कामिका एकादशी व्रत कथा मराठी

Kamika Ekadashi Vrat Katha In Marathi – नमस्कार मित्रांनो, आषाढ हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षातील चौथा महिना आहे. या महिन्यात असणाऱ्या महत्त्वाच्या दिवसांपैकी कामिका एकादशी आहे.

आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते असे मानले जाते. याच दिवशी भगवान विष्णूच्या गाथा धारण केलेल्या रूपाची पूजा केली जाते.

आज कामिका एकादशीच्या निमित्ताने आपण या एकादशीचे महत्त्व आणि व्रत कथा (Kamika Ekadashi Vrat Katha In Marathi) जाणून घेणार आहोत.

कामिका एकादशी महत्व मराठी माहिती (Kamika Ekadashi Importance In Marathi)

Kamika Ekadashi Vrat Katha In Marathi

मित्रांनो, कळत नकळत आपल्या हातातून घडलेले पाप किंवा पापाच्या महासागरात विसर्जित झालेल्या मनुष्यासाठी, पापांपासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे कामिका एकादशी होय, अशी मान्यता आहे.

ज्या लोकांना पापाची भीती वाटते, त्यांनी भगवान विष्णूची पूजा करावी सोबतच कामिका एकादशीचे व्रत करावे, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांचा नायनाट होतो.

Relatedमहाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय माहिती

कामिका एकादशी व्रत कथा मराठी (Kamika Ekadashi Vrat Katha In Marathi)

एका गावामध्ये एक क्षत्रिय राहत होता. एका दिवशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणांसोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. आपल्या हातातून त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला असे मानून त्या क्षत्रियाने त्या ब्राह्मणाची अंत्यविधी करण्याची इच्छा दाखवली.

पण त्या गावातल्या इतर ब्राह्मणांनी, तू ब्रह्म हत्याचा दोष आहेस असे म्हणत, त्या क्षत्रियाला परवानगी दिली नाही. पहिले तू या पापाचे प्रायचित्त घे आणि या पापातून तुझे मुक्तता झाल्यावर आम्ही तुझ्या घरी जेवायला येऊ असे त्या ब्राह्मणांनी त्याला सांगितले.

यावर त्या क्षत्रियाने, पापातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला. उत्तर देत एक ब्राह्मण म्हणाला, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तीभावाने श्री विष्णूचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान व दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त कर, असे केल्याने तुझी या पापातून मुक्ती मिळेल.

यानंतर त्या क्षत्रियाने ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे एकादशीचे व्रत केले. त्यादिवशी रात्री भगवान विष्णू ने त्या क्षत्रियाला ब्रह्म हप्त्यातून मुक्ती मिळाल्याचा आशीर्वाद दिला. अशाप्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे त्या क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली.

यामुळे आपल्या हातातून घडलेले पापातून मुक्त होण्यासाठी कामिका एकादशीचे व्रत करण्याची प्रथा आहे.

सारांश

तर मित्रांनो, आशा करतो की कामिका एकादशी व्रत कथेचा सार (Kamika Ekadashi Vrat Katha In Marathi) तुमच्या लक्षात आला असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

महाराष्ट्रातील सण आणि उत्सव याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉगला बुकमार्क करून ठेवा.

Leave a Comment