जळगाव जिल्ह्यातील तालुके माहिती मराठी

jalgaon district taluka list in marathi – जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. जळगाव शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. भारतातील प्रमुख उद्योगधंदे, औद्योगिक क्षेत्रे, राजकारणी, साहित्यिक आणि महत्वाची पर्यटन स्थळे जळगाव जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्र राज्यातील सोन्याची बाजारपेठ म्हणून या जिल्ह्यास ओळखले जाते.

मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जळगावला ओळखले जाते. मागील लेखात आपण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे ( maharashtra division in marathi) माहिती मराठी जाणून घेतली होती.

या लेखातून आपण जळगाव जिल्ह्यातील तालुके माहिती मराठी (jalgaon district taluka list in marathi) जाणून घेणार आहोत. या जिल्ह्यातील महत्वाच्या व्यक्तींच्या बाबतीत माहिती, पर्यटन स्थळे आणि मंदिरे, नद्या, प्रमुख पिके अशी बरीच माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

जळगाव जिल्ह्यातील तालुके माहिती मराठी (jalgaon district taluka list in marathi)

jalgaon district taluka list in marathi
जळगाव जिल्हा नकाशा
नाव जळगाव जिल्हा
पूर्वीचे नावखानदेश (इसवी सन 1906 पूर्वी)
तालुके 15
राज्य महाराष्ट्र
भाषाअहिराणी (मराठी बोलीभाषा)
मुख्यालयजळगाव शहर
क्षेत्रफळ 11, 765 चौ. किमी
पिन कोड412005
आरटीओ कोडMH19
प्रमुख पर्यटन स्थळे पारोळा किल्ला
प्रसिद्ध साहित्यिक बहिणाबाई चौधरी
वेबसाईट https://jalgaon.gov.in/

जळगाव जिल्ह्यात एकूण 15 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांपैकी रावेल आणि यावल तालुके विशेष प्रसिद्ध आहेत, या तालुक्यातून जगप्रसिद्ध केळी निर्यात केली जातात. तसेच जिल्ह्यात साहित्य निर्मिती कारखाना, दुधभुकटी, औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.

जळगावचाळीसगाव
चोपडाजामनेर
अमळनेरमुक्ताईनगर
यावलरावेर
भुसावळभडगाव
पाचोरापारोळे
एरंडोलधरणगाव
बोदवड
जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांची नावे

उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात तापी नदीच्या खोऱ्यात जळगाव जिल्हा वसलेले आहे. हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ 11, 765 चौ. किमी इतके आहे.

जिल्ह्याच्या पूर्वेस बुलढाणा जिल्हा आणि मध्या प्रदेशाची तर पश्चिमेस धुळे, नैऋत्य दिशेला नाशिक आणि दक्षिणेला औरंगाबाद, उत्तरेस मध्य प्रदेशाची सीमा लागून आहे.

जळगाव येथील प्रमुख नदी तापी असून पूर्णा, पांझरा, अनेर, भोकर या नद्या आहेत. तापी-पूर्णा नदीच्या संगमावर मुक्ताईनगर‌ तालुक्यात चांगदेव महाराजांचे मंदिर तीर्थक्षेत्र आहे. चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत म्हणून ओळखले जातात. यांना योगमार्गातील अधिकारी पुरुष ओळखले जातात, कारण योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.

तसेच चाळीसगाव तालुक्यात 12व्या शतकात बनविलेले पाटणादेवीचे मंदिर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच ठिकाणी प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी लीलावती नावाचा ग्रंथ बसून लिहिला आहे. भास्कराचार्यांनी शून्याचा आविष्कार केला आहे.

रावेर आणि यावल या तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या ठिकाणची केळी जगप्रसिद्ध आहेत. तसेच तेलबिया आणि कापूस हेही उत्पन्न या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते.

पर्यटन आणि पिकाच्या क्षेत्रासारखाच जळगाव जिल्हा औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे. जिल्ह्यात वरणगाव (भुसावळ) येथे संरक्षण साहित्य निर्माण करण्याचा कारखाना आहे. पोकरी (फेकरी) या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प व दुधभुकटी निर्मिती प्रकल्प जळगाव जिल्ह्यात आहे.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे (Tourist places in Maharashtra)

15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली, त्यानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे करण्यात आले. बहिणाबाई चौधरी यांनी मराठी साहित्यात मोलाची कामगिरी बजावली. तसेच त्र्यंबक बापुजी ठोंबरे, डॉ. भालचंद्र नेमाडे आणि कविवर्य ना.धों. महानोर हे मराठी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक याच जिल्ह्यातील आहेत.

हा लेख जरूर वाचामराठीतील कवी आणि साहित्यिक व त्यांची टोपणनावे माहिती मराठी (marathi writers name list in marathi)

क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे निवासस्थान असणारा पारोळा किल्ला या ठिकाणी आहे. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व म्हणून राणी लक्ष्मीबाई यांचे नाव इतिहासात अजरामर आहे.

इसवी सन 1936 साली काँग्रेसचे ग्रामीण भागातील अधिवेशन यावल तालुक्यात झाले. हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे, ज्याची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली.

यावल तालुक्यात अभयारण्य आहे, या अभयारण्यात वन्यजीव आणि पक्षी पाहायला मिळतात. तसेच या अभयारण्यात औषधी वनस्पती आहेत. तसेच मुक्ताई भवानी अभयारण्य आणि वधोडा व्याघ्र संवर्धन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे. पाल हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेवर स्थित आहे. जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पाल प्रसिद्ध आहे.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा माहिती मराठी (chikhaldara hill station Maharashtra information in marathi)

चोपडा तालुक्यात उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव ही गरम पाण्याचे झरे आहेत.

एरंडोल तालुक्यात श्री पद्यालय (प्रभा क्षेत्र) आहे. या ठिकाणी प्रसिद्ध असे गणपतीचे मंदिर असून देशातील अडीच गणपती पीठांपैकी अर्धपीठ मानले जाते.

जळगाव जिल्हा संपूर्ण माहिती (jalgaon district information in marathi)

जळगाव जिल्ह्यात चहा, कडधान्ये, कापूस आणि केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते, त्यामुळे हे ठिकाण व्यापारकेंद्र बनले आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने अहिराणी ही मराठी भाषेची बोलीभाषा बोलली जाते.

जळगाव जिल्ह्यात एक महानगरपालिका व 13 नगरपालिका तसेच 15 पंचायत समित्या आहेत. हे सर्व मिळून जिल्ह्याचा कारभार सुरळीत पार पाडतात. जिल्ह्याचे मुख्यालय जळगाव आहे. येथील अभिजित राऊत हे जळगावचे जिल्हाधिकारी आहेत.

जळगाव जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्त्व आहे. या जिल्ह्यातून राज्याला आणि देशाला राजकारणात मोलाचे काम करणारे नेते मंडळी लाभली आहेत. भारत देशातील पहिल्या स्त्री राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल या जळगाव जिल्ह्यातील आहेत.

जळगाव जिल्ह्यात बांधकामासाठी लागणारा दगड, मुरूम आणि वाळू अशी खनीजे आढळतात. तसेच या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्माण करण्याचा कारखानादेखील आहे.

जळगाव जिल्ह्यातून धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग धुळे आणि नागपूर या शहरांना जोडतो. इसवी सन 1860 साली स्थापना झालेले रेल्वे स्टेशन जळगाव जिल्ह्यात आहे. या ठिकाणाहून नागपूर, मुंबई, अलाहाबाद या ठिकाणी रेल्वेगाड्या सुटतात.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण जळगाव जिल्ह्यातील तालुके माहिती मराठी (jalgaon district taluka list in marathi) जाणून घेतली आहे. यात आपण जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, विद्यापीठ, राजकारणी, साहित्यिक, शेती, औद्योगिक विकास याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

जळगाव तालुके माहिती मराठी (jalgaon district taluka list in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

केळ्याची बाग म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

केळ्याची बाग म्हणून जळगाव जिल्हा ओळखला जातो.

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका भुसावळ हा आहे.

1 thought on “जळगाव जिल्ह्यातील तालुके माहिती मराठी”

  1. जळगाव जिल्ह्याची माहिती चांगल्या पद्धतीने दिली आहे. मला जळगाव जिल्ह्यातील कोणता भाग ग्रामीण जिकडे जास्त प्रगती झाली नाही अथवा डेव्हलपमेंटची गरज आहे अशा गावांची माहिती पाहिजे होती मिळाली तर बरे होईल

    Reply

Leave a Comment