये सुरू करण्यात आली.

इसवी सन 1983 साली महाराष्ट्र राज्यात आदिवासी विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभागांतर्गत आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

आदिवासींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सरकारद्वारे त्याच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले जाते. यासाठी आदिवासी युवक-युवती व महिलांसाठी प्रौढ साक्षरता कार्यक्रम राबविले जातात.

आदिवासी समाजाचे कला व साहित्य माहिती मराठी

जगप्रसिद्ध वारली पेटिंगचे जनक जीवा सोमा म्हसे यांना मानले जाते. त्यांनी वारली चित्रकलेस आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. इसवी सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वारलीसोबतच पिंगुळ ही लोकचित्रकला जगभरात प्रसिद्ध आहे.

वाहरू सोनवणे, कविवर्य तुकाराम बांडे, रामचंद्र जंगले, चामुलाला छिपा राठवा, व्यंकटेश आन्नाम अशी अनेक प्रसिद्ध आदिवासी साहित्यिकांची नावे सांगता येईल.

आदिवासी साहित्यामध्ये धरणे, खाण उद्योगामुळे आदिवासी समाजासाठी काय समस्या उभ्या राहिल्या किंवा राहतात, याबाबतची माहिती मिळते.

Relatedजागतिक आदिवासी दिन भाषण

सारांश

या लेखातून आपण जागतिक आदिवासी दिन माहिती मराठी (Jagtik Adivasi Divas Mahiti Marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?

जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देता यावा म्हणून 9 ऑगस्ट 1994 संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पातळीवर आदिवासी दिवस घोषित केला.

जागतिक आदिवासी दिन का साजरा केला जातो ?

आजही आदिवासी समाज मागासलेला दिसून येतो. याचे मुख्य कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव व राजकीय क्षेत्रातील वर्चस्व कमी असणे.यातून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने त्यांच्यात जनजागृती व्हावी म्हणून जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो.

आदिवासी या शब्दाचा अर्थ काय आहे ?

आदि म्हणजे अगोदरचे व वासी म्हणजे रहिवासी, या दोन्ही शब्दांनी मिळून आदिवासी हा शब्द तयार झाला आहे. आदिवासी या शब्दाचा अर्थ मुळचे रहिवासी असा आहे.

Leave a Comment