कुसुमाग्रज प्रेम कविता – kavi kusumagraj prem kavita in marathi

kavi kusumagraj prem kavita in marathi – कवी कुसुमाग्रज याचे पूर्ण नाव विष्णु वामन शिरवाडकर असे आहे. मराठी भाषेतील आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे महत्वाचे लेखक म्हणून यांना ओळखले जाते.

वि. वा. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. तसेच मराठी साहित्यात मोलाची कामगिरी बजावली असल्याने त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारे हे दुसरे मराठी साहित्यिक आहे. यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. यांनी रचलेल्या कविता तरुणांना नेहमीच प्रेरणा देत असतात.

या लेखात आपण कुसुमाग्रज प्रेम कविता – kavi kusumagraj prem kavita in marathi पाहणार आहोत. या मराठी कविता संग्रह कुसुमाग्रज यांच्या साहित्यातील आहे.

Table of Contents

कवी कुसुमाग्रज यांची माहिती मराठी – kavi kusumagraj information in marathi

संपूर्ण नावविष्णु वामन शिरवाडकर
टोपणनावकुसुमाग्रज
जन्म 27 फेब्रुवारी 1912
पुणे, महाराष्ट्र
मृत्यू10 मार्च 1999
नाशिक, महाराष्ट्र
कार्यक्षेत्रकवी
लेखक
नाटककार
कथाकार
समीक्षक
साहित्याची भाषा मराठी
पुरस्कारज्ञानपीठ पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार

कुसुमाग्रज प्रेम कविता – kavi kusumagraj prem kavita in marathi

kavi kusumagraj prem kavita in marathi
कुसुमाग्रज प्रेम कविता

पूर्ण झाले चंद्रसूर्य, पुऱ्या झाल्या तारा

पुऱ्या झाल्या नदीनाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा

जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा

शेवाळलेले शब्द आणिक

यमकछंद करतील काय ?

डांबरी सडकेवर श्रावण, इंद्रधनू बांधतील काय ?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत,

जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत

नंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय ?

म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ

प्रेम नाही अक्षरांच्या, भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,

प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहण.

प्रेम कर भिल्लासारख, बाणावरती खोचलेल

मतीवरती उगवूनसुद्धा, मेघापर्यंत पोहचलेल

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस.

उधळून दे तूफान सगळं

काळजामध्ये साचलेलं

प्रेम कर भिल्लासारख

बाणावरती खोचलेल..

– कुसुमाग्रज

वि.वा शिरवाडकर कविता – kusumagraj poems on nature

हसरा नाचरा, जरासा लाजरा,

सुंदर साजिरा श्रावण आला

तांबुस कोमल पाऊल टाकीत

भिजल्या मातीत श्रावण आला

मेघात लावीत सोनेरी निशाणे

आकाश वाटेने श्रावण आला

लपत छपत हिरव्या रानात,

केशर शिंपीत श्रावण आला

इंद्रधनुच्या बांधीत कमानी

संध्येच्या गगनी श्रावण आला

लपे ढगामागे, लपे माळावर,

असा खेळकर श्रावण आला

सृष्टीत करीत सुखाची पेरणी

आनंदाचा धनी श्रावण आला…

– कवी कुसुमाग्रज यांची प्रसिध्द कविता

कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता – kusumagraj yanchi kavita

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा


हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा

हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान

हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही

हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान

रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी

रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर

माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा

– कुसुमाग्रज मराठी कविता

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण कुसुमाग्रज – वि. वा. शिरवाडकर माहिती मराठी (kusumagraj information in marathi) जाणून घेतली.

कुसुमाग्रज प्रेम कविता – kavi kusumagraj prem kavita in marathi तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला या कविता आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. जर तुमच्याकडे कवी कुसुमाग्रज यांच्या कविता असतील तर ती कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही त्या यात सामाविष्ट करू.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे ?

कुसुमाग्रज हे टोपण नाव मराठी साहित्यातील महत्त्वाचे लेखक आणि कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ तात्यासाहेब यांचे आहे.

कुसुमाग्रज जयंती म्हणून कोणता दिन साजरा करतात ?

कुसुमाग्रज जयंती म्हणून मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिन साजरा करतात.

Leave a Comment