कैगल धबधबा माहिती मराठी

Kaigal waterfalls marathi – कैगल धबधबा चित्तूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. चित्तूर भारतातील आंध्रप्रदेश राज्यात असून या जिल्ह्याला नाव येथे असणाऱ्या तितर पक्षावरून पडले आहे. या ठिकाणचे सत्यवेद मंडल एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

आंध्र प्रदेशात चारमिनार, तिरुपती, श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन आणि एथिपोथला धबधबा प्रमुख तर छोटे-मोठे अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. या लेखातून आपण कैगल धबधबा (kaigal waterfalls marathi) माहिती मराठीत जाणून घेणार आहोत.

Table of Contents

कैगल धबधबा माहिती मराठी (kaigal waterfalls marathi)

kaigal waterfalls marathi
नावकैगल धबधबा
प्रकारपर्यटन स्थळे
ठिकाणचित्तूर, आंध्र प्रदेश
पाहण्यासारखी ठिकाणे1. कौंदिण्या वन्यजीव अभयारण्य
2. शिवलिंग

कैगल धबधबा ज्याला दुमुकुराल्लू धबधबा (Dumukurallu Waterfalls) म्हणून देखील ओळखले जाते. धबधब्याची उंची 40 फूट इतकी असून बाराही महिने यावरून पाणी पडते. जसा पावसाळा सुरू होतो तसे, धबधब्याचे सौंदर्य अधिकच तीव्र होत जाते.

धबधब्याच्या खाली बरेच नैसर्गिक तलाव आणि जंगल आहे. या जंगलात विदेशी पक्षी, झुडुपे, वनस्पती तसेच वन्यजीव पाहायला मिळतात.

कैगल धबधबा पाहण्यासारखी ठिकाणे (kaigal falls places to visit marathi)

कैगल धबधबा – हा एक 40 फूट उंचीवर असणारा धबधबा आहे. या धबधब्यावरून बाराही महिने पाणी पडत असल्याने आजूबाजूचा परिसर अगदी हिरवागार झालेला आहे. येथील पाण्याचा पांढराशुभ्र झरा आणि निसर्गसौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न होते.

शिवलिंग – कैगल धबधब्याजवळ एक शिवलिंग स्थापित केलेले आहे. या ठिकाणी शिवरात्रीसारख्या विशेष प्रसंगी स्थानिक लोक भेट देतात. धबधबा तीन एकेरी धबधब्यात विभागतो, त्यापैकी एक या शिवलिंगावरून वाहतो. शिवलिंगावर जलपर्णी पाहण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे.

कौंदिण्या वन्यजीव अभयारण्य – हे वन्यजीव अभयारण्य हत्तीसाठी राखीव आहे. सध्या येथे सुमारे 78 हत्ती असून यात विदेशी आणि आशियाई हत्ती आहेत. तसेच येथे विविध वनस्पती आहेत. विशेषतः बाभूळ आणि बांबू ही दोन झाडे येथे अधिक प्रमाणात दिसून येतात.

या अभयारण्याभोवती उंच टेकड्या आणि खोल दऱ्या पाहायला मिळतात. तसेच या अभयारण्यात विविध प्राणी आणि पक्षी देखील पाहायला मिळतात.

कैगल धबधबा कसे जावे (kaigal waterfalls location in marathi)

कैगल धबधबा चित्तूर जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटन स्थळ (most famous tourism places in chittoor) आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी जून ते ऑक्टोबर महिना सर्वोत्तम आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अनेक बस, खासगी गाड्या आणि रेल्वेमार्ग उपलब्ध आहे.

बंगळुरूपासून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर कैगल गाव आहे. बंगलोरवरून कैगल हे गावाला जाण्यासाठी दोन-तीन तास लागतात. कैगल गावात पोहचल्यावर धबधबा पाहण्यासाठी 2.5 कि.मी जावे लागते.

सारांश

या लेखातून आपण कैगल धबधबा (kaigal waterfalls marathi) माहिती मराठीत जाणून घेतली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

कैगल धबधबा कुठे आहे ?

कैगल धबधबा चित्तूर जिल्ह्यात आहे. हा जिल्हा भारतातील आंध्र प्रदेश या राज्यातील आहे. येथे तितर (चित्तर पक्षी) असल्यामुळे जिल्ह्याचे नाव चित्तूर पडले आहे.

आंध्र प्रदेशातील प्रमुख प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणती आहेत ?

आंध्र प्रदेशात चारमिनार, तिरुपती, श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन आणि एथिपोथला धबधबा प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

पुढील वाचन :

  1. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण माहिती
  2. वसईचा किल्ला माहिती मराठी
  3. उजनी धरण माहिती मराठी
  4. सौताडा धबधबा माहिती मराठी

Leave a Comment