महाराष्ट्रातील नैसर्गिक वारसा स्थळ – कास पठार माहिती मराठी

Kas pathar information in marathi – महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे कास पठाराशिवाय पूर्ण होत नाही. पावसाळ्यात या पठारावर अनेक विविधता असलेले फुल पाहायला मिळतात अगदी दुर्मिळ झालेल्या प्रजाती सुद्धा, यामुळेच UNESCO या संस्थेने २०१२ साली जागतिक पर्यटन स्थळ म्हणून दर्जा दिला. राज्यातील जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणून कास पठार प्रसिद्ध आहे. या ठिकाणी विविध रानफुले व फुलपाखरे पाहायला मिळतात.

या लेखातून आपण महाराष्ट्रातील नैसर्गिक वारसा स्थळ – कास पठार माहिती मराठी (Kas pathar information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे

महाराष्ट्रातील नैसर्गिक वारसा स्थळ – कास पठार (Kas pathar information in marathi)

Kas pathar information in marathi
नावकास पठार
प्रकारमहाराष्ट्रातील एक पठार
ठिकाणसातारा जिल्हा
वैशिष्ट्य जैवविविधतेचा हॉटस्पॉट
ओळखमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ
उंचीसमुद्रसपाटी पासूनच उंची 1213 मिटर
क्षेत्रफळ10 चौ.किमी

6 जून 2013 रोजी महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची घोषणा झाली. या घोषणेत कास पठाराचादेखील समावेश आहे. कास पठार म्हणजे नैसर्गिक देणगी असून या ठिकाणी विविध प्रकारच्या प्रजाती आढळतात. यात प्राणी, पक्षी आणि इतरही अनेक प्रजाती आहेत.

सुरूवात करूयात मातीपासून, येथील माती बेसॉल्ट खडकापासून तयार झाली आहे. या ठिकाणी काळी व लाल माती आहे. या मातीत अनेक औषधी वनस्पतीच्या प्रजाती आढळतात. यात काही वनस्पती दुर्मिळ अश्या आहेत.

Kas Pathar flower season – ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात विविध फुलझाडांना फुले येतात. या फुलावर येणारे फुलपाखरू व रानपाखरू येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. साधारणपणे 250 हून अधिक फुलांच्या प्रजाती या ठिकाणी आढळतात.

भांबवली पठार कास पठारपासून फक्त 3 किमीवर असून हे जगातले जर्वात मोठे पुष्प पठार आहे. या पठाराची हद्द तीन तालुक्यांमध्ये येते, सातारा, जावळी व पाटण. या ठिकाणी रंगी-बेरंगी फुलांनी बहरलेले हे पुष्प पठार असले तरीदेखील हे ठिकाण पर्यटकांपासून दुर्लक्षित आहे.

भांबवलीचे पुष्प पठार उन्हाळ्यात ठणठणीत कोरडे असून काळाकुट्ट जांभ्या दगडाच्या पठारावर पावसाळयात फुलांचा बहर हे एक मोठ आश्चर्य आहे. दगडावर विविधरंगी फुले हा निसर्गाचा चमत्कार आहे. विशेष म्हणजे फक्त दसऱ्याच्या दिवशी येथे विविधरंगी खेकडे फिरताना दिसतात.

कास पठाराच्या दक्षिणेला एक तलाव आहे, नाव त्याचे कास तलाव. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. ते सज्जनगड आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला 30 किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.

तलावाच्या जवळच भांबवली वजराई धबधबा आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. याची उंची 560 मीटर असून तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत. भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणिय स्थळ आहे. अलिकडेच त्याला शासनाने क वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे.

कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान या तलावात फुले येण्यास सुरूवात होते. ही फुले पांढऱ्या रंगाची असल्याने तलावावर पांढरी चादर चढवल्याचा आभास निर्माण होतो तसेच फुलांच्या सुवासाने सर्व परिसर सुगंधित होतो.

कास पठार तेरड्यासह पांढरे गेंद, सीतेची आसव, सोनकी, निसुर्डी, पिंडा, कंदील पुष्प, मिकी माउस, बंबाकू, हालुंदा अशा फुलांनी दरवर्षी बहारून जाते. ही फुले पाहण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणी जमतात.

कास पठारापासून 44 किमी अंतरावर ठोसेघर धबधबा आहे. येथील वैशिष्ट म्हणजे सर्वात लहान धबधबा 20 मीटर आहे तर सर्वात उंच धबधबा 210 मीटर आहे. पावसाळ्यात कास पठार व ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी लाखो पर्यटक येतात.

हा लेख जरूर वाचाठोसेघर धबधबा मराठी माहिती

कास पुष्प पठार फुलांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी अनेक वन्यजीव पाहायला मिळतात. येथे भेकरे, ससे, बिबट्या, अस्वल, सांबर असे विविध प्रकारचे जीव पाहायला मिळतात.

सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदान म्हणजे कारवी. ही करावी कास पठारावर आढळते. कारवी सात वर्षांनी फुलते. जेव्हा ती फुलते तेव्हा सर्वत्र तिचेच साम्राज्य जाणवते. सहा वर्षे ती हिरवीगार असते.

कास पठार कसे पोहचाल ?

विमानानेपुणे–लोहेगाव विमानतळ सातारापासून 123 कि.मी अंतरावर आहे. येथून कास पठार अगदी 20–22 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वेनेसातारा रेल्वे स्थानक इतर भारतीय शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. मुंबई आणि पुणे पासून नियमित रेल्वे देखील सातारा पर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध आहेत.
रस्त्यानेसातारा महामार्ग इतर महामार्गवरील रस्त्यांना जोडलेल्या असून सातारा मार्गे गेल्यास अर्ध्या तासात कास पठारावर जाता येते.

कास पठार राहण्याची सोय (resorts in kaas pathar mahiti)

कास पठार आणि आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी व राहण्यासाठी अनेक एजन्सी आहेत. या एजन्सी राहण्याचा, खाण्याचा व फिरण्याचा एकत्रितपणे योजना तयार करून पर्यटकांचा ताण कमी करते.

याव्यतिरिक्त या ठिकाणी अनेक पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट उपलब्ध आहेत.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील नैसर्गिक वारसा स्थळ – कास पठार माहिती मराठी (Kas pathar information in marathi) जाणून घेतली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

कास पठार कोठे आहे ?

कास पठार सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यापासून कास पठार 20 किलोमीटर अंतरावर आहे.

कास पठारावर फुलांचा बहर केव्हा येतो ?

कास पठारावर फुलांचा बहर ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात येतो.

कास पठार वर्ल्ड हेरिटेज केव्हा घोषित केले ?

इसवी सन 2012 रोजी युनेस्कोने कास पठार वर्ल्ड हेरिटेज घोषित केले.

कास पठारावरील फुलांच्या किती प्रजाती आहेत ?

कास पठारावरील फुलांच्या 280 प्रजाती आहेत. वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रजाती आहेत.

Leave a Comment